जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांचे बंधु व विवीध खेळांचे क्रिडा मार्गदर्शक अनिल लोणकर यांचे काल (दि.२२) ला ह्नदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. आज दुपारी १२ च्या सुमारास शिरोली येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शिरोली येथे राजकीय नेते, अधिकारी तसेच हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात अनिल लोणकर यांचे नाव आदराने घेतल्या जाते. ते एक उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू होते. तसेच कबड्डी, खो-खो या खेळांचे मार्गदर्शक म्हणुनही त्यांनी कार्य केले होते. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. सभेचे प्रास्ताविक रामदास दरणे यांनी केले. सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे यांचेसह अनेकांनी यावेळी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार उत्तमराव पाटील, जि.प. अध्यक्ष राहुल ठाकरे, उपाध्यक्ष रमेश मानकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, यवतमाळचे नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, जि.प.सदस्य प्रविण देशमुख, तातु देशमुख, वसंत घुईखेडकर, बाबासाहेब गाडे पाटील, माजी आमदार डॉ. संदिप धुर्वे, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर, अशोक बोबडे, शि.प्र.मं.घाटंजीचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी, सचिव अनिरूद्ध लोणकर, विजय मोघे, देवानंद पवार, भरत राठोड यांचेसह राजकीय, सामाजीक क्षेत्रातील नागरिकांनी शिरोली येथे उपस्थिती दर्शविली. घाटंजी तालुक्यातील हजारो नागरीक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment