नवयुवक दुर्गोत्सव मंडळाचा उपक्रम
येथिल नवयुवक दुर्गोत्सव मंडळातर्फे अष्टमीच्या दिवशी आयोजीत महाआरती, वेशभुषा व आरती ताटसजावट स्पर्धेला घाटंजीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सुमारे ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला तर आरतीला शेकडो भाविकांची उपस्थिती होती. झाशीची राणी, शिवाजी महाराज, राधा कृष्ण यासह अस्सल मराठमोळ्या वेषात आलेले चिमुकले, युवक - युवतींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. वाद्याच्या निनादात झालेल्या आरतीमध्ये भाविक तल्लीन झाले होते. आरतीनंतर करण्यात आलेल्या नयनरम्य आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
उत्कृष्ट वेशभुषा व ताटसजावट स्पर्धेत स्व. विशाल दिडशे स्मृती प्रित्यर्थ २ हजार १०१ रूपयांचे प्रथम पारितोषीक दर्शना वानखडे हिने पटकावले. अतुल दरेकार तर्फे प्रायोजीत १ हजार ५०१ रूपयांचे द्वितीय पारितोषीक निशा गवळी, जलाराम कॉम्प्युटर्स तर्फे प्रायोजीत १००१ रूपयांचे तृतिय पारितोषीक दिव्या उईके तर सोहेल हिराणी द्वारा प्रायोजीत ५०१ रूपयांचे चौथे पारितोषीक अथर्व पवार यांनी पटकावले. तर नयन व वंशिका खांडरे, अंकुश सरवैय्या यांना प्रोत्साहनपर पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषीक वितरण कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, कळंबचे तहसिलदार काळे, न.प.शिक्षण सभापती राम खांडरे, मंडळाचे अध्यक्ष गोलु फुसे, उपाध्यक्ष गणेश अस्वले, सचिन भोयर, सचिव मनोज हामंद यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परिक्षण उमा ठाकरे, प्रमोद ठाकरे, प्रा.देवदत्त जकाते, रूपेश कावलकर, अमोल राऊत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रमोद खांडरे, मोनु पांडे, अनिल गोरे, लक्ष्मण दिडशे, पिंटू झाडे, अजय दुबे, बालु किरणापुरे, चेतन राठोड, राहुल ऊईके, शुभांशु शुक्ला, राहुल खांडरे, निखिल ठाकरे, अजहर चौहान, अमोल भडांगे, बाबु किरणापुरे, किरण मोरे, प्रतिक उईके, मंगेश खांडरे, सचिन फुसे, राहुल कडू, राजु बोबडे, प्रविण रागीलवार, चेतन हर्षे, प्रकाश मोरे, प्रशांत सोनुले यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
प्रो.प्रा.अमोल वारंजे
छायाचित्र सौजन्य
माया डिजीटल फोटो स्टुडीओ, शिवाजी चौक घाटंजी
No comments:
Post a Comment