Thursday, 18 August 2011
Wednesday, 17 August 2011
Tuesday, 9 August 2011
वयाच्या ८२ व्या वर्षी सायकलने निवडणुक प्रचार
प्रस्थापीतांच्या घोडदौडीमध्ये नारायणरावांचा एकाकी लढा
छेडण्या कडवी शिबंदी पीर वेडे पाहिजे. भेदण्या निष्प्रभ ह्नदया नीर वेडे पाहिजे, छेदण्या पाषाण कट्टर तीर वेडे पाहिजे, गाठण्या अचुक लक्ष्य ‘धेय्यवेडे’ पाहिजे. या ओळींप्रमाणे आपले आयुष्य जगणारे आजच्या काळात अभावानेच मिळतात. निस्वार्थ भावनेने केवळ तत्वासाठी लढा देणा-याला आजच्या काळात कुणीही वेडेच ठरविणार. मात्र कोणाच्याही वल्गनांची पर्वा न करता ‘एकला चलो रे' या भावनेने वाटचाल करणा-यांना आत्मसमाधानाचे सुख नक्कीच मिळते. घाटंजी शहरातही असे एक कलंदर व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे नारायणराव ठाकरे. वयाच्या ८२ व्या वर्षी एखाद्या तरूणालाही लाजवेल अशा सळसळत्या उत्साहाने ते जीवन जगताहेत.
या वयात बहुतांश लोकांना देवाधर्माचे वेध लागतात. नारायणराव मात्र शेतकरी, हमाल मापारी यांना न्याय मिळवुन देण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत उभे ठाकले आहेत. एकीकडे प्रस्थापीतांच्या गाड्यांची घोडदौड तर दुसरीकडे नारायणरावांचा ‘यशवंती' ने एकाकी प्रचार असे अनोखे चित्र बाजार समिती निवडणुकी दरम्यान दिसुन येत आहे. आपल्या सायकलला ते ‘यशवंती' असे संबोधतात.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ते सहकारी संस्था गटातुन अपक्ष निवडणुक लढवताहेत. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ते आपला प्रचार करीत आहेत. त्यासाठी दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतराचा प्रवास ते सायकलच्या माध्यमातुन करतात. प्रचारासाठी ७१ ग्रामपंचायती व २६ सहकारी सोसायट्यांना भेट देऊन ते आपला प्रचार करतील. पारंपारिक महाराष्ट्रीयन पेहराव, डोक्यावर गांधी टोपी, प्रवासासाठी सायकल व सुरकुत्या पडलेल्या चेह-यावर स्मितहास्य एवढे भांडवल घेऊन ते घराबाहेर पडतात.
२१ एप्रिल १९३० रोजी जन्मलेल्या नारायणरावांनी आपले अवघे जीवनच संघर्षात घालवले आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी नगर परिषद निवडणुक लढविली. नगरसेवक झाल्यावर जनतेच्या अडचणी घेऊन ते नेहमीच भांडायचे. त्यावेळी नगर परिषदेच्या राजकारणात बहुतांश त्यांचे नातेवाईक होते. मात्र तरी देखिल सत्ताधा-यांच्या असहकार्यामुळे जनतेच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरल्याचे जाणवताच त्यांनी तातडीने नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. यापुर्वीही एकदा त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापीतांना कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन तिन मतांनी ते पराभुत झाले होते. सध्या ते घाटी घाटंजी विवीध सहकारी संस्थेचे सदस्य आहेत.
घाटंजीतील राजकीय, सामाजीक व सांस्कृतीक वर्तुळात ठाकरे घराण्याला अत्यंत मानाचे स्थान आहे. नारायणरावांचे चिरंजीव प्रविण ठाकरे तहसिलदार आहेत, मुलगी छाया महाले अधिव्याख्याता तसेच सामाजीक कार्यकर्त्या आहेत. दुसरे चिरंजीव प्रमोद ठाकरे उत्कृष्ठ चित्रकार आहेत. मात्र त्यांचे मन कधीच अशा झगमगाटात रमले नाही.सर्वसामान्यांमध्ये राहुन त्यांच्यासाठी झटणे हे एकच धेय्य त्यांच्या समोर आहे.
आजच्या निराशेने व्यापलेल्या दुनियेत नारायणरावांचे व्यक्तीमत्व एखाद्या दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहे.
प्रकरण दडपण्यासाठी आर.एफ.ओ. राठोडचा आटापीटा
वरिष्ठही मुग गिळुन गप्प
कर्मचारी दुहेरी तणावाखाली
शस्त्राच्या धाकावर वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे प्रकरण दडपण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड. राठोड आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना ब-याच अंशी यश आले असुन घटनेला पाच दिवस होऊनही वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय या संशयाला पुष्टी मिळाली आहे. घटनेची पोलीस स्टेशनला अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही तरी काल (दि.८) ला रात्री ७.३० दरम्यान आर.एफ.ओ. राठोड आपल्या सहका-यांसमवेत पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांची भेट घेऊन त्यांचेशी खास ‘चर्चा' केल्याची माहिती आहे. मात्र वनविभागाच्या वतीने तक्रार देण्यात आलेली नाही.
आपल्याकडे दोन ठिकाणचा प्रभार असल्याचे गोंडस कारण देऊन राठोड आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु यवतमाळचा अतिरिक्त प्रभार स्वत:कडे ठेवण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यांची नियुक्ती घाटंजी येथे झालेली असली तरी काम मात्र ते यवतमाळ येथुनच पाहतात. गेल्या तिन महिन्यात ते एखाद दुसरा अपवाद वगळता मुख्यालयी असल्याचे निदर्शनास आले नाही. या दरम्यान तिन वेळा कार्यालय परिसरात चंदन चोरी झाली. गवगवा न झालेल्या चो-यांचा तर हिशोबच नाही. या प्रकरणांमध्ये वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीही तितकेच दोषी आहेत. चौकशी करूनही त्यातुन काहीच निष्पन्न न झाल्यामुळे चोरट्यांसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कायमस्वरूपी कुरणच झाले आहे. या प्रकारामुळे कनिष्ठ कर्मचारी मात्र दुहेरी तणावाखाली वावरत आहेत. कर्तव्य बजावतांना चोरट्यांची भिती व अशी घटना घडल्यावर वरिष्ठांचा दबाव या संकटात कर्मचारी सापडले आहेत. अशा प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्यावरील सर्व जबाबदारी कनिष्ठ कर्मचा-यांवर लोटून नामनिराळे होतात. वनविभागाच्या या धोरणामुळे शस्त्रसज्ज चोरट्यांकडून गस्त घालणा-या कर्मचा-यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यात झालेल्या चोरीच्या घटनांमुळे वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरासह घाटंजी तालुक्यातील वनसंपदा चोरट्यांसाठीच खुली असल्याचे सिद्ध झाले आहे.

घाटंजीचा असाही एक चेहरा.......!

बसस्थानकाकडे जाणा-या मार्गावर नगर परिषदेने मुरूमाऐवजी माती टाकल्याने येथून वाहने पुढे नेताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
बसस्थानक परिसरात हा वाहतुक पोलीस अवैध वाहतुकदाराशी नेमके काय बोलत असेल?
वाघाडी नदिच्या पात्रात अवैधपणे होत असलेले रेतीचे उत्खनन.
घाटंजी बसस्थानकावर खड्डे पडल्याने बसचालक व प्रवाशांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे.
जेसिस कॉलनी मध्ये रहिवाशांना अशा रस्त्यावरून वाट काढावी लागते.
Subscribe to:
Posts (Atom)