Pages

Sunday, 28 December 2014

वक्तृत्व स्पर्धेत वैभव पांगूळ प्रथम, प्रणाली तोंडरे द्वितीय

स्वच्छता मित्र करंडकात समर्थ विद्यालयाचे सुयश
स्थानिक शि.प्र.मं.गिलानी महाविद्यालयात झालेल्या स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत श्री समर्थ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. समर्थ कनिष्ठ विजान महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव गजानन पांगूळ याने पहिला क्रमांक पटकावून पाच हजार रूपयांचे बक्षिस मिळवीले तर प्रणाली वामन तोंडरे हिने द्वितीय क्रमांक मिळवीत तिन हजार रूपयांचे रोख पारितोषीक पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापीका विमल मानकर, उपमुख्याध्यापक मिलिंद काळे, पर्यवेक्षीका नंदिनी ठाकुर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत समर्थ विद्यालय द्वितीय

तालुक्यातील श्री गजानन महाराज अ.जा.प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, तिवसाळा येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये येथिल श्री समर्थ विद्यालयाच्या प्रयोगाने द्वितीय क्रमांक पटकावला. समाजस्वास्थ्यासाठी गणित व विज्ञान या मुख्य विषयांतर्गत कचरा व्यवस्थापन यावर आधारित ’थिंक ग्लोबली अ‍ॅक्ट लोकली’ हा प्रयोग साकारण्यात आला होता. हा प्रयोग माध्यमिक गटातील सिद्धी मांडवगडे व प्रतिक्षा शास्त्री यांनी साकारला. त्यांना श्रीमती नगरे व तिवारी यांचे मार्गदर्शन मिळाले. 
तिवसाळा येथे झालेल्या समारंभात समर्थ विद्यालयातील शिष्यवृत्ती प्राप्त वेदांत शेवतकर, शिवम कुडमते, उर्मिला मेश्राम, यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाचे मुख्याध्यापीका विमल मानकर, उपमुख्याध्यापक मिलिंद काळे, पर्यवेक्षीका नंदिनी ठाकुर यांचेसह शिक्षकवृंद व कर्मचा-यांनी कौतुक केले.

Thursday, 25 December 2014

घाटंजीत चिमुकल्यांनी उधळले कल्पनांचे रंग

सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेला अभुतपुर्व प्रतिसाद







पहाटेची गुलाबी थंडी...निसर्गरम्य परिसरात विवीध विषयांवरील कल्पनांना कागदावर रेखाटण्यात तल्लीन झालेली मुले...बालमनाची निरागसता मुलांनी काढलेल्या चित्रातून प्रतिबिंबीत होत होती. अशा वैविद्यपुर्ण वातावरणात झालेल्या सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. 
घाटंजी शहरातील सर्व शाळेतील विद्याथ्र्यांनी स्पर्धेत उत्स्पुâर्त सहभाग घेतला. येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयात हि स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेदरम्यान घाटंजी न्यायालयाचे न्यायमुर्ती तेजवंतसिंग संधु, तहसिलदार एम.एम.जोरवर, पंचायत समिती सभापती शैलेष इंगोले, ठाणेदार भरत कांबळे, गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, नगर परिषदेचे शिक्षण सभापती संदिप बिबेकार, पोलीस उपनिरिक्षक रमेश येडमे, अ‍ॅड निलेश चवरडोल, एस.पी.एम.र्इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक प्रा.एम.आर.शुक्ला, स्थानिक पत्रकार यांनी सदिच्छा भेट देऊन दै.सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले. 
या स्पर्धेमध्ये शि.प्र.मं.मुलांची शाळा, एस.पी.एम.इंग्लिश मिडीयम स्कुल, श्री समर्थ विद्यालय, शि.प्र.मं.कन्या शाळा, श्री गजानन महाराज इंग्लिश मिडीयम स्कुल, श्री समर्थ कर्णबधीर विद्यालय, नगर परिषद शाळा क्र.१, २, ३, ४, ५, नगर परिषद उर्दू हायस्कुल, या शाळांमधील विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी वेंâद्रप्रमुख म्हणुन येथिल प्रसिद्ध चित्रकार प्रमोद ठाकरे व सौ.उमा ठाकरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेला माजी नगराध्यक्ष राम खांडरे, प्रियदर्शीनी मुलींच्या वस्तीगुहाचे प्रदिप वाकपैंजन, मिराताई वाकपैंजन, जितेंद्र सहारे, प्रशांत आडकिणे, मिलिंद लोहकरे, संतोष नगराळे, अमोल वारंजे, युधिष्ठीर राऊत, यांचेसह 
राजेश उदार, प्रदिप जाधव, राम बेजारपवार, आकाश राऊत, दिपक सपकाळ, संदिप दिडशे, एस.के.ताजने, हि.गं.येन्नरवार, डी.आर.राऊत, जी.एम.बंडीवार, अनिकेत निंबाळकर, यु.एच.मसराम, संचित राऊत, अभय र्इंगळे, आकाश राऊत, एस.व्ही राठोड, प्रशांत उगले, एस.डी.नगराळे, ए.एन.रामटेके, जी.जी.गिनगुले, कु.शा.मडावी, प्रशांत गवळी, विशाल साबापुरे, गितांजली राऊत, विशाल कदम, कु.सबिहा अरशिद, पी.जी.चौधरी, एम.एस.गिरी, प्रदिप भारती, अनिल मस्के, सुरेश राठोड, निखिल पवार, मनोज बुरांडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, एस.पी.एम.इंग्लिश मिडीयम स्कुल, सिद्धार्थ वस्तीगुह यांनी सहकार्य केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सकाळचे घाटंजी तालुका बातमीदार अमोल राऊत, शहर बातमीदार पांडूरंग निवल, उज्वल सोनटक्के यांनी पुढाकार घेतला.
उमलत्या प्रतिभांना संधी देणारा उपक्रम : 
न्यायमुर्ती तेजवंतसिंग संधू
लहान मुले हि देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्या कल्पनेतूनच उद्याच्या भारताची जडणघडण होणार आहे. त्यामुळे या बालकांच्या उमलत्या प्रतिभांना संधी देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची प्रतिक्रीया घाटंजी न्यायालयाचे न्यायमुर्ती तेजवंतसिंग संधु यांनी दिली. विद्याथ्र्यांच्या कलागुणांना प्रोत्साहीत करण्यासाठी असे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय श्री समर्थ कर्णबधीर विद्यालयातील अपंग विद्याथ्र्यांनी काढलेल्या चित्रांचे त्यांनी कौतुक केले. तसेच यावेळी अनेक विद्याथ्र्यांशी संवाद साधुन त्यांना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेतील टिपलेले काही क्षण.....!
(छायाचित्र : अमोल वारंजे, मिलिंद लोहकरे, अमोल राऊत)



























 















Monday, 8 December 2014

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करा


गुरूदेव सेवा मंडळाचे आ. राजू तोडसाम यांना निवेदन
 आपल्या क्रांतीकारी भजनांच्या माध्यमातून स्वातंत्र्यपुर्व काळात महाराष्ट्रासह देशभरात नवचैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत नाही. त्यामुळे आगामी अधिवेशनात या संदर्भात सभागुहात प्रश्न उपस्थित करून राष्ट्रसंतांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आपली आग्रही भुमिका मांडावी या मागणीचे निवेदन गुरूदेव सेवा मंडळाच्या घाटंजी तालुका शाखेतर्पेâ आमदार राजू तोडसाम यांना देण्यात आले. 
गुरूदेव सेवा मंडळाचे उपजिल्हा सेवाधिकारी अनंत कटकोजवार, तालुका सेवाधिकारी सुभाष देवळे, तालुका प्रचारक अरूण मानकर, युवक प्रमुख अशोक भेंडाळे, प्रेमानंद पेटकुले, दिवाकर गेडाम, रमेश ताटेवार यांच्या शिष्टमंडळाचे या संदर्भात आमदार तोडसाम यांचेशी चर्चा केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ तसेच कन्सर हॉस्पीटल नागपुर शहरात आहे. अनेक अभियानांमध्ये शासन महाराजांच्या नावाचा वापर करते मात्र महाराष्ट्राच्या मातीतील या थोर पुरूषाचे नाव शासनाच्या यादीत नाही. 
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पुरूषांची थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी १० जानेवारी २०१३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात राष्ट्रसंतांच्या नावाचा उल्लेख नाही. विवीध सामाजीक विषयांवरील महाराजांच्या प्रबोधनाला जगात तोड नाही. असे असतांना महाराजांच्या नावाचा शासनाला पडलेला विसर निषेधार्ह आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत शुद्धीपत्रक काढून चुकीची दुरूस्ती करावी अशी गुरूदेव सेवा मंडळाची मागणी आहे.