Pages

Showing posts with label दारू. Show all posts
Showing posts with label दारू. Show all posts

Wednesday, 27 March 2013

घाटंजीत ‘ड्राय डे’ ला वाहतो दारूचा महापुर

छुप्या मार्गाने होते दारू विक्री
पोलीसांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
धुलिवंदन व तत्सम दिवशी दारू विक्री बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतात. मात्र असे असले तरी घाटंजी शहर व तालुक्यात ‘ड्राय डे’ ला सुद्धा मागेल त्याला देशी विदेशी दारू उपलब्ध होते. अवैध व्यवसायाला पोषक ठरत असलेल्या घाटंजी तालुक्यातील पोलीस यंत्रणेच्या जाणिवपुर्वक दुर्लक्षामुळे हा प्रकार आजतागायत सुरू आहे. ‘ड्राय डे’ ला अवैध दारू सोबतच परवाना प्राप्त देशी व विदेशी दारूची दुकाने बाहेरून बंद तर आतून सुरू असतात. बार मध्ये काम करणारे ‘बंद’ दुकानाबाहेर उभे असतात. मद्यशौकीन हळुच त्यांचेजवळ जाऊन हातात पैसे ठेवतात. मागील दारातून जाऊन त्यांना अवघ्या दोन मिनिटात मागणीनुसार दारू पुरविण्यात येते. सर्वसामान्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो. मात्र या दारू विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे कोणीही या प्रकाराची तक्रार करण्यास धजावत नाही. तर पोलीस मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. घाटंजी शहरातील आठवडी बाजार, यवतमाळ रोड, खापरी नाका या भागातील काही बारमधुन ‘ड्राय डे’ ला छुप्या मार्गाने दारूविक्री होते हे सर्वश्रुत आहे.
धुलिवंदनाच्या सणाला दारू पिण्याचा विचित्र पायंडा गेल्या काही वर्षात पडल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्याचा हा उत्सव आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासुन याला विकृत स्वरूप येऊ लागले आहे. मद्यधुंद अवस्थेत अश्लिल हातवारे करीत धिंगाणा घालणे म्हणजेच रंगपंचमी असाच समज काही तळीरामांनी करून घेतला आहे. रंगपंचमी दारू पिऊन व मांसाहार करून एन्जॉय करण्याची एक फॅशन पडत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने युवावर्ग दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. दारू पिऊन धिंगाणा घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. दारूची दुकाने, बार बंद ठेवण्याचा आदेश असतानाही अनेक जण पिऊन झिंगताना दरवर्षी दिसतात.  होळी हा एकच सण नव्हे, तर प्रत्येक सणाला पिऊन धिंगाणा घातल्याशिवाय तो सण साजरा करायचाच नाही, असा निश्चय केलेले तळीराम दिवसेंदिवस वाढत आहेत. दारूच्या धुंदीत जिवघेण्या वेगात दुचाकी चालविणे, सायलेंसर काढुन ध्वनी प्रदुषण करणे, रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत नाचणे, मारामारी व भांडणाने रंगोत्सवाचा बेरंग होत असताना पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक आहे. एखादा गंभिर प्रकार घडल्यावरच त्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंध घालणे सोयीस्कर ठरणार नाही का याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. 
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 19 December 2012

दारू विक्रीच्या संशयातून पोलीसांचा साक्षगंधाच्या कार्यक्रमात गोंधळ


जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

घरात अवैध दारू विक्री केल्या जात असल्याचा संशय घेऊन घाटंजी पोलीसांनी भांबोरा येथे साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असतांना घरझडती घेतली. तसेच कुटूंबीयांना धाकदपट व मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, १४ डिसेंबर रोजी भांबोरा येथिल प्रेमसिंग चव्हाण यांचे घरी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम होता. यादरम्यान अचानक घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर, बिट जमादार गुल्हाणे, पोलीस कॉन्स्टेबल बोकडे तिथे आले. ‘तुम्ही दारूचा व्यवसाय करता, त्यामुळे तुमच्या घराची झडती घ्यायची आहे’ असे सांगुन पोलीस घरात घुसले. झडती दरम्यान घरातील सामानाची फेकाफेक  केली. यावेळी साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी चव्हाण यांचे घरी पाहुणे सुद्धा आलेले होते. पोलीसांनी संपुर्ण घराची झडती घेतली. प्रेमसिंग चव्हाण यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तडकाफडकी उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकाराने घाबरलेले पोलीस तेथुन निघुन गेले. असे यशोदा प्रेमसिंग चव्हाण यांनी तक्रारीत नमुद केले आहे. उल्लेखनिय म्हणजे घरझडती मध्ये पोलीसांना काहीही गैर आढळले नसल्याची माहिती आहे. शिवाय ज्यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यांच्यावर यापुर्वी अशा प्रकारच्या व्यवसायात लिप्त असल्याबाबत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. मग पोलीसांनी अचानक अशी झडती घेण्याचे कारण काय? संपुर्ण तालुक्यात अवैध व्यवसायाचे नेटवर्क  व्यवस्थित सुरू आहे. अशा व्यवसायांची झडती पोलीसांनी अद्याप का घेतली नाही. पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे पोलीसांना का दिसत नाहीत असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहे. अवैध व्यावसायीकांना पोलीसांचा धाक वाटत नसला तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र आता पोलीसांचीच भिती वाटायला लागली आहे. यावर प्रतिक्रीया घेण्यासाठी ठाणेदार अंबाडकर यांचेशी संपर्वâ होऊ शकला नाही. 
साभार :- देशोन्नती  

Tuesday, 11 September 2012

दारू पिण्यास १० रू मागितले म्हणुन निर्घुण खुन



दारू पिण्यासाठी दहा रूपये मागितले म्हणुन एकाने लाकडाच्या मोठ्या दंडूक्याने महादेव जयवंत मेश्राम (४५) याचा निर्घुण खुन केला. तालुक्यातील शिवणी पोडावर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही भयंकर घटना घडली. याबाबत माहिती अशी की, मृतक मारोती भिमा कोवे याने आरोपी महादेव जयवंत मेश्राम (४०) यास दारू पिण्यासाठी दहा रूपये मागितले. यातुनच दोघांमध्ये वाद व त्यानंतर झटापट झाली. आरोपीने बाजुलाच पडून असलेल्या लाकडाच्या दांडक्याने मारोती कोवेच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे मृतक जागीच कोसळुन गतप्राण झाला. पोलीसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले करीत आहे.
साभार :- देशोन्नती