तालुक्यातील वाढोणा(खु) येथे 'कॅम्पा' अंतर्गत वनविभागाची इमारत आणि सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा इमारतीचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशीक) डॉ. दिनेशकुमार त्यागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पांढरकवडाचे उपवनसंरक्षक अ.पा. गि-हेपुंजे, जि. प. सदस्य योगेश पारवेकर, देवानंद पवार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष इकलाख खान पटेल, पं.स. सभापती शैलेश इंगोले, रफिक पटेल, स्वामी काटपेल्लीवार, संजय आरेवार, रूपेश कल्यमवार, किशोर दावडा, प्रजय कडू पाटील, रमेश आंबेपवार, शालिक चवरडोल आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि वनविभागाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
रामू पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, राजू निकोडे, श्रीकांत देशमुख, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, नायब तहसीलदार जयस्वाल, बाबाराव उदार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन दीपक महाकुलकर, प्रास्ताविक पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मणराव गाडे तर आभार प्रदर्शन चिखलवर्धाचे वनरक्षक शांतीदूत मुळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराम उईके, भाऊराव कोवे, सूर्यभान मेश्राम, सज्जनराव कुडमेथे, हॉफिज पठाण, गजानन भोयर, पारवाचे क्षेत्र सहायक शकील खान, विजय कडू (पहापळ), वाढोणा बीट गार्ड वसंतराव लामतुरे, वैजनाथ बांगर, संजय जिरकर, नरेंद्र मस्के, राजू गोटे, पवन बाजपेयी, विलास पतंगे, गजानन गहुकार, श्रीकृष्ण येसनसुरे, विजय शुक्ला, पाटापांगराचे क्षेत्र सहायक जगदीश पेंदोर यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment