Pages

Monday 29 September 2014

आर्णी-केळापुर मतदार संघात उमेदवारीची अभुतपुर्व ओढाताण

भाजप नेत्यांनी विश्वासाहर्ता गमावली
कॉंग्रेसपुढे मतदारांच्या नाराजीचे आव्हान
सर्वसामान्य मतदार अजुनही संभ्रमावस्थेत
युती व आघाडीमध्ये झालेला घटस्फोट व त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आर्णी-केळापुर विधानसभा मतदार संघात सध्या उमेदवारीसाठी अभुतपुर्व ओढाताण पाहायला मिळत आहे. पक्षनिष्ठा, कार्यकत्र्यांच्या भावना अशा सर्वच गोष्टी आमदारकीच्या स्वप्नापुढे गौण ठरत आहेत. उमेदवारीसाठी पक्ष बदल केल्याने नेमका कोण कोणत्या पक्षाचा आहे हे निवडणुक आयोगाने अंतिम यादी जाहिर केल्यावरच लक्षात येईल असे चित्र आहे. 
उमेदवारीसाठी पक्ष बदल करण्याचा हा प्रकार यावेळी महाराष्ट्रात प्रकर्षाने दिसुन आला. आर्णी - केळापुर देखिल यातुन सुटले नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार धर सोड प्रवृत्तीमुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागळल्या गेली आहे. उमेदवारी देतांना वेळोवेळी बदललेल्या निर्णयांमुळे या पक्षाच्या स्थानिक व वरिष्ठ नेत्यांची विश्वसनियताच दावणीला बांधल्या गेल्याची चर्चा आहे. 
विद्यमान आमदार असतांनाही गेल्या निवडणुकीत भाजपाने डॉ.संदिप धुर्वे यांना उमेदवारी न देता दुस-या मतदार संघातून उमेदवार आयात केला. तरी देखिल डॉ.धुर्वे यांनी बंडखोरी न करता गेली पाच वर्ष पक्षासोबत एकनिष्ठता दाखविली. यावेळी ते उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. यावेळी त्यांनाच भाजपाची उमेदवारी मिळणार असा दावा केल्या जात होता. मात्र काही वरिष्ठ नेत्यांनी राजु तोडसाम यांच्या उमेदवारीसाठी पाठपुरावा केल्याने तोडसाम यांची उमेदवारी निश्चित होणार असे स्पष्ट चित्र दिसल्याने डॉ.संदिप धुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवीली. 
एक माजी आमदार असलेला उमेदवार मिळत असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष डॉ.धुर्वे यांना उमेदवारी देण्यास ईच्छुक होते. डॉ.धुर्वेंनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी घेण्यास ईच्छुक असलेले सेनेचे युवा कार्यकर्ते डॉ.विष्णु उवंâडे नाराज झाले व त्यांनी थेट पक्ष बदल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीने गेलेले राजु तोडसाम यांना ऐनवेळी ए.बी.फॉर्म हा उद्धव येरमे यांचा आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपविभागीय कार्यालय परिसरात भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. अखेर येरमे यांनी भाजपाकडून व तोडसाम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र त्या नंतर पुन्हा राजकारण शिजले व उद्धव येरमे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपाची उमेदवारी पुन्हा एकदा राजु तोडसाम यांच्या पदरात पडली आहे. मात्र या संभ्रमावस्थेमुळे भाजपाची प्रतिमा डागाळल्या गेली आहे.
राज्याचे सामाजीक न्यायमंत्री व मतदारसंघाचे सर्वाधीक काळ प्रतिनिधीत्व केलेले ना.शिवाजीराव मोघे यांच्याप्रती नाराजीचा सुर असला तरी गेल्या वर्षभरापासुन ते निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना उमेदवारीतच बराच काळ गुंतून राहावे लागल्याने ना.मोघे यांचे पारडे आपसुकच जड झाले आहे. शिवाय कार्यकत्र्यांची भक्कम फळी असल्याने त्यांना लोकांपर्यंत पोहोचणे कठिण जाणार नाही. मात्र ते लोकांची नाराजी कशी कमी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ना.मोघे यांच्या सारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचे तोंड दाखविणा-या डॉ.संदिप धुर्वे यांनी आमदारकीच्या काळात केलेली अनेक कामे ही त्यांची जमेची बाजु आहे. शिवाय ना.मोघेंना फक्त धुर्वेच पराभुत करू शकतात अशी भावनाही मतदार संघात रूजल्या गेली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने का कोण जाणे पण त्यांना दोन वेळ दगा दिला. विद्यमान आमदार असतांना गेल्या निवडणुकीतही डॉ.धुर्वेंना भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. तेव्हा उमरखेडचे आमदार अनिल इंगळे हे भाजपाचे उमेदवार होते. मात्र ते डमी उमेदवार असल्याची चर्चा झाल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यावेळी डॉ.संदिप धुर्वे यांनी राजकीय डावपेचांकडे दुर्लक्ष केल्याने उमेदवारी गमावली व यावेळीही नेमके तसेच झाले. शिवाय त्यांना भाजपाचे स्थानिक व जिल्हा पदाधिकारी तसेच नेत्यांची मर्जी सांभाळता आली नाही.

आता भाजपाचे "लेटेस्ट" अधिकृत उमेदवार असलेले राजु तोडसाम यांच्याकडे तरूण कार्यकर्त्याची चांगली फळी आहे. उमेदवारीसाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासुन पुर्वतयारीही केली आहे. शिवाय प्रमुख नेतेही त्यांच्या बाजुने अनुवूâल आहेत. त्यामुळे ते आता नव्या दमाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यात शंका नाही. मात्र पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरीत मतदार संघात ते फारशे परिचीत नाहीत. त्यांच्या संपर्वâही तेवढा नाही. त्यामुळे ना.मोघे व डॉ.धुर्वे यांच्या तुलनेत ते नवखे म्हणुन गणल्या जातील. मात्र तरी देखिल लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट या निवडणुकीतही चालली तर त्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे देखिल महत्वाचे ठरणार आहे. एकुणच आर्णी-केळापुर मतदारसंघात कॉग्रेस, शिवसेना व भाजपामध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच रा.कॉ.चे विष्णु ऊवंâडे हे किती मते घेणार यावरही विजयाचे गणित अवलंबुन राहिल.

अमरावती विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश निमकर

स्थानिक शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयातील मुख्य लिपिक उमेश कृष्णराव निमकर यांची श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत बहुमताने त्यांची निवड झाली. संघटनेचे राष्ट्रीय सचिव व राज्याध्यक्ष राजाभाऊ बडे यांचे हस्ते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासुन ते येथिल गिलानी महाविद्यालयात कार्यरत आहेत. 

त्यांच्या या निवडीचे संस्थेतील कर्मचारी शुक्रचार्य ढोके, पुरूषोत्तम मेश्राम, संजय जाधव, अभय कराळे, प्रकाश भोरे, स्वरूप नव्हाते, अनिल श्रिवास्तव, मोहन गहणेवार, अनिल कापसे, बाबाराव पुâटाणे, विलास करपे, अचल गिरी, दिनेश बोरेकर, सुनिल डहाके, अशोक गिनगुले, दिनेश खांडरे, सुभाष कनाके, अरूण हेडाऊ, अशोक ढवळे, भिमशंकर मुरार, किरण सोनडवले, विलास गुडधे, लक्ष्मण बोरकर, गजानन मडावी, मंदार भुसारी महाविद्यालयातील विद्यार्थी अमित पडलवार, प्रणित ठाकरे, सुहास दिकुंडवार, सुरज टाले, विशाल वाकोडे, गणेश तारक यांचेसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे.

घाटंजी बाजार समितीचे संचालक मंडळ पुन्हा सत्तारूढ

उच्च न्यायालयाने घाटंजी बाजार समिती बरखास्तीचा निर्णय रद्दबातल ठरविल्याने सभापतींसह संचालक मंडळाने आज प्रभार स्विकारला. बाजार समिती संचालक मंडळाच्या कथित गैरव्यवहाराची तक्रार मनसेने केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीवर बरखास्तीची कार्यवाही केली. हि कार्यवाही राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचा आरोप पुर्वी पासुनच होत होता. 
शिवाय न्यायालयात दाद मागण्याची संधी मिळु नये म्हणुन सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रभार काढुन घेण्याची घाई, बाजार समितीची बाजु ऐकुन न घेता घेतलेला बरखास्तीचा निर्णय यामुळे या संपुर्ण कार्यवाहीवरच संशय व्यक्त केल्या जात होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे तक्रारकर्ते तोंडघशी पडले आहेत. 
बरखास्तीची कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय ७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने दिला होता. तक्रारकत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र मनसेने सर्वोच्च न्यायालयात जाणे टाळले. त्यामुळे अखेर आज संचालक मंडळाने प्रभार स्विकारला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, सभापती अभिषेक ठाकरे यांचेसह बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday 14 September 2014

घाटंजी पंचायत समितीत अभद्र युती

ना.मोघे गटाला जबर धक्का
सभापती कॉंग्रेसचे शैलेश इंगोले, उपसभापती भाजपाचे रमेश धुर्वे







कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीमुळे ना.शिवाजीराव मोघेंच्या विरोधी गटाने थेट भाजपाशी हात मिळवणी करीत सभापतीपद मिळविले. तर उपसभापतीपद आयतेच भाजपाच्या पदरात टाकले. ऐन विधानसभेच्या तोंडावर घाटंजी पंचायत समितीमध्ये झालेल्या या अभद्र युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश इंगोले विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसच्याच सुवर्णा निकोडे यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. तर उपसभापतीपदी भाजपाचे रमेश धुर्वे यांनी बाजी मारली. त्यांनी कॉंग्रेसच्या रूपेश कल्यमवार यांचा ४ विरूद्ध २ मतांनी पराभव केला. 
गेल्या २-३ दिवसांमध्ये घाटंजी तालुक्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वर्तमानपत्रातून व्हिप बजावला होता. मात्र ना.मोघेंच्या विरोधी गटाने यावर कुरघोडी करत जिल्हाध्यक्षांचा व्हिप तर धुडकावलाच शिवाय गटनेते म्हणुन शैलेश र्इंगोले यांनी देखिल व्हिप काढला. अखेर आज निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचा एक गट व भाजपाचे सदस्य एकत्र आल्याने चित्र स्पष्ट झाले. एकीकडे राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष व दुसरीकडे घाटंजी मध्ये कॉंग्रेस व भाजपाचे एकत्र आलेले झेंडे पाहुन सर्वसामान्य मतदार मात्र बुचकळ्यात पडला आहे. 
राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जि.प.सदस्य देवानंद पवार यांच्यात निर्माण झालेल्या दुफळीमुळे घाटंजी तालुका कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अवघा जिल्हा अनुभवत असतांना एकेकाळी ना.मोघेंचे मानसपुत्र अशी ओळख असलेल्या देवानंद पवारांनी विधानसभेच्या तोंडावर या निवडणुकीच्या निकालामुळे जबर धक्का दिला आहे. मात्र विधानसभेतही हि अभद्र युती कायम राहणार का? आज कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन असलेले नेते कार्यकर्ते कुणाच्या बाजुने उभे राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस जिंकली...कॉंग्रेस हरली !
अवघे बोटावर मोजण्याईतके सदस्य असलेल्या घाटंजी पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसच कॉंग्रेसच्या विरोधात असल्याने विजय व पराभवाचा एकत्रीत अनुभव घेण्याचा दुर्मिळ योग पक्षाला मिळाला. तर कॉंग्रेस व भाजपाचे नवनियुक्त पदाधिकारी विजयी मुद्रेत बाहेर पडत असतांना माळी महासंघ व काही संतप्त कार्यकत्र्यांकडून मुर्दाबादचे नारे लागल्याने आनंदावर थोडे विरजणही पडले. शेकडो कार्यकत्र्यानी गद्दारांना हाकला, देवानंद पवार मुर्दाबाद, शैलेश इंगोले मुर्दाबाद असे नारे लावले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपुर्ण झाले होते. भाजपाने कॉंग्रेसला निवडणुक कक्षात दिलेली साथ रस्त्यावरही दिसुन आली. भाजप व कॉंग्रेस कार्यकत्र्यांची आपापल्या झेंड्यांसह निघालेली विजयी मिरवणुक अभुतपुर्व ठरली. या निवडणुकीत भाजपाने सत्तेसाठी चक्क कॉंग्रेसचा हात धरल्याने पद मिळवुनही नैतिक पराभव करून घेतला आहे. भाजप सदस्य तटस्थ राहिले असते तर एक चांगला संदेश मतदारांमध्ये गेला असता. तालुक्यात पहिल्यांदाच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाचे सदस्य निवडुन आले. मात्र एक जबाबदार विरोधक म्हणुन भाजपाचे सदस्य कधीच दिसले नाही.