Pages

Wednesday, 31 August 2011

सायतखर्डा तंटामुक्त समितीकडून गुणवंतांचा सत्कार


तालुक्यातील सायतखर्डा तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नुकताच गावातील गुणवंत विद्यार्थी, महिला बचत गट, व्यसन मुक्त व्यक्ती, तंटामुक्तीसाठी मोलाचे कार्य करणारे नागरीक तसेच ईतर क्षेत्रात नैपुण्य प्राप्त 
करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सायतखर्डा गावाला नुकताच तंटामुक्तीसाठी ३ लाख रूपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष गजानन लेनगुरे व पोलीस पाटील प्रभाकर देशमुख यांचे भरीव योगदान आहे. त्यामुळे याप्रसंगी त्यांचाही शाल श्रीफळ देऊन सरपंच गजानन शेंडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गोबाडे यांनी केले. या सत्कार सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त गाव समिती, ग्रा.पं. सरपंच, सचिव व सदस्य, महिला बचत गट, शिक्षक वृंद व नागरीकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

जिजाऊ ब्रिगेड तर्फे शिवणी जि.प.शाळेत निबंध स्पर्धा

जिजाऊ ब्रिगेड घाटंजी तालुका शाखेच्या वतीने शिवणी जि.प.शाळेत नुकतेच वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. थोर नेत्यांची ओळख या विषयावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्या तिन विजेत्यांना पारितोषीक देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.ए.राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गोपीचंद पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष भावना राऊत, जिल्हा सचिव अनिता गरड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिता व-हाडे, शोभा अलोणे, अंजली अडेकार,कृपाली चौधरी, वर्षा ठाकरे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रगती फुटाणे व आभार प्रदर्शन अरूणा चिंतावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगिता गेडाम, संदिप राऊत, हितेश राठोड यांनी परिश्रम घेतले

Sunday, 28 August 2011

घाटंजीत पोळा सण उत्साहात साजरा

















जनलोकपाल विजयाचा घाटंजीत जल्लोष









गेल्या काही दिवसांपासुन आंदोलनमय झालेल्या घाटंजी शहरात अण्णा हजारेंच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाल्याबद्दल प्रचंड जल्लोष करण्यात आला. येथिल हुतात्मा स्मारकाजवळ सकाळी ११ वाजेपासुन नागरीक एकत्र जमले होते. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास घाटंजी शाखेच्या वतीने हुतात्मा स्मारकाला वंदन करून फटाक्यांच्या आवाजात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौक, दुर्गा माता वार्ड, वसंत नगर येथिल युवकानी ढोल ताशांच्या गजरात शहरातुन विजयी मिरवणुक काढली.
गेल्या आठवडाभरात घाटंजी शहरात अभुतपुर्व आंदोलने झाली. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, कर्मचारी वर्ग यांचेसह सर्वस्तरातील नागरीक या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते.