स्थानिक शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय घाटंजी व विद्यार्थी कल्याण विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने लेखी परिक्षा व मुलाखत या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन बा.दे.पारवेकर महाविद्यालय पारवा चे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे सचिव अॅड. अनिरूद्ध लोणकर होते. संस्थेचे संचालक आर.यु.गिरी, आलिया शहेजाद, प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, प्रा.ए.के.पत्की, प्रा.आर.जी.डंभारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आजच्या या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी लागणा-या तयारीची मार्गदर्शक शिदोरी प्रा.नितिन सिंघवी यांनी विद्यार्थ्यांना
दिली. हताश न होता सातत्याने विद्यार्थ्यांनी आपल्या सकारात्मक विचाराने स्वत:ची ओळख जगासमोर ठेवावी असे मार्गदर्शनपर उद्गार प्रा.सी.पी.वानखडे यांनी आपल्या द्वितीय सत्रातील व्याख्यानात काढले. मुलाखतीस जाताना न घाबरता संधी काबिज करण्याचा सल्ला प्रा.आर.व्ही.राठोड यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन सिमा कश्यप हिने तर आभार प्रदर्शन प्रा.व्हि.एस.जगताप यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता प्रा.डॉ.प्रदिप राऊत, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.डॉ.एन.एस.धारकर, प्रा.एम.एच.ढाले, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.जी.सी.भगत, प्रा.यु.एस.माहुरे, प्रा.ए.पी.भगत, प्रा.एन.एन.तिरमनवार, प्रा.जे.पी.मोरे, प्रा.के.आर.किर्दक, छात्रसंघ सचिव गौरव गावंडे, कर्मचारी दिनेश खांडरे, लक्ष्मण बोरकर यांचेसह संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment