गुरूदेव सेवा मंडळाचे आ. राजू तोडसाम यांना निवेदन
आपल्या क्रांतीकारी भजनांच्या माध्यमातून स्वातंत्र्यपुर्व काळात महाराष्ट्रासह देशभरात नवचैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत नाही. त्यामुळे आगामी अधिवेशनात या संदर्भात सभागुहात प्रश्न उपस्थित करून राष्ट्रसंतांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आपली आग्रही भुमिका मांडावी या मागणीचे निवेदन गुरूदेव सेवा मंडळाच्या घाटंजी तालुका शाखेतर्पेâ आमदार राजू तोडसाम यांना देण्यात आले.
गुरूदेव सेवा मंडळाचे उपजिल्हा सेवाधिकारी अनंत कटकोजवार, तालुका सेवाधिकारी सुभाष देवळे, तालुका प्रचारक अरूण मानकर, युवक प्रमुख अशोक भेंडाळे, प्रेमानंद पेटकुले, दिवाकर गेडाम, रमेश ताटेवार यांच्या शिष्टमंडळाचे या संदर्भात आमदार तोडसाम यांचेशी चर्चा केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ तसेच कन्सर हॉस्पीटल नागपुर शहरात आहे. अनेक अभियानांमध्ये शासन महाराजांच्या नावाचा वापर करते मात्र महाराष्ट्राच्या मातीतील या थोर पुरूषाचे नाव शासनाच्या यादीत नाही.
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पुरूषांची थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी १० जानेवारी २०१३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात राष्ट्रसंतांच्या नावाचा उल्लेख नाही. विवीध सामाजीक विषयांवरील महाराजांच्या प्रबोधनाला जगात तोड नाही. असे असतांना महाराजांच्या नावाचा शासनाला पडलेला विसर निषेधार्ह आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत शुद्धीपत्रक काढून चुकीची दुरूस्ती करावी अशी गुरूदेव सेवा मंडळाची मागणी आहे.
No comments:
Post a Comment