Pages

Monday 29 September 2014

घाटंजी बाजार समितीचे संचालक मंडळ पुन्हा सत्तारूढ

उच्च न्यायालयाने घाटंजी बाजार समिती बरखास्तीचा निर्णय रद्दबातल ठरविल्याने सभापतींसह संचालक मंडळाने आज प्रभार स्विकारला. बाजार समिती संचालक मंडळाच्या कथित गैरव्यवहाराची तक्रार मनसेने केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीवर बरखास्तीची कार्यवाही केली. हि कार्यवाही राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचा आरोप पुर्वी पासुनच होत होता. 
शिवाय न्यायालयात दाद मागण्याची संधी मिळु नये म्हणुन सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रभार काढुन घेण्याची घाई, बाजार समितीची बाजु ऐकुन न घेता घेतलेला बरखास्तीचा निर्णय यामुळे या संपुर्ण कार्यवाहीवरच संशय व्यक्त केल्या जात होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे तक्रारकर्ते तोंडघशी पडले आहेत. 
बरखास्तीची कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय ७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिला होता. तक्रारकत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र मनसेने सर्वोच्च न्यायालयात जाणे टाळले. त्यामुळे अखेर आज संचालक मंडळाने प्रभार स्विकारला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, सभापती अभिषेक ठाकरे यांचेसह बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment