Pages

Showing posts with label Ghatanji. Show all posts
Showing posts with label Ghatanji. Show all posts

Saturday, 12 April 2014

घाटंजीत आज ऑल इंडीया मुशायरा व कवी संमेलन

देशातील नामांकीत कवींची उपस्थिती
येथिल हजरत बाबा जानेमन जन्नती रहेमत उल्लाह अलैह दर्गा कमेटीच्या वतीने ता.१३ ला सायंकाळी सहा वाजता आझाद मैदानात ऑल इंडीया मुशायरा व कवी संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 
या कवी संमेलनात उर्दू आणी हिंदीतील प्रख्यात शायर व चित्रपट सुष्टीतील गीतकार राहत र्इंदोरी, शमीम फरहत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे देशातील नामवंत शायर उम्मी अहेमदाबादी, कपील जैन, अलताफ जिया,नईम फराज, तंवीर गाजी, मनोज मद्रासी, अ.हक वफा, नसिम  नवाज, आजीम रायपुरी, फिरोज कादरी, इब्राहिम सागर यांचाही या मुशाय-यामध्ये सहभाग राहणार आहे. 
हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी नि:शुल्क असुन घाटंजी शहरात दुस-यांदा अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन होत आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सैय्यद जावेद, सैय्यद अनवर मुशायरा कमेटीचे शेख आबीद, शेख फारूख, सैय्यद सरफराज, विक्रम लामसोंगे, हितेश सुचक, विठ्ठल भोंग, शेख तौफिक, रितेश सहारे, आशिष रामटेके, योगेश निमकर, राहुल ठाकरे, सैय्यद सद्दाम, बंटी मराठे, सैय्यद नादीर, शेख अनवर, साहेबराव मुन यांनी केले आहे.
साभार : सकाळ 

Friday, 2 August 2013

शि.प्र.म. विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती




राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ईयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.) परिक्षेत येथिल शि.प्र.मं.विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. 
समिक्षा संजय कांबळे, शौरी विकास डंभारे, शिवाणी गणेश वल्लपवार, शरयु प्रविण चौधरी, सुबोध राजेश मुनेश्वर,  अनिकेत सुभाष निकम, अजिंक्य दत्ताजी पांढरमिसे, प्रतिक श्रिराम कनाके या आठ विद्याथ्र्यांना ईयत्ता बारावी पर्यंत दरमहा पाचशे रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्याथ्र्यांना संस्थेचे अध्यक्ष एस.ए.गिलानी, उपाध्यक्ष ए.एस.गिलानी, सचिव अ‍ॅड. अनिरूद्ध लोणकर, मुख्याध्यापक बाबा भोंग, उपमुख्याध्यापक पुरूषोत्तम बोभाटे, पर्यवेक्षीका कुसूम महाकाळकर, देविदास टोंगे, जी.आर.सिंहे, एस.जी.राठोड, दिपक सपकाळ, महेश वाघाडे, डी.के.मस्के, मनोज बुरांडे, संदीप नखाते, अनुप मानकर, फिरोज पठाण, प्रशांत उगले, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Saturday, 9 March 2013

घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटू पोहचले आंतरराष्ट्रीय पातळीवर

बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यात सहभाग

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीने तालुक्याचे नाव उंचावणा-या घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटुंनी आता देशाची सिमा ओलांडली आहे. दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यांकरीता या क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. 
तालुक्यातील प्रणित यशवंत घुगरे, राहुल उनकेश्वर राठोड, रत्नदिप दिलीप नगराळे व रविसिंग प्रेमसिंग राठोड हे या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये योटी ग्रुपमार्फ़त भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. फरिदाबाद (हरीयाणा) येथे झालेल्या निवड चाचणीत देशभरातील २०० खेळाडूंमधुन १९ वर्ष वयोगटातील १५ सदस्यीय संघात घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटूंची निवड होणे ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. या खेळाडूंनी जालना, रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे त्यांची कुरूक्षेत्र (हरीयाणा) व दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीच्या सामन्यांसाठी निवड झाली. येथेही त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने निवडचाचणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी योटी ग्रुपच्या संघात त्यांची निवड करण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाजाची भुमिका बजावणारा प्रणित यशवंत घुगरे हा घाटंजीतील ईस्तारी नगर भागात राहतो. तो शि.प्र.मं.विद्यालयात ईयत्ता १० वीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील जि.प.शाळेत शिक्षक आहेत. श्री.समर्थ विद्यालयातील ईयत्ता १०वीचा विद्यार्थी व संघातील उत्कृष्ट फलंदाज राहुल उनकेश्वर राठोड हा नेहरू नगर भागात राहतो. त्याचे वडील शेती करतात. तडाखेबाज फलंदाजीने राष्ट्रीय सामन्यांमध्ये मॅन ऑद द मॅच पुरस्कार पटकाविणारा रत्नदिप नगराळे हा तालुक्यातील ससाणी गावचा आहे. तो शि.प्र.मं.शाळेत दहाव्या वर्गात शिकत असुन वसतीगृहात राहतो. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर मुळचा आर्णी तालुक्यातील बोरगावचा रहिवासी व आर्णीतील सावित्रीबाई फ़ुले विद्यालयाचा १२ वीचा विद्यार्थी रविसिंग प्रेमसिंग राठोड हा संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच तो उत्कृष्ट फलंदाजही आहे. तो मुळचा आर्णी तालुक्यातील असला तरी सरावासाठी तो घाटंजी येथे असतो. त्याचे वडीलही शेती करतात. 
दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशाची राजधानी ढाका यासह विवीध शहरात होणा-या आशियायी सामन्यांमध्ये भारतातून जाणा-या संघामध्ये तालुक्यातील चार खेळाडूंचा समावेश असणार आहे. नुकतेच या दौ-यासाठी निवड झाल्याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना योटी रूरल क्रिकेट असोशिएशन तर्फ़े पाठविण्यात आले आहे. या सर्व क्रिकेटपटूंना शिरोली ता.घाटंजी येथिल राष्ट्रीय पातळीवरील धावपटू व क्रिडा मार्गदर्शक राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती