Pages

Friday 31 January 2014

स्नेहसंमेलनात फ्री स्टाईल बाईक रायडींगचा थरार

रस्ता सुरक्षेचा संदेश : युवकांनो फाजिल धैर्य दाखवू नका



येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलना दरम्यान फ्री स्टाईल बाईक रायडींगने युवकांच्या मनाचा ठाव घेतला. राष्ट्रीय रेसर राहुल राठोड व दिलशाद खान यांचे चित्तथरारक बाईक स्टंट्स यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. 
हिलचेयर व्हिली, सुसाईड बर्नाऊट, सिट स्टॅण्ड व्हिली, रोलींग बर्नाऊट यासह विवीध प्रकारचे स्टंट्स युवकांना भुरळ पाडीत होते. मात्र या बाईकर्सनी युवकांना बाईकवर फाजिल धैर्य न दाखविण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मर्यादीत वेगातच बाईक चालवावी. योग्य प्रशिक्षण असल्याशिवाय स्टंट्स करू नये. रस्ता हा सुरक्षीतपणे वाहने चालविण्यासाठी असतो स्टंट्स करण्यासाठी नाही असा संदेशही त्यांनी महाविद्यालयीन युवकांना दिला. या कार्यक्रमातून गोळा झालेला निधी यवतमाळ येथिल वृद्धाश्रमाला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे विद्यार्थी अमित पडलवार, सुहास दिवुंâडवार, निलेश दुल्लरवार, अनुप तारक, पुष्कर कुरजेकर यांनी पुढाकार घेतला. दरम्यान या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विवीध खेळ व क्रिडा स्पर्धा, रांगोळी, थाळी सजावट, वादविवाद, वक्तृत्व, भावगित, कविता वाचन, आनंद मेळावा, पुष्परचना या स्पर्धांसह विवीध सांस्कुतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्याथ्र्यांनी उत्स्पुâर्त सहभाग घेतला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संचालक आर.यु.गिरी, आलिया शहेजाद यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे प्रभारी म्हणुन प्रा.टी.एम.कोटक यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. 
साभार : सकाळ 

1 comment: