रूचिता अवचित द्वितीय तर पुजा उत्तरवार तृतिय
स्त्री भ्रुणहत्येसारख्या पातकाला रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे असुन त्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन घाटंजी न.प. सभापती तथा लॉयनेस क्लबच्या तालुका अध्यक्षा संगिता भुरे यांनी केले. लेक वाचवा मोहिमेंतर्गत स्त्री भ्रुणहत्या - एक सामाजीक कलंक या विषयावर आयोजीत खुल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. युवा पिढीने लेखनीच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवावे अशी गरज त्यांनी बोलुन दाखविली. या कार्यक्रमाला वर्षा गुज्जलवार, माधुरी चौधरी, माया यमसनवार, साधना ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषीक पुर्वा ठाकरे, द्वितीय रूचिता विजय अवचित, तृतिय पुजा उत्तरवार, चौथे सिमा अलोणे तर पाचवे बक्षीस शिवाणी चौधरी हिने पटकावले.
शिवाय प्रज्वल गुघाणे, प्रांजली दहिवले, माया चौलमवार, जान्हवी चौधरी, नेहा अवचित, व संकल्प गोबाडे यांना प्रोत्साहनपर पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातून एकुण २७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन सिमा ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधना ठाकरे, प्रमोदिनी ताम्हने, सिमा राऊत, सिमा अलोणे, पुजा उत्तरवार, प्रिती अंजीकर, कल्पना आचलिया, मंगला आचलिया, सपना केशट्टीवार, मोहिनी ढोणे, साक्षी बेलोरकर, माया कटकमवार, संध्या उपलेंचवार, सुषमा चौधरी, वीणा अंजीकर, वर्षा माडूरवार, विजया पामपट्टीवार, रूपा अटारा यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment