अध्यक्षपदी राम खांडरे, मनोज हामंद सचिव
येथिल संत मारोती महाराज सांस्कृतिक भवनात झालेल्या आमसभेत वंजारी समाज तालुका कार्यकारीणीचे गठण करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षपदी नगरसेवक राम उर्फ़ बालु खांडरे तर सचिवपदी मनोज हामंद यांची निवड करण्यात आली. आमसभेच्या अध्यक्षस्थानी रेणुराव हेमके होते. संघटनेच्या उपाध्यक्षपदी दत्ता पेटेवार, लक्ष्मण कानकाटे, सहसचिव राहुल खांडरे, कोषाध्यक्ष राजु पेटेवार, तर सदस्यपदी शशांक साठे, गजानन वराडे, सारंग कहाळे, राहुल खांडरे, विशाल खांडरे, सुरज हेमके, दत्ता पांढरमिसे, विनोद धात्रक, अमोल पेटेवार, मंगेश खांडरे, रमेश नव्हाते, देओल खांडरे, आकाश हेमके यांचा समावेश आहे.
नविन कार्यकारीणीला मार्गदर्शक म्हणुन रेणुराव हेमके, अॅड. गणेश धात्रक, नाना खांडरे, बंडू हेमके, भगवान खांडरे राहतील. या सभेत आगामी वर्षासाठी तिन महत्वाचे ठराव पारित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने संघटनेतर्फ़े सामुहिक विवाह मेळावा घेणे, समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणीक खर्च संघटनेने करणे, तसेच चालु वर्षातच घाटंजी येथे वंजारी समाजाचे भव्य समाज मंदिर उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद खांडरे तर आभार प्रदर्शन मनोज हामंद यांनी केले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment