

तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची भेट घेऊन आमदार राजू तोडसाम यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासन शेतक-यांच्या पाठिशी असुन त्यांनी असा धीर सोडू नये असे आवाहन केले. दरम्यान त्यांनी सायतखर्डा व सायफळ येथिल शेतक-यांना शासनाकडून मिळणा-या मदतीचे धनादेश प्रदान केले.
घाटंजी तालुका हा आदिवासी शेतकरी बहुल असुन गेल्या तिन चार वर्षापासुन कधी अवर्षण तर कधी महापुर अशा नैसर्गिक संकटांमुळे तालुक्यातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हतबल झालेला शतकरी प्रसंगी आत्महत्येचा मार्ग अवलंबीत आहे. शेतकरी वर्गाला आधार देऊन शासन त्यांच्या पाठिशी आहे याबाबत खात्री देण्यासाठी आमदार राजु तोडसाम यांनी तालुक्यातील आमडी, सायतखर्डा, सायफळ, घोटी शारी, व अंजी (नु) या गावच्या शेतकरी कुटूंबाच्या घरी जाऊन त्यांचेशी संवाद साधला.
यावेळी घाटंजी तहसिलचे नायब तहसिलदार विलास बोलपिल्लेवार, मनोज कटनकर, उपसभापती रमेश धुर्वे, स्वप्निल मंगळे, अशोक यमसनवार, राजु शुक्ला, अंकुश हर्षे, सतिश भरडे, प्रणव वाघ, चेतन राठोड, सुरज जाधव, राहुल जांभुळे, किशोर घाटोळ, संजय मंगळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment