Pages

Sunday, 4 May 2014

प्रा.अभय पत्की यांना पी.एच.डी.प्रदान

येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अभय केशवराव पत्की यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आचार्य पदवीने गौरविण्यात आले आहे. त्यांना ’’स्टडी ऑफ सम केस्टोड पॅरासाईट्स फ्रॉम फिशेस ऑफ वेस्ट कॉस्ट ऑफ र्इंडीया’’ या विषयावरील शोध प्रबंधासाठी पी.एच.डी.प्रदान करण्यात आली आहे. यासाठी त्यांना श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालय चिखली येथे कार्यरत डॉ.एम.बी.सोनुने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ.के.एम.कुळकर्णी यांनीही त्यांना सहकार्य केले. 
प्रा.अभय पत्की यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी, संचालक र.ऊ.गिरी, अ‍ॅड अनिरूद्ध लोणकर, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए.शहेजाद, डॉ.ए.पी चार्जन, प्रम.बी.बी.चोपडे, प्रा.सि.पी.वानखडे, प्रा.आर.जी.डंभारे, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.आर.व्ही.राठोड, प्रा.जी.सी.भगत यांचेसह सर्व प्राधापक व कर्मचारी वुंदाने कौतुक केले आहे.
  

Saturday, 12 April 2014

घाटंजीत आज ऑल इंडीया मुशायरा व कवी संमेलन

देशातील नामांकीत कवींची उपस्थिती
येथिल हजरत बाबा जानेमन जन्नती रहेमत उल्लाह अलैह दर्गा कमेटीच्या वतीने ता.१३ ला सायंकाळी सहा वाजता आझाद मैदानात ऑल इंडीया मुशायरा व कवी संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 
या कवी संमेलनात उर्दू आणी हिंदीतील प्रख्यात शायर व चित्रपट सुष्टीतील गीतकार राहत र्इंदोरी, शमीम फरहत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे देशातील नामवंत शायर उम्मी अहेमदाबादी, कपील जैन, अलताफ जिया,नईम फराज, तंवीर गाजी, मनोज मद्रासी, अ.हक वफा, नसिम  नवाज, आजीम रायपुरी, फिरोज कादरी, इब्राहिम सागर यांचाही या मुशाय-यामध्ये सहभाग राहणार आहे. 
हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी नि:शुल्क असुन घाटंजी शहरात दुस-यांदा अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन होत आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सैय्यद जावेद, सैय्यद अनवर मुशायरा कमेटीचे शेख आबीद, शेख फारूख, सैय्यद सरफराज, विक्रम लामसोंगे, हितेश सुचक, विठ्ठल भोंग, शेख तौफिक, रितेश सहारे, आशिष रामटेके, योगेश निमकर, राहुल ठाकरे, सैय्यद सद्दाम, बंटी मराठे, सैय्यद नादीर, शेख अनवर, साहेबराव मुन यांनी केले आहे.
साभार : सकाळ 

Sunday, 30 March 2014

घाटंजीत चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन

येथिल जेसिस कॉलनी परिसरात असलेल्या गायत्री दुर्गा माता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता.३१) ला घटस्थापना करण्यात येणार आहे. या नवरात्रौत्सवादरम्यान दररोज विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ एप्रीलला रात्री ७ वाजता भजन संध्या व जागरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असुन अष्टमीच्या दिवशी दि. ७ एप्रीलला होमहवनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. दि.९ एप्रीलला सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असुन मंदिर परिसराला आकर्षक रोषणाईने सुशोभीत करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मॉ.गायत्री दुर्गा माता मंदिर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.  

Thursday, 6 March 2014

घाटंजी तालुक्याच्या मातीतून उमलतोय भावस्पर्शी गझलांचा ‘अंकुर’

‘ओठी तुझ्या असु दे’ : हौशी युवकांनी साकारलाय 
‘गारवा स्टाईल’ गझल अल्बम


हळुवार पार्श्वसंगीत... अर्थपुर्ण शब्दांनी मनाचा ठाव घेणारे निवेदन... अन जणु काही अंत:करणातील भावनाच शब्दरूपाने कानावर पडत असल्याचा भास... तरूणाईला भुरळ पाडणा-या गारवा व सांज गारवा या सारख्या मराठी गित व गझलांच्या अल्बम्स मध्ये हा प्रकार अत्यंत लोकप्रिय झाला. या अल्बम्समधील गिते अनेकांचा काळजात घर करून गेली. असे दर्जेदार अल्बम्स केवळ पुण्या मुंबईकडे व केवळ व्यावसायीक स्तरावरच होऊ शकतात असा आपला समज आहे. मात्र घाटंजी तालुक्यातील काही हौशी युवकांनी हा समज सपशेल खोटा ठरवत ‘ओठी तुझ्या असु दे...’ हा एक अप्रतिम मराठी गझल अल्बम साकारला आहे. या अल्बमचा उद्देश व्यावसायीक नसला तरी त्याचा दर्जा मात्र व्यावसायीक स्तराचा आहे.
व्यवसायाने शिक्षक तसेच निवेदक, वादविवादपटू व कवि असलेले रूपेश कावलकर, नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेला युवा गझलकार पुष्कर राऊत, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून स्वरांची साधना करणारा युवा गायक संतोष मानकर व ट्रॅक्टर चालवुन तबल्यावरही थाप देणारे आकपुरी येथिल रवि एकुनकर या चार युवकांनी आदिवासीबहुल घाटंजी तालुक्याच्या मातीत मराठी गझलेचे ‘बिजारोपण’ केले आहे. मराठी गझलेची व्याप्ती वाढावी, आदिवासी भागातूनही नवे गझलकार पुढे यावे हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन तसेच ग्रामिण भागातूनही एक दर्जेदार कलाकृती निर्माण होऊ शकते याच धेय्याने या युवकांनी हा अल्बम साकारला आहे. या अल्बममध्ये रूपेश कावलकर व पुष्कर राऊत यांच्या एकुण सात गझल असुन प्रत्येक गझलेच्या पुर्वी रूपेश कावलकर यांच्या आवाजात त्यांच्याच कवितांचे निवेदन आहे. तर सर्व गझलांना संगित व स्वर संतोष मानकर यांनी दिला आहे. संगित संयोजन यवतमाळ येथिल संजय व संतोष र्इंगोले यांनी तर ध्वनीमुद्रण सुबोध वाळके यांनी केले आहे.
मराठीत गझल हा काव्यप्रकार हाताळणे वाटते तितके सोपे नाही. मात्र या अल्बममधील प्रत्येक गझल शास्त्रशुद्ध आहे. उल्लेखनिय म्हणजे या गझलकारांनी हा अल्बम व्यावसायीक उद्देशाने पुढे आणला नसुन केवळ उत्पादन खर्च निघेल एवढीच अत्यल्प किंमत ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नुकतेच घाटंजी येथे एका कार्यक्रमात या अल्बममधील काही गझल ध्वनिक्षेपकावरून ऐकविण्यात आल्या तेव्हा अनेक घाटंजीकरांनी या अल्बमचे कौतुक केले. हळव्या गझल अन मनाला स्पर्श करणारे निवेदन ओठी तुझ्या असु दे या मराठी गझल अल्बम मध्ये प्रेम, व्याकुळता, विरह, आनंद यासह विवीधांगी भावनांना स्पर्श करणा-या शब्दांची गुंफण आहे. या हळव्या शब्दांना रूपेश कावलकर यांच्या रेशमी आवाजाने चांगलाच रंग चढविला आहे.
‘‘काट्यां शिवाय गुलाबाचही प्रेम कधीच फुलत नाही,
अन त्यांना प्रेम काय कळणार ज्यांना काटा सलत नाही.’’
अल्बममधील पहिल्या गझलेच्या सुरूवातीला असलेल्या कवितेमधील या ओळींमध्ये प्रेमाचा असा मार्मिक अर्थ सांगितला आहे.
तर
‘‘भिजल्या तुझ्या रूपाला, तु सावरून घे ना !
पाण्यात आग मोठी, लागेल पावसाने !! ’’
गझलेतील हा शेर प्रेयसीचे सौंदर्यवर्णन करून जातो.
‘‘ओठी तुझ्या असु दे, बदनाम नाव माझे !
होता कधी सुगीचा हंगाम नाव माझे !! ’’
या गझलेतील शब्दांना संतोष मानकर यांनी अप्रतिम स्वरसाज दिला आहे.
‘‘शेवटी, लांडगा जरी साधू असला
तरी त्याचा भरवसा ठेऊ नये.
अन कसायाच्या हाती कधी
काळीज आपलं देऊ नये ! ’’
या कवितेचे शब्द खुप काही शिकवुन जातात. पुष्कर राऊतने लिहिलेली,
‘‘वेदनांचे गीत माझी आसवे गाणार आहे,
साथ मोलाची तुझे ते नयनही देणार आहे.
एकदा ये सांजवेळी राधीका होऊन माझी
मी पहाटे गोकुळाला सोडुनी जाणार आहे !!’’
हि गझल प्रेमातील व्याकुळता सांगते.
आणी
‘‘जन्माला येणारा प्रत्येक माणुस,
जगात कायमचा रहात नाही.
तरिही माणसं माणसाकडे
माणसासारखी पाहत नाही. ’’

हे रूपेश कावलकरचे शब्द समाजातील वास्तविकता पुढे आणतात
साभार : सकाळ 
By : अमोल राऊत

या अल्बम विषयी अधिक माहितीसाठी खालील Page Like करा 

Thursday, 20 February 2014

यशस्वी होण्यासाठी शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेवा - अमितकुमार राठोड

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कार्यप्रती समर्पण आणी आवड गरजेची असते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात चांगले आदर्श डोळ्यापुढे ठेऊन कार्य केले. जर प्रत्येकाने शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेऊन काम केले तर यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन आय.पी.एस.अमितकुमार राठोड यांनी केले. घाटंजी येथे शिवजयंती उत्सवात वीर राजे संभाजी पुरस्कार स्विकारल्या नंतर ते सत्काराला उत्तर देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे होते. प्रसिद्ध वक्ते प्रा.श्याम मानव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, नगराध्यक्ष राम खांडरे, तहसिलदार एम.एम.जोरवर, ईकलाख खान, शैलेश र्इंगोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
युवकांना प्रेरणादायी असलेल्या भाषणात अमितकुमार राठोड पुढे म्हणाले की, शिवरायांनी भारतीय संस्कृतीला शिखरावर नेण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच आजच्या युवकांनीही स्वत:च्या ईच्छेचा पाठपुरावा करावा. पालकांनी मुलांना त्यांची आवड जपण्यासाठी प्रोत्साहित करावे. माणुस हा त्याच्या सहवासामुळे ओळखला जातो. त्यामुळे चांगल्या लोकांचा सहवास ठेवा असे आवाहन त्यांनी केले. अभ्यासाला दैनंदिनीचा भाग बनवुन त्याचा आनंद घेतल्यास यश मिळणे कठिण नाही असे ते म्हणाले. दरम्यान, ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ उपस्थितांच्या गर्दीमधुन वाजतगाजत व्यासपीठावर आणण्यात आला. हजारो घाटंजीकरांनी उभे राहुन हा सोहळा अनुभवला.
सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्षीय भाषणातून अंधश्रद्धा विरोधी कायदा देशभरात लागु करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी माणसांवर विश्वास ठेऊन कार्य केले. सर्वधर्मियांना संधी दिली. शिवराय लढले म्हणुन जिंकले. त्यामुळे लढायला शिका असे आवाहन त्यांनी केले. घाटंजी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नगर परिषदेला संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाच्या पुर्वी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांचे छत्रपती शिवरायांचा वैज्ञानिक दृष्टीकोण या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे संचालक राजेश उदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक महाकुलकर, प्रपुâल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, अनिल मस्के, श्रीकांत पायताडे, राजु गिरी यांचेसह संभाजी ब्रिगेड व राजे छत्रपती सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ