सौजन्याचे धिंडवडे : बिघडलेल्या एस.टी.बसच्या
प्रवाशांना बसविण्यास नकार
एस.टी.बसमधील वाहकाने प्रवाशांना विनम्र होऊन हात जोडून नमस्कार करावा, स्वत:चे नाव सांगुन त्यांचे स्वागत करावे आणि बस पेâरीबाबत माहिती द्यावी अशा सौजन्यपुर्ण वागणुकीच्या अभियानाला गेल्या एक जानेवारीपासुन सुरूवात झाली. मात्र काल (ता.१७) ला यवतमाळ घाटंजी मार्गावरील प्रवाशांना एका महिला वाहकाने दिलेल्या वागणुकीने हेच का ते एस.टी.चे ‘सौजन्य’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्या महिला वाहकाच्या अपमानास्पद वागणुकीची तक्रार काही प्रवाशांनी घाटंजी बसस्थानकात नोंदविली आहे.
याबाबत माहिती अशी की, काल (ता.१७) ला सकाळी १० वाजेदरम्यान यवतमाळ ते घाटंजी बस क्रं. एम.एच.०७ सी.७७७३ ‘यशवंती’ हि बस यवतमाळ शहरापासुन सुमारे ४ किमी अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. या बसमध्ये वाहक नसल्याने चालकाने प्रवाशांनाच यवतमाळ आगारात मोबाईलद्वारे सुचना देण्यास सांगितली. बस बिघडल्यास त्याच मार्गावरील दुस-या एखाद्या बसमध्ये बसण्याची प्रवाशांना मुभा असते. मात्र त्या दरम्यान तिन बस थांबल्या नाही. तब्बल दोन तास ताटकळत बसल्यावर दुपारी १२ च्या दरम्यान एम.एच.०७-९४३७ क्रमांकाची बस प्रवाशांनी प्रयत्न करून थांबविली. मात्र या बसची महिला वाहक प्रवाशांना बसु देण्यास तयार नव्हती. बसचा वाहक सांगत नाही तोवर बसु देणार नाही असे ती म्हणाली. मात्र या बसला वाहक नसतो, हि बस नॉन स्टॉप आहे, आमचेकडे तिकीट आहे ते तपासा व आम्हाला बसु द्या अशी विनंती प्रवाशांनी केली. मात्र त्या महिला वाहकाने प्रवाशांशी हुज्जत घातली. यावर तुमच्या वरिष्ठांना विचारा, आम्ही आगारात फोन केला होता असेही प्रवाशांनी सांगितले. मात्र मला कुणाशीच देणेघेणे नसल्याचे ती म्हणाली. प्रवाशांची बसजवळ गर्दी झाली असता, ‘कोई बस मे चढा तो जुते से मारूंगी’ असे म्हणत तिने दरवाजा लावुन घेतला व बस निघुन गेली. त्यानंतर ब-याच वेळाने प्रवाशी अन्य एका बसने घाटंजीला पोहचले.
महिला वाहकाच्या या अपमानास्पद वागणुकीची लेखी तक्रार प्रवाशांनी घाटंजी बस स्थानकात केली. तसेच विभाग नियंत्रक व वरिष्ठांकडेही तक्रार करणार असल्याचे प्रविण दोंतुलवार, विवेक गोहाडे, राजु जाधव, तानाजी नैताम, ऊवंâडा मेश्राम, सुनिता जाधव, मिना दोंतुलवार, मिलिंद गजभिये या प्रवाशांनी ‘सकाळ’ ला सांगितले. सदर महिला वाहक नेहमीच प्रवाशांशी उद्धट बोलते व वरिष्ठांनाही जुमानत नाही असेही काही प्रवाशी म्हणाले. एकीकडे एस.टी.महामंडळ सौजन्यपुर्ण सेवेचा गाजावाजा करीत असतांना अशी घटना या अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशा बेलगाम कर्मचा-यांना आधी शिस्तीत आणावे व नंतरच सौजन्याचा विचार करावा असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. त्या महिला वाहकावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.
साभार : सकाळ
No comments:
Post a Comment