Pages

Showing posts with label उत्सव. Show all posts
Showing posts with label उत्सव. Show all posts

Wednesday, 6 February 2013

घाटंजी येथे वंजारी समाज भवनाची गरज - नगराध्यक्ष शंकर बडे


समाजाच्या विवीध उपक्रमांसाठी समाजभवनाची नितांत आवश्यकता असते. घाटंजीत वंजारी समाजाचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथे समाजभवनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे यांनी दिले. येथिल सांस्कृतिक भवनात झालेल्या श्री भगवानबाबा पुण्यतिथी उत्सव व सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव सांगळे होते. वणीचे तहसिलदार अशोक मिसाळ, डॉ.प्रताप तारक, माजी नगराध्यक्षा शांताबाई खांडरे, अनिता व-हाडे, गौरी बडे, मधुकर धस, भडांगे महाराज, राजु पेटेवार, उमेश खांडरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात न्यायमुर्ती विशाल साठे, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, न.प.यवतमाळचे नगरसेवक जयदिप सानप, वैजयंती उगलमुगले, घाटंजीचे नगरसेवक राम खांडरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंजारी समाजाचे दैवत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांचा जिवनपट कु.नुतन तारक हिने सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुराव हेमके संचालन लक्ष्मण कानकाटे तर आभार प्रदर्शन देओल खांडरे यांनी केले. या कार्यक्रमाला घाटंजी, खापरी, करमना, कोंडेझरी यासह विवीध भागातून समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वंजारी समाज उत्सव समितीचे सचिव मनोज हामंद, स्वरूप नव्हाते, अ‍ॅड. गणेश धात्रक, बंडू हेमके, प्रमोद खांडरे, दत्ता पेटेवार, शंकर खांडरे, शशांक साठे, राहुल खांडरे, मंगेश खांडरे, उमेश खांडरे, गजानन व-हाडे, सारंग कहाळे, राजु खांडरे, रवि पेटेवार, संदिप खांडरे, गजानन करपे, सुरज हेमके, अमोल पेटेवार, सचिन हामंद, आकाश हेमके, महेश खांडरे, विशाल खांडरे, अशोक खांडरे, सचिन पांढरमिसे, विनोद खांडरे, लुकेश खांडरे, गणेश खांडरे, वामन धात्रक, संतोष पांढरमिसे, वृषभ हामंद, अमोल भडांगे, पवन पेटेवार, रवि कहाळे, बादल खांडरे यांनी परिश्रम घेतले.


साभार :- देशोन्नती 

Friday, 18 January 2013

घाटंजी येथे भगवानबाबा पुण्यतिथी उत्सव व सत्कार समारंभ



येथिल वंजारी समाज उत्सव समितीच्या वतीने २७ जानेवारीला सकाळी ११ वाजता सांस्कृतिक भवन घाटंजी येथे भगवानबाबा पुण्यतिथी उत्सव व मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव सांगळे राहतील. यावेळी वणीचे तहसिलदार अशोक मिसाळ, घाटंजीच्या माजी नगराध्यक्ष शांताबाई खांडरे, वणीच्या माजी नगराध्यक्ष हेमलता लहामगे, डॉ.प्रताप तारक, मधुकर धस यांची प्रमुख उपस्थिती राहिल. या कार्यक्रमात न्यायमुर्ती विशाल साठे, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बढे, यवतमाळचे नगरसेवक जयदिप सानप, वैजयंती उगलमुगले, घाटंजीचे नगरसेवक राम खांडरे यांचा सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष राजु पेटेवार, सचिव मनोज हामंद, दत्ता पेटेवार, शशांक साठे, प्रमोद खांडरे, अ‍ॅड. गणेश धात्रक, बंडू हेमके, रेणुराव हेमके, राजु खांडरे, विशाल खांडरे, रवि पेटेवार, सारंग कहाळे, संदिप खांडरे, महेश खांडरे, विनोद खांडरे, उमेश खांडरे, गजानन व-हाडे, सुरज हेमके, लक्ष्मण कानकाटे, राहुल खांडरे, गजानन करपे, देओल खांडरे, मंगेश खांडरे, सचिन हामंद, लुकेश खांडरे, अमोल पेटेवार, अक्षय पेटेवार, अमोल भडांगे, वृषभ हामंद, आकाश हेमके यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती