मनसेच्या हस्तक्षेपानंतर वजनकाटा बंद
कापसाच्या सौदा पट्टीतही खोडतोड
कापसाच्या खरेदीचा हंगाम जेमतेम सुरू झाला असतांना घाटंजीच्या तिरूपती कॉटन मॉडर्न जिनिंगमध्ये शेतक-यांची लुट करण्याचा सुरू असलेला कार्यक्रम मनसेच्या हस्तक्षेपामुळे उधळल्या गेला.
शेतक-यांनी घरून मोजुन आणलेल्या वजनात व जिनिंगमध्ये केलेल्या मोजणीत वजनामध्ये सुमारे ४५ किलोची तफावत असल्याचे काही शेतक-यांच्या निदर्शनास आले. संबंधीतांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांना याबाबत कळविल्यावर त्यांनी जिनिंगमध्ये येऊन सर्वांसमक्ष वजनकाट्याची तपासणी करण्याची मागणी केली. मापारी व बाजार समितीच्या उपस्थितीत प्राथमिक तपासणी केली असता ४६ किलोची तफावत दिसुन आली. तसा पंचनामाही यावेळी करण्यात आला. मात्र काही कालावधी नंतर पुन्हा काट्याची तपासणी करून पंचनामा करण्यात आला त्यावेळी ही तफावत केवळ १ ते २ किलोंची होती. त्यामुळे बाजार समितीचा कोणता पंचनामा योग्य होता याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याचा आरोप धांदे यानी केला.
जिनिंगच्या कर्मचा-याने वजनकाट्याला विशिष्ट ठिकाणी छेडछाड करताच वजनात असलेली तफावत अत्यंत कमी झाल्याचा आरोप शेतकरी व मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला. हा प्रकार उघड झाल्यावर संतापलेल्या जिनिंग मालकाने मी आता एकाही गाडीचा कापुस घेणार नाही. सगळ्या परत घेऊन जा अशी दर्पोक्ती केली. यावेळी मनसे कार्यकर्ते व जिनिंग मालक यांच्यात शाब्दीक बाचाबाची सुद्धा झाली. बाजार समितीच्या मार्वेâट यार्डावर लिलाव झाल्यानंतर कापसासाठी ठरविण्यात आलेला भाव कापुस सौदा पट्टीवर लिहिण्यात येतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोडतोड नियमानुसार करता येत नाही. मात्र व्यापारी व जिनिंग मालक बहुतांश शेतक-यांच्या सौदा पट्टीवरील ठरविलेला कापसाचा दर खोडून त्यामागे त्यापेक्षा कमी दर लिहितात. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचा आरोप धांदे यांनीr केला. पुराव्यादाखल त्यांनी काही शेतक-यांच्या खोडतोड केलेल्या कापुस सौदा पट्या सुद्धा दाखविल्या.
केवळ तिरूपती कॉटन जिनिंगमध्येच नव्हे तर तिरूपती अॅग्रोसह ईतरही जिनिंगच्या वजनकाट्यांमध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी व संबंधीत विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी ही बाब गंभिरतेने घ्यावी अशी शेतक-यांची मागणी आहे. तांत्रिक बिघाडाच्या गोंडस नावाखाली होत असलेल्या शेतक-यांच्या फसवणुकीची तज्ञांमार्पâत चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार यांची प्रतिक्रीया घेतली असता सदोष वजनकाट्याची दुरूस्ती होई पर्यंत या जिनिंगमधील वजनकाटा बंद करण्यात आला असुन शेतक-यांची फसवणुक होणार नाही यासाठी दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment