Pages

Showing posts with label क्रिकेट. Show all posts
Showing posts with label क्रिकेट. Show all posts

Wednesday, 26 June 2013

घाटंजीतील चिमुकल्या क्रिकेटपटूंनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद

चेन्नईला पराभुत करून ‘योटी नॅशनल कप’ विदर्भाकडे
१४ वर्षाखालील संघाची चमकदार कामगिरी

राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणा-या घाटंजीतील चिमुकल्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वल्लभगढ (हरियाणा) येथे झालेल्या ‘योटी इंडीयन नॅशनल कप’ क्रिकेट सामन्यांच्या १४ वर्षाखालील गटाचे विजेतेपद विदर्भ संघाने पटकावले. या संघामध्ये बहुतांश खेळाडू घाटंजी तालुक्यातील आहेत हे विशेष. 
येथिल राष्ट्रीय खेळाडू व क्रिडा प्रशिक्षक राजन भुरे यांच्या मार्गदर्शनात सराव करणा-या या खेळाडूंनी यापुर्वीही अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. करमविर स्टेडीयम, वल्लभगठ, फरिदाबाद (हरियाणा) येथे झालेल्या उपांत्य सामन्यात यजमान हरियाणा संघाचा पराभव करून विदर्भ संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात चेन्नई (तामिळनाडू) संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले. 
विजेत्या संघामध्ये वेदांत बोंडे, प्रथमेश गुघाणे, संकेत देशमुख, गजानन सोनुले, गौरव भोयर, हेमंत राठोड, हर्षल देठे, कौस्तुभ आगे, प्रियांशु वाघमारे, चेश राठोड सर्व रा.घाटंजी व सुबोजीत राय, मित सिंग रा.गोंदीया या खेळाडूंचा समावेश होता. राजन भुरे हे या संघाचे प्रशिक्षक होते. संपुर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा वेदांत बोंडे याने मालिकावीर तर चेश राठोड याने सामनाविर होण्याचा बहुमान पटकावला. पारितोषीक वितरण समारंभाला योटी ग्रुपचे अध्यक्ष प्रताप चौधरी, बि.सि.सि.आय.कोच मोहन दास, कोलकता यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. या यशाबद्दल या चिमुकल्या क्रिकेटपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


                           
                          

Wednesday, 15 May 2013

घाटंजीचे चिमुकले क्रिकेटपटू राष्ट्रीय स्तरावर

गोवा येथिल क्रिकेट सामन्यांमध्ये करणार राज्याचे प्रतिनिधीत्व

विवीध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी गेल्या काही काळात सातत्याने चर्चेत असलेल्या घाटंजी तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. शहरातील तब्बल चार क्रिकेटपटूंची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. 
हे चार चिमुकले क्रिकेटपटू गोवा येथे २२ मे पासुन होणा-या १४ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. प्रथमेश दिलिप गुघाणे, संकेत रमेश देशमुख, कौस्तुभ गणेश आगे व प्रियांशु संजय वाघमारे यांच्या नुकत्याच कोल्हापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय सामन्यातील उत्कृष्ट प्रदर्शनाला लक्षात घेऊन महाराष्ट्र अमॅच्युअर क्रिकेट असोशिएशनने राष्ट्रीय सामन्यांसाठी त्यांची निवड केली आहे.
तोकड्या सोयी सुविधांच्या आधारावर सराव करून जिल्हा, राज्य व आता थेट राष्ट्रीय स्तरापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. हे चारही क्रिकेटपटू अवघ्या ११ ते १३ वर्ष वयोगटातील आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करणारे प्रथमेश गुघाणे व प्रियांशु  वाघमारे व ऑलराऊंडर असलेला कौस्तुभ आगे हे येथिल श्री.समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. तर फिरकीपटू व फलंदाज असलेला संकेत देशमुख हा न.प.शाळा क्रं.५ चा विद्यार्थी आहे. कोल्हापुर येथे त्यांनी प्रशिक्षक राजन भुरे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व केले. उल्लेखनिय म्हणजे यापुर्वी घाटंजीतीलच चार युवा क्रिकेटपटुंची बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यांसाठी निवड झाली होती. चिमुकल्या क्रिकेटपटूंच्या या उत्तुंग भरारीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Friday, 18 January 2013

राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी घाटंजीतील तिन खेळाडूंची निवड


खुल्या गटातील राष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये घाटंजी तालुक्यातील तिन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये एस.पी.एम.विद्यालयाचे विद्यार्थी अतुल शेंडे, शुभम राठोड व सुखराज राठोड (मोवाडा ता.घाटंजी) यांचा समावेश आहे. त्यानी आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाकडून सहभाग घेतला. संस्थेच्या स्नेहसंमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्याना राष्ट्रीय धावपटू राजन भुरे व शारिरीक शिक्षण मार्गदर्शक फिरोज पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. घाटंजी तालुक्यातील खेळाडूंच्या या उत्तुंग भरारीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
साभार :- देशोन्नती 

Friday, 28 December 2012

राष्ट्रीय टि.२० सामन्यांसाठी ४ खेळाडूंची निवड



कुरूक्षेत्र (हरियाणा) येथे दि.२५, २६ व २७ डिसेंबरला होणा-या राष्ट्रीय टि.२० क्रिकेट सामन्यांसाठी घाटंजी तालुक्यातील २ विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील ४ खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये शि.प्र.मं.विद्यालयाचा विद्यार्थी प्रणित घुगरे, समर्थ विद्यालयाचा राहुल राठोड, शिवछत्रपती विद्यालय पाटणबोरीचा अक्षय तोटावार, सावित्रीबाई फुले विद्यालय आर्णीचा रवि राठोड हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या चमुत आहेत. नुकतेच ते कुरूक्षेत्र येथे रवाना झाले. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय धावपटू राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
साभार :- देशोन्नती