देशातील नामांकीत कवींची उपस्थिती
या कवी संमेलनात उर्दू आणी हिंदीतील प्रख्यात शायर व चित्रपट सुष्टीतील गीतकार राहत र्इंदोरी, शमीम फरहत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे देशातील नामवंत शायर उम्मी अहेमदाबादी, कपील जैन, अलताफ जिया,नईम फराज, तंवीर गाजी, मनोज मद्रासी, अ.हक वफा, नसिम नवाज, आजीम रायपुरी, फिरोज कादरी, इब्राहिम सागर यांचाही या मुशाय-यामध्ये सहभाग राहणार आहे.
हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी नि:शुल्क असुन घाटंजी शहरात दुस-यांदा अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन होत आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सैय्यद जावेद, सैय्यद अनवर मुशायरा कमेटीचे शेख आबीद, शेख फारूख, सैय्यद सरफराज, विक्रम लामसोंगे, हितेश सुचक, विठ्ठल भोंग, शेख तौफिक, रितेश सहारे, आशिष रामटेके, योगेश निमकर, राहुल ठाकरे, सैय्यद सद्दाम, बंटी मराठे, सैय्यद नादीर, शेख अनवर, साहेबराव मुन यांनी केले आहे.
साभार : सकाळ