Thursday, 6 October 2011
Tuesday, 4 October 2011
घाटंजीचा दुर्गोत्सव भाग १
![]() |
| सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, आठवडी बाजार, घाटंजी |
![]() |
| आदर्श दुर्गोत्सव मंडळ, आठवडी बाजार, घाटंजी |
![]() |
| पंचमहा दुर्गोत्सव मंडळ, राममंदीर, घाटंजी |
![]() |
युवाशक्ती दुर्गोत्सव मंडळ, संत मारोती महाराज वार्ड, घाटंजी |
![]() |
| नवयुवक दुर्गोत्सव मंडळ, शिवाजी चौक, घाटंजी |
![]() |
| नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ, वसंत नगर, घाटंजी |
![]() |
| नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ, अंजी नुसिंह, ता.घाटंजी |
![]() |
| मामाश्री शारदोत्सव मंडळ, घाटी, घाटंजी |
![]() |
| जय दुर्गोत्सव मंडळ, जेसिस कॉलनी, घाटंजी |
![]() |
| जय बजरंग दुर्गोत्सव मंडळ, प्रोफेसर कॉलनी, घाटंजी |
![]() |
| एकविरा दुर्गोत्सव मंडळ, ढगलेंचा वाडा, घाटंजी |
![]() |
| बालयुवा दुर्गोत्सव मंडळ, दुर्गा माता वार्ड, घाटंजी |
Saturday, 1 October 2011
ऋषीकेश पोहरेंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा घाटंजीत निषेध
देशोन्नतीचे कार्यकारी संचालक ऋषीकेश पोहरे यांच्यावर असामाजीक तत्वांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा घाटंजी तालुक्यातील पत्रकारांनी तिव्र निषेध नोंदविला. स्थानिक विश्राम भवनात जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पत्रकारांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत तिव्र संताप व्यक्त करण्यात आला. शासनाने पत्रकार हल्ला विरोधी कायदा त्वरीत मंजुर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऋषीकेश पोहरे यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन घाटंजीचे तहसिलदार संतोष शिंदे यांना देण्यात आले. यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी विठ्ठलराव कांबळे, सकाळचे तालुका प्रतिनिधी पांडुरंग निवल, देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी अमोल राऊत, लोकशाही वार्ताचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत ढवळे, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी राजू चव्हाण, लोकमतचे शहर प्रतिनिधी महेंद्र देवतळे, लोकमतचे प्रतिनिधी सुधाकर अक्कलवार, मातृभूमीचे तालुका प्रतिनिधी वामनराव ढवळे, साप्ताहीक अंकुरचे संपादक बाळासाहेब ठाकरे, हिंदुस्थानचे शहर प्रतिनिधी सैय्यद आसिफ, जनमाध्यमचे तालुका प्रतिनिधी जितेश सहारे, साहसिकचे तालुका प्रतिनिधी वैभव जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
साखरा जि.प.शाळेत ५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा
तालुक्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने पालकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी शाळेत खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच या पाच विद्यार्थ्यांना मळमळु लागले. ओका-या झाल्याने या चिमुकल्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर तिन विद्यार्थ्यांना घाटंजी येथिल ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर दोन विद्यार्थ्यांना खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. सागर किसन राठोड (वर्ग ३ रा), लखन इंद्रजित राठोड (वर्ग २ रा) , संदेश विलास राठोड (वर्ग २ रा), राहुल विष्णु दंडांजे (वर्ग ४ था), सुशिल सदानंद शिसले (वर्ग २ रा) असे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. यातील तिन विद्यार्थ्यांवर ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या शाळेत नेहमीच निकृष्ट दर्जाची खिचडी देण्यात येत होती तसेच खिचडीतुन अनेकदा अळ्या निघत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करीत होते. मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पं.स. सदस्य सहदेव राठोड, प्रभारी गटविकास अधिकारी अजय राठोड, गटशिक्षणाधिकारी जुमनाके यांनी रूग्णालयात जाऊन या विद्यार्थ्यांची विचारपुस केली.
रो.ह.यो.ला वसंतराव नाईकांचे नाव द्या
सहदेव राठोड यांची मागणी
देशात सध्या राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी येथिल पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी केली आहे. महाराष्ट्रात १९७३ साली भिषण दुष्काळ पडला असतांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मागेल त्याला काम या तत्वावर हि योजना सुरू केली होती. दुष्काळाच्या काळात उदरनिर्वाहासाठी ही योजना अतिशय प्रभावी ठरली होती. महाराष्ट्रापासुन प्रेरणा घेऊन ही योजना सध्या देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेचे जन्मदाते वसंतराव नाईक असल्याने त्यांचेच नाव या योजनेला देणे अधिक संयुक्तीक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सहदेव राठोड यांनी केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)















