Pages

Monday, 11 February 2013

घाटंजीत शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

हिंदी हास्य कवी संमेलन मुख्य आकर्षण

स्थानिक राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेड तालुका शाखा घाटंजीच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवतिर्थ’ जेसिस कॉलनी येथे छत्रपती शिवरायांच्या ३८३ व्या जयंती निमित्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१९ फ़ेब्रुवारी ला सायंकाळी ५ वाजता शिवपुजनाने कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यानंतर नांदेड येथिल ख्यातनाम विचारवंत व वक्ता प्रा.सौ.राजर्षी पाटील यांचे ‘‘जिजाऊ शिवबांच्या विचारातूनच महिला अत्याचाराला प्रतिबंध शक्य’’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प.सभापती संगिता भुरे राहतील, तसेच यावेळी न.प.सभापती परेश कारीया, चंद्ररेखा रामटेके, सिमा डंभारे यांची उपस्थिती राहिल. 
त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ वितरण सोहळा होईल. या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती व पुरस्काराचे मानकरी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती मा.एम.एन.गिलानी यांची प्रमुख उपस्थिती राहिल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल राहतील. मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, घाटंजीचे नगराध्यक्ष किशोर दावडा हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहतील. 
सायंकाळी ७ वाजता हिंदी हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या हास्यकवी संमेलनात प्रख्यात हिंदी हास्यकवी किरण जोशी अमरावती, मनोज मद्रासी निजामाबाद, कपील जैन (बोरूंदीया) यवतमाळ व राजा धर्माधीकारी परतवाडा हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला श्रोत्यांना नि:शुल्क प्रवेश मिळणार आहे. 
या सर्व कार्यक्रमांना घाटंजीकरांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती सामाजीक संस्था, संभाजी ब्रिगेडचे राजेश उदार, दिपक महाकुलकर, संजय राऊत, प्रफ़ुल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, संतोष राऊत, मनोज ढगले, राजु गिरी, रूपेश कावलकर, श्रिकांत पायताडे, संजय पडलवार, प्रमोद टापरे, हर्षद दावडा, गजानन कटकमवार, प्रविण मडावी, रवि बेलोरकर, निरज विरदंडे, आकाश निमसरकर, सतिश भोयर, संतोष गावंडे, दिनेश बावनकुळे, प्रदिप ढगले, संतोष भोयर, सुमित कैटीकवार, प्रशांत चौधरी, अजय दिघडे, पंकज वल्लभकर, मंगेश वांढरे, अमित वैश्य, पंकज घाडगे, सुरेश यन्नरवार, समिर चौधरी, अंकुश ठाकरे, संदिप धांदे, अरविंद मानकर, संतोष काळे, दिलीप गुघाणे, मंगेश रामटेके, मानव लढे, आकाश कवासे, शरद सोयाम, अभय ठाकरे, सचिन गवळी, नरेश ताजणे, अमोल कर्णेवार, सुशिल कोवे, अनिल डहाके, शक्तिसिंग ठाकुर, शितल कोवे, नंदू बुरबुरे, नरेश भडांगे, विजय जयवळ, अरूण गावंडे, सुमित ढगले, एस.आर.जाधव, एन.डी.कोळी, बाल्या चावरे, प्रेम चावरे, ज्ञानेश्वर राठोड, सचिन यन्नरवार, अवि जळके, प्रफ़ुल्ल खंडाळकर यांनी केले आहे.

माजी न्यायमुर्ती गिलानी यांना विर राजे संभाजी पुरस्कार 

आपल्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करणारे व्यक्तीमत्व तसेच घाटंजी तालुक्यातील भुमीपूत्रांना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांना जाहिर करण्यात आला आहे. न्यायमुर्ती गिलानी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. ते मुळचे घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण घाटंजी येथे झाले आहे. न्यायमुर्ती गिलानी यांनी आजवर मोठमोठी पदे भुषविली आहेत. विवीध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment