Pages

Showing posts with label क्रूरकर्मा. Show all posts
Showing posts with label क्रूरकर्मा. Show all posts

Sunday, 17 February 2013

त्या नराधमाला तात्काळ जाहिर फाशी द्या !

अ.भा.माळी महासंघाची मागणी
दोन वर्षाच्या मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून तिला जीवे मारणा-या क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मसराम याचेवर जलदगती न्यायालयात खटला चालवून तातडीने जाहिरपणे फासावर लटकवावे अशी मागणी अ.भा.माळी महासंघाने केली आहे. महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग निकोडे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले. नराधम शत्रुघ्न याने जे कृत्य केले ते मानव जातीला कलंकीत करणारे आहे. अशा राक्षसी प्रवृत्ती समाजात वावरता कामा नये म्हणुन जलदगती न्यायालयात या घटनेचा खटला चालविला जावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी तरोड्याचे सरपंच भारत वाटगुरे, सायतखर्ड्याचे सरपंच गजानन शेंडे, राहाटीचे सरपंच बाबाराव आत्राम, झटाळ्याचे सरपंच रवि मसराम, ससाणीचे उपसरपंच झोलबाजी लेनगुरे, ग्रा.पं.सदस्य संतोष मोहुर्ले, आनंद मंगाम, उत्तम राठोड, शेषराव जाधव, गुणवंत लेनगुरे, सदाशीव ठाकरे, विठ्ठल नैताम उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेही त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
साभार :- देशोन्नती