तालुक्यातील श्री गजानन महाराज अ.जा.प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, तिवसाळा येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये येथिल श्री समर्थ विद्यालयाच्या प्रयोगाने द्वितीय क्रमांक पटकावला. समाजस्वास्थ्यासाठी गणित व विज्ञान या मुख्य विषयांतर्गत कचरा व्यवस्थापन यावर आधारित ’थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली’ हा प्रयोग साकारण्यात आला होता. हा प्रयोग माध्यमिक गटातील सिद्धी मांडवगडे व प्रतिक्षा शास्त्री यांनी साकारला. त्यांना श्रीमती नगरे व तिवारी यांचे मार्गदर्शन मिळाले.
तिवसाळा येथे झालेल्या समारंभात समर्थ विद्यालयातील शिष्यवृत्ती प्राप्त वेदांत शेवतकर, शिवम कुडमते, उर्मिला मेश्राम, यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाचे मुख्याध्यापीका विमल मानकर, उपमुख्याध्यापक मिलिंद काळे, पर्यवेक्षीका नंदिनी ठाकुर यांचेसह शिक्षकवृंद व कर्मचा-यांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment