Pages

Thursday, 20 February 2014

यशस्वी होण्यासाठी शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेवा - अमितकुमार राठोड

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कार्यप्रती समर्पण आणी आवड गरजेची असते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात चांगले आदर्श डोळ्यापुढे ठेऊन कार्य केले. जर प्रत्येकाने शिवरायांसारखी धेय्यनिष्ठा ठेऊन काम केले तर यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन आय.पी.एस.अमितकुमार राठोड यांनी केले. घाटंजी येथे शिवजयंती उत्सवात वीर राजे संभाजी पुरस्कार स्विकारल्या नंतर ते सत्काराला उत्तर देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे होते. प्रसिद्ध वक्ते प्रा.श्याम मानव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, नगराध्यक्ष राम खांडरे, तहसिलदार एम.एम.जोरवर, ईकलाख खान, शैलेश र्इंगोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
युवकांना प्रेरणादायी असलेल्या भाषणात अमितकुमार राठोड पुढे म्हणाले की, शिवरायांनी भारतीय संस्कृतीला शिखरावर नेण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच आजच्या युवकांनीही स्वत:च्या ईच्छेचा पाठपुरावा करावा. पालकांनी मुलांना त्यांची आवड जपण्यासाठी प्रोत्साहित करावे. माणुस हा त्याच्या सहवासामुळे ओळखला जातो. त्यामुळे चांगल्या लोकांचा सहवास ठेवा असे आवाहन त्यांनी केले. अभ्यासाला दैनंदिनीचा भाग बनवुन त्याचा आनंद घेतल्यास यश मिळणे कठिण नाही असे ते म्हणाले. दरम्यान, ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ उपस्थितांच्या गर्दीमधुन वाजतगाजत व्यासपीठावर आणण्यात आला. हजारो घाटंजीकरांनी उभे राहुन हा सोहळा अनुभवला.
सामाजीक न्यायमंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्षीय भाषणातून अंधश्रद्धा विरोधी कायदा देशभरात लागु करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी माणसांवर विश्वास ठेऊन कार्य केले. सर्वधर्मियांना संधी दिली. शिवराय लढले म्हणुन जिंकले. त्यामुळे लढायला शिका असे आवाहन त्यांनी केले. घाटंजी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नगर परिषदेला संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाच्या पुर्वी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक प्रा.श्याम मानव यांचे छत्रपती शिवरायांचा वैज्ञानिक दृष्टीकोण या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे संचालक राजेश उदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक महाकुलकर, प्रपुâल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, अनिल मस्के, श्रीकांत पायताडे, राजु गिरी यांचेसह संभाजी ब्रिगेड व राजे छत्रपती सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
साभार : सकाळ 

No comments:

Post a Comment