राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी ना.शिवाजीराव मोघे, त्यांचा पुतण्या विजय मोघे व तत्कालीन स्वीय सहायक देवानंद पवार या तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून वडगाव पोलिसांनी भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घाटंजी तालुक्यातील कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोळंकी यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी केदार कुलकर्णी यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करून ६० दिवसांत प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सोळंकी यांच्या तक्रारीनुसार माध्यमिक आश्रम शाळा व अध्यापक विद्यालयाच्या परवानगीसाठी सोळंकी यांच्याकडून शिवाजीराव मोघे, विजय मोघे, देवानंद पवार यांनी ४२ लाख रुपये घेतले आहे. मात्र परवानगी काढून न देता सोळंकी यांची फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सामाजीक न्याय मंत्र्यांविरोधात चक्क ४२० चा गुन्हा दाखल झाल्याने घाटंजी तालुक्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या वृत्ताची दखल ईलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांसह राष्ट्रीय वृत्तपत्रानी घेतल्यामुळे मोघे पावसाळी अधिवेशनाच्या काळात चांगलेच अडचणीत आले आहेत.
See The Links For More News
आश्रमशाळा मान्यतेसाठी सामाजीक न्याय मंत्री
शिवाजीराव मोघेंनी घेतले होते ४२ लाख
No comments:
Post a Comment