सिमारेषेजवळ कुपवाडा जम्मू-काश्मिर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत घाटंजी येथिल लष्करी जवान प्रेम श्रीराम गजभिये (२७) गोळी लागल्याने गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तेथिलच लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो घाटंजी येथील इंदिरा आवास वसाहतीतील रहिवासी आहे. प्रेम गजभिये हा सुमारे आठ वर्षापूर्वी १४ महार बटालियनमध्ये दाखल झाला होता. प्रेमचे वडील सायकल रिक्षा चालक असून आई घाटंजी नगरपरिषदेमध्ये अंगणवाडी शिक्षिका आहे. त्याच्या भावाची घाटंजीत पानटपरी आहे. प्रेमचे आजोबा बुधाराम रामटेके हे सुद्धा लष्करात होते.
साभार :- देशोन्नती
