Pages

Monday, 29 September 2014

आर्णी-केळापुर मतदार संघात उमेदवारीची अभुतपुर्व ओढाताण

भाजप नेत्यांनी विश्वासाहर्ता गमावली
कॉंग्रेसपुढे मतदारांच्या नाराजीचे आव्हान
सर्वसामान्य मतदार अजुनही संभ्रमावस्थेत
युती व आघाडीमध्ये झालेला घटस्फोट व त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आर्णी-केळापुर विधानसभा मतदार संघात सध्या उमेदवारीसाठी अभुतपुर्व ओढाताण पाहायला मिळत आहे. पक्षनिष्ठा, कार्यकत्र्यांच्या भावना अशा सर्वच गोष्टी आमदारकीच्या स्वप्नापुढे गौण ठरत आहेत. उमेदवारीसाठी पक्ष बदल केल्याने नेमका कोण कोणत्या पक्षाचा आहे हे निवडणुक आयोगाने अंतिम यादी जाहिर केल्यावरच लक्षात येईल असे चित्र आहे. 
उमेदवारीसाठी पक्ष बदल करण्याचा हा प्रकार यावेळी महाराष्ट्रात प्रकर्षाने दिसुन आला. आर्णी - केळापुर देखिल यातुन सुटले नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार धर सोड प्रवृत्तीमुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागळल्या गेली आहे. उमेदवारी देतांना वेळोवेळी बदललेल्या निर्णयांमुळे या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची विश्वसनियताच दावणीला बांधल्या गेल्याची चर्चा आहे. 
विद्यमान आमदार असतांनाही गेल्या निवडणुकीत भाजपाने डॉ.संदिप धुर्वे यांना उमेदवारी न देता दुस-या मतदार संघातून उमेदवार आयात केला. तरी देखिल डॉ.धुर्वे यांनी बंडखोरी न करता गेली पाच वर्ष पक्षासोबत एकनिष्ठता दाखविली. यावेळी ते उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. यावेळी त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळणार असा दावा केल्या जात होता. मात्र काही वरिष्ठ नेत्यांनी राजु तोडसाम यांच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा केल्याने तोडसाम यांची उमेदवारी निश्चित होणार असे स्पष्ट चित्र दिसल्याने डॉ.संदिप धुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवीली. 
एक माजी आमदार असलेला उमेदवार मिळत असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष डॉ.धुर्वे यांना उमेदवारी देण्यास ईच्छुक होते. डॉ.धुर्वेंनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेले सेनेचे युवा कार्यकर्ते डॉ.विष्णु उवंâडे नाराज झाले व त्यांनी थेट पक्ष बदल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीने गेलेले राजु तोडसाम यांना ऐनवेळी ए.बी.फॉर्म हा उद्धव येरमे यांचा आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसरात भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. अखेर येरमे यांनी भाजपाकडून व तोडसाम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र त्या नंतर पुन्हा राजकारण शिजले व उद्धव येरमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपाची उमेदवारी पुन्हा एकदा राजु तोडसाम यांच्या पदरात पडली आहे. मात्र या संभ्रमावस्थेमुळे भाजपाची प्रतिमा डागाळल्या गेली आहे.
राज्याचे सामाजीक न्यायमंत्री व मतदारसंघाचे सर्वाधीक काळ प्रतिनिधीत्व केलेले ना.शिवाजीराव मोघे यांच्याप्रती नाराजीचा सुर असला तरी गेल्या वर्षभरापासुन ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना उमेदवारीतच बराच काळ गुंतून राहावे लागल्याने ना.मोघे यांचे पारडे आपसुकच जड झाले आहे. शिवाय कार्यकत्र्यांची भक्कम फळी असल्याने त्यांना लोकांपर्यंत पोहोचणे कठिण जाणार नाही. मात्र ते लोकांची नाराजी कशी कमी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ना.मोघे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचे तोंड दाखविणा-या डॉ.संदिप धुर्वे यांनी आमदारकीच्या काळात केलेली अनेक कामे ही त्यांची जमेची बाजु आहे. शिवाय ना.मोघेंना फक्त धुर्वेच पराभुत करू शकतात अशी भावनाही मतदार संघात रूजल्या गेली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने का कोण जाणे पण त्यांना दोन वेळ दगा दिला. विद्यमान आमदार असतांना गेल्या निवडणुकीतही डॉ.धुर्वेंना भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. तेव्हा उमरखेडचे आमदार अनिल इंगळे हे भाजपाचे उमेदवार होते. मात्र ते डमी उमेदवार असल्याची चर्चा झाल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी डॉ.संदिप धुर्वे यांनी राजकीय डावपेचांकडे दुर्लक्ष केल्याने उमेदवारी गमावली व यावेळीही नेमके तसेच झाले. शिवाय त्यांना भाजपाचे स्थानिक व जिल्हा पदाधिकारी तसेच नेत्यांची मर्जी सांभाळता आली नाही.

आता भाजपाचे "लेटेस्ट" अधिकृत उमेदवार असलेले राजु तोडसाम यांच्याकडे तरूण कार्यकर्त्याची चांगली फळी आहे. उमेदवारीसाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासुन पुर्वतयारीही केली आहे. शिवाय प्रमुख नेतेही त्यांच्या बाजुने अनुवूâल आहेत. त्यामुळे ते आता नव्या दमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यात शंका नाही. मात्र पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरीत मतदार संघात ते फारशे परिचीत नाहीत. त्यांच्या संपर्वâही तेवढा नाही. त्यामुळे ना.मोघे व डॉ.धुर्वे यांच्या तुलनेत ते नवखे म्हणुन गणल्या जातील. मात्र तरी देखिल लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट या निवडणुकीतही चालली तर त्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे देखिल महत्वाचे ठरणार आहे. एकुणच आर्णी-केळापुर मतदारसंघात कॉग्रेस, शिवसेना व भाजपामध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच रा.कॉ.चे विष्णु ऊवंâडे हे किती मते घेणार यावरही विजयाचे गणित अवलंबुन राहिल.

No comments:

Post a Comment