Pages

Showing posts with label श्रिराम. Show all posts
Showing posts with label श्रिराम. Show all posts

Monday, 22 April 2013

रामभक्तांच्या लाटेने मोडले गर्दीचे उच्चांक

घाटंजीत रामनवमी शोभायात्रेचा अभुतपुर्व जल्लोष

सर्वत्र रामनामाचा गजर, ढोलताशांचा निनादात ठेका धरून नाचणारी तरूणाई व रत्यावरून ओसंडून वाहणारा अलोट जनसागर अशा भक्ती जल्लोष व उत्साहाच्या वातावरणाने यंदाची रामनवमी शोभायात्रा अविस्मरणीय झाली. उल्लेखनिय म्हणजे रामनवमीच्या गर्दीने गतवर्षीचा विक्रमही मोडीत काढला. गिलानी महाविद्यालयापासुन ते शिवाजी चौकापर्यंत संपुर्ण परिसर आबालवृध्द व महिलांच्या गर्दीने व्यापला होता. ‘पाय ठेवायलाही जागा नव्हती’ या वाक्याला शोभायात्रेच्या निमित्ताने खरा अर्थ मिळाला. येथिल जलाराम मंदिरापासुन सायंकाळी ७ वाजेदरम्यान शोभायात्रेची सुरूवात झाली. अष्टधातुचा रत्नजडीत रामरथ शोभायात्रेत अग्रस्थानी होता. भारतमाता, रामभक्त हनुमान, प्रभु श्रिराम यासह विवीध देखावे साकारण्यात आले होते. नेत्रदिपक रोषणाईने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. महाराणा प्रताप चौक, सिनेमा टॉकीज चौक, जुना बसस्थानक चौक, पोलीस स्टेशन चौक असे मार्गक्रमण करीत शोभायात्रा शिवाजी चौकात विसर्जीत करण्यात आली. अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीने पाणी, मठ्ठा, सरबत, महाप्रसादाचे ठिकठिकाणी स्टॉल्स लावले होते. उल्लेखनिय म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांनी शोभायात्रेत सक्रीय सहभाग घेतला. एवढ्या मोठ्या संख्येने जनसागर व त्या तुलनेत अत्यंत तोकडा पोलीस बंदोबस्त असुनही आजवर येथे कोणतीही अनुचीत घटना घडली नाही हे विषेश उल्लेखनिय. या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शोभायात्रेचे संयोजक विक्रम जयस्वाल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. 

रामनवमी शोभायात्रेची निवडक छायाचित्रे
छायाचित्र सौजन्य
अंकुश ठाकरे (मैनाई फोटो स्टुडीओ), मिलिंद लोहकरे (मयुर मोबाईल, घाटंजी)
































Sunday, 10 February 2013

श्रिराम बाल संस्कार केंद्राच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचे कलाविष्कार




येथिल श्रिराम बाल संस्कार केंद्राच्या वार्षीक स्नेहसंमेलनात हस्तकला, नृत्य, अभिनय यासह चिमुकल्यांच्या विवीध कलाविष्कारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. तिन दिवशीय स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न.प.अध्यक्ष किशोर दावडा होते. नगरसेवक राम खांडरे, शासकीय अध्यापक विद्यालयाच्या अध्यापीका डॉ.हेमलता तुरणकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिवंगत आमदार निलेश पारवेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांनी बनविलेल्या शैक्षणीक साहित्य प्रदर्शनीचे उद्घाटन केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कवायत, लेझीम, डंबेल्स, घुंगरू काठी, नृत्य, भाषण  असे विवीध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रा.तुरणकर यांनी मुलांचे मानसशास्त्र व त्यांची जोपासना या विषयावर मार्गदर्शन केले. वार्षीकोत्सवाच्या निमित्ताने यवतमाळ येथिल प्रसिद्ध वक्ते उमेश वैद्य यांचे विद्यार्थी शिक्षक आणि पालक या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. 
स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मधुसूदन चोपडे होते. यावेळी नगर सेविका संगिता भुरे, मिनाक्षी व्यवहारे, विणा सोनटक्के, निता पानट, रामदास नखाते, श्याम पानट, मधुकर व्यवहारे, ऋचिता कुळकर्णी, उमेश सोनटक्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापीका सुचिता पानट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा पानट, बॉबी दिकुंडवार, शिल्पा वातिले, सुरेखा निकोडे, पुजा कहाळे, आरती जाधव, शुभांगी ठाकरे, भारती वाळके, सरला भोयर, प्रिती वघरे, प्रिया वातिले, विजया पामपट्टीवार यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती