समाजाच्या विवीध उपक्रमांसाठी समाजभवनाची नितांत आवश्यकता असते. घाटंजीत वंजारी समाजाचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथे समाजभवनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे यांनी दिले. येथिल सांस्कृतिक भवनात झालेल्या श्री भगवानबाबा पुण्यतिथी उत्सव व सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव सांगळे होते. वणीचे तहसिलदार अशोक मिसाळ, डॉ.प्रताप तारक, माजी नगराध्यक्षा शांताबाई खांडरे, अनिता व-हाडे, गौरी बडे, मधुकर धस, भडांगे महाराज, राजु पेटेवार, उमेश खांडरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात न्यायमुर्ती विशाल साठे, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, न.प.यवतमाळचे नगरसेवक जयदिप सानप, वैजयंती उगलमुगले, घाटंजीचे नगरसेवक राम खांडरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंजारी समाजाचे दैवत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांचा जिवनपट कु.नुतन तारक हिने सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुराव हेमके संचालन लक्ष्मण कानकाटे तर आभार प्रदर्शन देओल खांडरे यांनी केले. या कार्यक्रमाला घाटंजी, खापरी, करमना, कोंडेझरी यासह विवीध भागातून समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वंजारी समाज उत्सव समितीचे सचिव मनोज हामंद, स्वरूप नव्हाते, अॅड. गणेश धात्रक, बंडू हेमके, प्रमोद खांडरे, दत्ता पेटेवार, शंकर खांडरे, शशांक साठे, राहुल खांडरे, मंगेश खांडरे, उमेश खांडरे, गजानन व-हाडे, सारंग कहाळे, राजु खांडरे, रवि पेटेवार, संदिप खांडरे, गजानन करपे, सुरज हेमके, अमोल पेटेवार, सचिन हामंद, आकाश हेमके, महेश खांडरे, विशाल खांडरे, अशोक खांडरे, सचिन पांढरमिसे, विनोद खांडरे, लुकेश खांडरे, गणेश खांडरे, वामन धात्रक, संतोष पांढरमिसे, वृषभ हामंद, अमोल भडांगे, पवन पेटेवार, रवि कहाळे, बादल खांडरे यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment