अभिषेक ठाकरे : विरोध झाला तरी शेतकरी हिताचे निर्णय घेणार
बाजार समितीने आयोजीत केलेल्या गुरांच्या बाजार लिलावात योग्य बोली न लागल्यामुळे सभापतींनी विशेषाधीकार वापरून लिलाव रद्द करण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता. मात्र पेâरलिलावात एक लाख रूपये जास्त बोली लागल्याने सदर निर्णय बाजार समितीच्या फायद्याचा झाला आहे. त्याबद्दल घाटंजी बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे.
२३ नोव्हेंबर रोजी घाटंजी बाजार समितीने गुरांच्या बाजाराचे वंâत्राट देण्यासाठी लिलावाचे आयोजन केले होते. त्यामध्ये किमान बोली ५ लाख रूपये ठेवण्यात आली होती. मात्र या लिलावात अंतिम बोली ५ लाख ८ हजार एवढीच होती. त्यामुळे सभापतींनी लिलाव प्रक्रीया रद्द केली. त्यानंतर ४ डिसेंबरला पेâरलिलाव घेण्यात आला. त्यामध्ये अंतिम बोली ६ लाख ८ हजार रूपयांची झाली. पहिल्या लिलावापेक्षा तब्बल एक लाख रूपयांचा फायदा बाजार समितीला झाला आहे.
या लिलावाच्या वेळी सभापती अभिषेक ठाकरे, सहाय्यक निबंधक जयंत पालटकर, ख.वि.सं.चे माजी अध्यक्ष बल्लु पाटील लोणकर, विवेक भोयर, आशिष लोणकर, नामदेव आडे, अकबर तंव्वर, नागोराव कुमरे, किशोर चवरडोल, गजानन भोयर, संजय र्इंगळे, रमेश आंबेपवार, सय्यद रफिक, रा.कॉ.तालुकाध्यक्ष संजय गोडे, रा.यु.कॉ.शहराध्यक्ष संजय ढगले, बाजार समिती सचिव कपिल चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिला लिलाव रद्द केल्याने सभापतींवर बरीच टिका झाली होती. मात्र या टिकेचा विचार न करता सभापती ठाकरे निर्णयावर ठाम राहिले. शेतकरी व बाजार समितीच्या हितासाठी कोणाचाही विरोध पत्करण्याची तयारी असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. २०११-१२ व त्यापुर्वी बाजार समितीला गुरांच्या बाजारापासुन ३ लाखांपेक्षाही कमी उत्पन्न मिळत होते.
मात्र गुरांचा बाजार लिलाव पद्धतीने देण्याच्या धाडसी निर्णयामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे बाजार समितीच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडत असतांना प्रत्येक आरोपांचा सामना करीत सुरू असलेली वाटचाल चकीत करणारी आहे.
साभार : सकाळ
No comments:
Post a Comment