Pages

Friday 22 February 2013

३३ वर्षांच्या न्यायदानाचा घाटंजीकरांच्या साक्षीने सन्मान

माजी न्यायमुर्ती गिलानी यांना ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’


 मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती तथा घाटंजी तालुक्याचे भुमीपूत्र एम.एन.गिलानी यांना शिवजयंती उत्सवात यंदाच्या वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली ३३ वर्ष न्यायदानाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, घाटंजीचे नगराध्यक्ष किशोर दावडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिका-यांच्या हस्ते गौरवचिन्ह, मानपत्र व शाल श्रिफळ देऊन माजी न्यायमुर्ती गिलानी यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी हजारो घाटंजीकरांनी उभे राहुन त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
सत्काराला उत्तर देताना माजी न्यायमुर्ती गिलानी म्हणाले की, ज्या मातीत राहुन मी लहानाचा मोठा झालो त्या मातीत होत असलेल्या सत्काराने मन उचंबळून येत आहे. अशा पुरस्काराने कधी गौरव होईल असे कधीच वाटले नव्हते. यावेळी गिलानी यांनी आपल्या लहाणपणाच्या आठवणींना उजाळा दिला. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त करून समाजाची संवेदनशीलता कमी होत असल्याबाबत खेद व्यक्त केला. दिल्लीच्या घटनेवर अवघा देश पेटून उठतो. मग त्यापेक्षाही भयंकर असलेल्या कृत्याचा अपेक्षीत त्या प्रमाणात निषेध होत नाही. समाजाचे मन बोथट झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रसार माध्यमे सुद्धा अशा घटनांना पाहिजे त्या प्रमाणात गांभिर्याने घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात घडलेल्या या घटनेनंतर किती राजकारण्यांनी त्या ठिकाणी भेट देण्याचे सौजन्य दाखविले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्वत:वर होत असलेला अन्याय सहन करण्याची समाजाची मानसिकता होत आहे. अन्याय सहन करू नका, त्याचा प्रतिकार करा. महिलांनी देखिल अन्यायाविरोधात पुढे यावे. प्रसंगी शिवाजीराजांची तलवार उपसावी. मात्र मुकाटपणे राहु नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगुन या विचारांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले.
याप्रसंगी धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या शिरोली येथिल धावपटू महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राजेश उदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक महाकुलकर, प्रपुâल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, राजु गिरी, प्रमोद टापरे, नाना राठोड यांनी परिश्रम घेतले. 

.....अन न्यायमुर्ती भावूक झाले !

वीर राजे संभाजी पुरस्कार स्विकारल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना माजी न्यायमुर्ती गिलानी यांना गहिवरून आले. बराच वेळ त्यांना बोलणेही सुचत नव्हते. बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले. त्यावेळी सर्वत्र शांतता पसरली होती. बालपणाच्या व शैक्षणीक जिवनातील आठवणी सांगतांना ते भावूक झाले होते. भावना बाजुला सारून आजवर नि:पक्षपणे न्यायदान करणा-या न्यायमुर्तींना भावनिक झालेले पाहुन वातावरण गहिवरून गेले होते.
साभार :- देशोन्नती 

Thursday 21 February 2013

यंत्रणेच्या असंवेदनशीलतेमुळे सपनाच्या शोधाची आशा मावळली

पोलीस तपासाचे गौडबंगाल काय?
जनतेचा सवाल
मुरली येथिल गुप्तधन प्रकरणातील आरोपींची जामिनावर मुक्तता झाली. पोलीसांनी ९० दिवसांच्या कालावधीत आरोपपत्रच दाखल न केल्याने त्याचा फायदा आरोपींना झाला. प्रसारमाध्यमे, सामाजीक संघटना व ठराविक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन त्या विरोधात आवाज उठवला. मात्र का कोण जाणे घाटंजी पोलीसांसह जिल्हा पोलीस यंत्रणेने सुद्धा या प्रकरणात अपेक्षीत अशी कर्तव्यतत्परता न दाखविल्याने कोणताही निष्कर्ष न निघता हे प्रकरण थंडबस्त्यात गेले आहे. तालुक्यातील चोरांबा गावची सात वर्षीय चिमुकली सपना गोपाल पळसकर दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता आहे. ती या गुप्तधन शोधणा-या टोळीच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पोलीसांनी सुरूवातीपासुनच या दृष्टीने तपास केला नाही. आरोपी सांगतील तेच बयाण प्रमाण समजुन केवळ कागदी सोपस्कार पार पाडल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार, लक्ष्मण एंबडवार, अरूण ताकसांडे, राजु ताकसांडे यांनी सुरूवातीच्या चौकशीत एकहात्या मारोती मंदिरात हनुमान चालिसा वाचायला गेल्याचे सांगितले होते. त्या नंतर परिस्थिती पाहुन गुप्तधन शोधण्यासाठीच गेल्याची कबुली दिली. मात्र मुलगी सोबत नसल्याचे सांगितले. गुप्तधन शोधणारी टोळी केवळ चार जणांची नसते हे पोलीसांना सांगण्याची गरज नाही. मात्र या प्रकरणात गावक-यांनी पकडून दिलेल्या आरोपी व्यतिरिक्त एकही आरोपी पोलीसांना गवसला नाही. या टोळीने यापुर्वी कुठे गुप्तधन शोधले का? या टोळीत आणखी किती सदस्य आहेत? धन सापडल्यावर त्याची विल्हेवाट ते कशी लावणार होते? यासह कोणत्याच बाबतीत पोलीस तपास पुढे गेला नाही. केवळ दबाव आहे म्हणुनच तपासाचा ‘उहापोह’ करायचा एवढाच एक उद्देश पोलीस तपासात दिसला. 
घटनेच्या दिवसापासुनच पोलीसांची सहानुभूती आरोपींच्या बाजुने असल्याचे दिसुन आले. प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सोडून देणे, गंभिर कलम असतांना केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी, आरोपींना आलिशान गाडीतून नेण्याची मुभा व आता आरोपपत्र दाखल न केल्याने मिळालेला जामिन यावरून पोलीसांच्या एकुणच कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे. त्या टोळीसोबत मुलगी नव्हतीच हे पोलीस आरोपींपेक्षाही ठासुन सांगतांना दिसले. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत. फिर्यादीने मुलीचा आवाज ऐकलाच नसेल. तो त्याचा भ्रम आहे. अशा काथ्याकुटा व्यतिरिक्त पोलीसांनी काही केले नाही. कदाचित ही दोन्ही प्रकरणे वेगळी असुही शकतात. पण बेपत्ता सपनाचा शोध घेऊन पोलीसांनी ते देखिल सिद्ध केले नाही. दोन्ही प्रकरणे ‘वेगळी’ आहेत केवळ हिच बाब सिद्ध करण्याचे  आव्हान पोलीसांनी स्विकारले की काय असे पोलीसांच्या भुमिकेवरून निदर्शनास आले. प्रकरण ‘थंड’ होऊ द्या, सपना नक्कीच सापडेल. असा सुर देखिल ऐकु येत होता. त्यामुळे या प्रकरणा भोवती असलेले संशयाचे मळभ अधिकच गडद झाले. सामाजीक संघटना व तालुक्याबाहेरील नेत्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सि आय डी तपास करण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हा प्रशासनानेही तसा अहवाल पाठविला होता. मात्र चौकशीचा आदेश पुढे सरकलाच नाही. त्यामुळे पाणी नेमके कुठे मुरले? हा प्रश्न उपस्थित झालाय. पोलीस यंत्रणेच्या अक्षम्य अनास्थेमुळे सपना ही आदिवासी मुलगी अजुनही बेपत्ता आहे. तिचा शोध लागून या प्रकरणातील नेमके वास्तव बाहेर येईल याची आशा आता जणु मावळलीच आहे. याला जबाबदार कोण हे आता जनताच ठरविणार आहे.
साभार :- देशोन्नती 

Monday 18 February 2013

न्यायदानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणा-या ‘भुमिपूत्राचा’ आज सन्मान

माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांना ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व घाटंजी तालुक्याचे भुमिपूत्र न्या.एम.एन.गिलानी यांना उद्या दि.१९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवात शिवतिर्थ, जेसिस कॉलनी येथे शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल राहतील. मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, नगराध्यक्ष किशोर दावडा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
राजे छत्रपती सामाजिक संस्था, घाटंजीच्या वतीने दरवर्षी शिक्षण, साहित्य, कला तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या विभुतीला वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येते. यापुर्वी उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, व-हाडी कवी शंकर बडे, मुंबई येथिल शिवस्मारकाचे निर्माते भरत यमसनवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वीर शहिद संजय शिंदे, एच.एम.टी.तांदूळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी हे घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा गावचे मुळ रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणही घाटंजी तालुक्यातच झाले आहे. नागपुर येथिल विधी महाविद्यालयातून त्यांनी विधी स्नातक ही पदवी प्राप्त केली. सन १९८० साली प्रथम न्याय जिल्हाधिकारी व त्यानंतर जिल्हा न्यायाधिश म्हणुन त्यांनी नागपुर, पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी कार्य केले. टाडा या महत्वाच्या कायद्याचे विशेष न्यायाधिश म्हणुन त्यांची नियुक्ती झाली होती हे विशेष. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव य महत्वाच्या पदावर त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. दि.१७ मार्च १९११ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात नियुक्ती झाली. दोन वर्ष त्यांनी या पदावर कार्य केले. नुकतेच ते या पदावरून निवृत्त झाले आहेत. न्यायदानाच्या क्षेत्रात तब्बल ३३ वर्षे निर्भीड, नि:स्पृह व निस्वार्थपणे केलेल्या सेवेचा सन्मान म्हणुन त्यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तत्पुर्वी शिवजयंती महोत्सवात सायंकाळी ५ वाजता शिवपुजन होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ता तथा विचारवंत राजर्षी पाटील (नांदेड) यांचे ‘जिजाऊ शिवबांच्या विचारातूनच महिला अत्याचाराला प्रतिबंध शक्य’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होईल. या सर्व कार्यक्रमांना घाटंजीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती सामाजिक संस्था तथा संभाजी ब्रिगेड, तालुका घाटंजीचे राजेश उदार, दिपक महाकुलकर, प्रफुल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, श्रीकांत पायताडे, राजु गिरी, अनिल मस्के यांनी केले आहे. 

गुलाबी थंडीत हास्याची मेजवानी

अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा पसरलाय. या गोड गुलाबी थंडीत यंदा घाटंजीकरांना मेजवानी मिळणार आहे ती खदखदून हसण्याची. शिवजयंती उत्सवात सायंकाळी ७ वाजता हिंदी हास्य कवी संमेलनाचे आयोजन शिवतिर्थावर करण्यात आले आहे. आपल्या विनोदी व बहारदार संचालनाने देशभरात नावाजलेले हास्य कवी किरण जोशी (अमरावती), मनोज मद्रासी (निजामाबाद), हिंदी वाहिन्यांवरील हास्य कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटविणारे यवतमाळचे कपील जैन (बोरूंदीया) व हास्यकवी राजा धर्माधीकारी (परतवाडा) हे या कवी संमेलनात श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत. अनेकांच्या खास आग्रहास्तव घाटंजीकरांसाठी या नि:शुल्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sunday 17 February 2013

त्या नराधमाला तात्काळ जाहिर फाशी द्या !

अ.भा.माळी महासंघाची मागणी
दोन वर्षाच्या मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून तिला जीवे मारणा-या क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मसराम याचेवर जलदगती न्यायालयात खटला चालवून तातडीने जाहिरपणे फासावर लटकवावे अशी मागणी अ.भा.माळी महासंघाने केली आहे. महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग निकोडे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले. नराधम शत्रुघ्न याने जे कृत्य केले ते मानव जातीला कलंकीत करणारे आहे. अशा राक्षसी प्रवृत्ती समाजात वावरता कामा नये म्हणुन जलदगती न्यायालयात या घटनेचा खटला चालविला जावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी तरोड्याचे सरपंच भारत वाटगुरे, सायतखर्ड्याचे सरपंच गजानन शेंडे, राहाटीचे सरपंच बाबाराव आत्राम, झटाळ्याचे सरपंच रवि मसराम, ससाणीचे उपसरपंच झोलबाजी लेनगुरे, ग्रा.पं.सदस्य संतोष मोहुर्ले, आनंद मंगाम, उत्तम राठोड, शेषराव जाधव, गुणवंत लेनगुरे, सदाशीव ठाकरे, विठ्ठल नैताम उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेही त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
साभार :- देशोन्नती 

Tuesday 12 February 2013

काळीज हेलावून टाकणा-या घटनेने माणुसकी थरारली

निष्पाप जीवाची अवस्था पाहुन सारेच स्तब्ध
नराधमास भर चौकात फाशीची मागणी

आपल्या निष्पाप, निरागस हसण्याने घरातील वातावरण प्रफुल्लीत ठेवण्याचे तिचे वय. लहान बालकाला आपुलकीचा माणुस जेव्हा हवेत अलवारपणे फेकून झेलतो तेव्हा ते बालक हसत असते. कारण त्याचा विश्वास असतो की, आपण खाली पडणार नाही. आपल्याला कोणतीही ईजा होणार नाही. मात्र नातलगानेच दोन वर्षीय चिमुकलीचे वासनांध होऊन लचके तोडले तर? नुसत्या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो. मात्र घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे रक्ताच्या नात्याला लाजवणारी व माणसाच्या माणुस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली अन अवघा तालुका हेलावून गेला. चुलत मामानेच दोन वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार करून तिचा खुन केला. त्याचे हे कृत्य एवढे अमानुष होते की, शब्दात ते वर्णन करणेही शक्य नाही. त्याने त्या चिमुकलीच्या चेह-यावर व शरीराच्या ईतर भागावर ठिकठिकाणी अमानवियपणे चावे घेतले होते. या घृणीत प्रकारामुळे तिचे ओठ चेह-यापासुन विलग होण्याच्या अवस्थेतच होते.
हि घटना घडली ती जागा गावाच्या अगदी मधोमध आहे. गेल्या दोन वर्षांपासुन ही अंगणवाडी अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेत पडून आहे. त्या बाजुलाच ग्रामपंचायत कार्यालय आहे. समोरच जिल्हा परिषदेची शाळा, बाजुला अंगणवाडी आहे. घटनास्थळाच्या मागे गावच्या पोलीस पाटलांचे घर आहे. मात्र घटनेच्या वेळी संपुर्ण गाव माहुर येथुन परत आलेल्या पालखीच्या जेवणावळीत व्यस्त होते. कोणालाही त्या बालीकेचा आक्रोश ऐकु आला नाही. त्यामुळे तो वासनांध नराधम अंगात राक्षस संचारल्या प्रमाणे तिच्या देहाचे लचके तोडत राहिला. जेव्हा सर्वांनी त्या बालिकेची अवस्था पाहिली तेव्हा कोणाचाच आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्या नराधम शत्रुघ्नचे वडील शेती करतात. त्यांचेकडे तिन एकर अतिक्रमणाची कोरडवाहु शेती आहे. त्याला दोन बहिणी आहेत. त्यापैकी एक विवाहित आहे तर दुसरी शिकत आहे. शत्रुघ्न हा अवघ्या काही महिन्यांपुर्वीच गावात आला होता. तो कोणतेही काम न करता दिवसभर गावात टवाळक्या करीत राहायचा.
मृतक चिमुकलीला ४ वर्षाची मोठी बहिण व सहा महिण्यांचा लहान भाऊ आहे. तिचे आई वडील मोल मजुरी करतात. ते आंध्रप्रदेशातील अदिलाबाद जिल्ह्यातील टेकडी रामपुर येथिल मुळ रहिवासी आहेत. तिची आई माहेरी पती सोबत गेल्या एक वर्षापासुन झटाळा येथे राहात होती.
या दुर्दैवी घटनेने अवघे गाव नि:शब्द झाले होते. कोणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. गावातील तरूण आकाश संजय मसराम याचेसह यादव तोडसाम व ईतरांनी मनावर दगड ठेवुन प्रतिक्रीया दिली की, जिच्या तोंडुन अद्याप शब्दही निघत नव्हते तिच्यावर असा अमानुष अत्याचार करणा-याला तडकाफडकी फासावर लटकविले पाहिजे असे ते म्हणाले.
आरोपीच्या घरची अत्यंत दयनीय अवस्था होती. मुलाने मान शरमेने खाली घालायला लावली. घडले ते खुपच वाईट घडले. असे आरोपीचे आई वडील म्हणाले. या घटनेमुळे झटाळा गावासह संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असुन माणुस क्रौर्याची एवढी परिसिमा सुद्धा गाठू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. 

वसंतराव पुरके व शैलेष इंगोलेना अश्रु आवरले नाही

ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन गृहात दोन वर्षीय चिमुकलीच्या देहाची ती अवस्था पाहुन विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके व घाटंजी पंचायत समितीचे सभापती शैलेष इंगोले यांच्या डोळ्यातून नकळतच अश्रु तराळले. इंगोले हे तर गर्दीतून बाजुला जाऊन ढसाढसा रडले. ही घटना माणुसकीला लाजवणारी असुन त्या आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ना.पुरके यांनी केली. तर जनावरानेही त्या चिमुकल्या देहाचे लचके तोडतांना विचार केला असता. तो मनुष्य नव्हे तर राक्षसच आहे त्याला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी शैलेष इंगोले, मनसेचे शहराध्यक्ष गजानन भालेकर, झटाळ्याचे पोलीस पाटील लक्ष्मण गेडाम यांनी केली.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

दोन वर्षीय चिमुकलीवर पाशवी बलात्कार : मुलीचा मृत्यू

घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल घटना
चुलत मामानेच तोडले निरागस भाचीचे लचके
गावक-यांकडून आरोपीस चोप


अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर चुलत मामानेच पाशवी बलात्कार करून तिचा खुन केला. मन हेलावून टाकणारी ही क्रूर घटना घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे काल (दि.११) ला रात्री ८.३० वाजेदरम्यान घडली. गावक-यांनी शत्रुघ्न बबन मसराम (२१) या नराधम आरोपीला बेदम चोप देऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. 
जनावरालाही लाजवणा-या या क्रूर घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. काल (दि.११) ला सायंकाळी झटाळा गावात माहुर येथुन परतलेल्या पालखीचे जेवण होते. बहुतांश ग्रामस्थ या जेवणावळीतच व्यस्त होते. नेमकी हिच संधी साधुन आरोपी शत्रुघ्न हा त्या चिमुकलीच्या घरी गेला. आजोबाच्या मांडीवर खेळत असलेल्या बालिकेला बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. मात्र ब-याच उशिरा पर्यंत बालिकेला त्याने परत न आणल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. संपुर्ण गाव धुंडाळले. मात्र ते दोघे कुठेच दिसत नव्हते. शेवटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजुला बांधकामावस्थेत असलेल्या अंगणवाडीमध्ये कच-याच्या ढिगा-यात ती बालिका निपचीत पडून होती. तर तो नराधम बाजुलाच पडून होता. ते दृष्य पाहुन सर्वांच्याच अंगाचा थरकाप उडाला. बालिका रक्तबंबाळ अवस्थेत होती. तिच्या ओठांचे लचके तोडल्या गेले होते. गाल, हात व पाश्र्वभागासह ठिकठिकाणी तो नराधम चावल्याने संपुर्ण शरीर जखमी झाले होते. गावक-यांनी चिमुकलीला तातडीने ऑटोतून कुर्ली येथे खासगी रूग्णालयात नेले. त्यानंतर घाटंजी येथे ग्रामिण रूग्णालयात तिला नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. गावक-यांनी त्या वासनांध नराधमाला बेदम चोप दिला. पारवा पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन आरोपीस अटक केली. त्याचेवर कलम ३७६, ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आज दुपारी १ वाजेदरम्यान त्या बालिकेला शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले. या गंभिर घटनेची माहिती मिळताच विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके आपला नियोजीत दौरा अर्धवट सोडून घाटंजी येथे आले. ग्रामिण रूग्णालयात त्या चिमुकलीचे शव पाहुन पुरके यांनाही अश्रु अनावर झाले. त्या आरोपीला कोणतीही दयामाया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माणुसकीला लाजविणा-या या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व निषेध व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 
अमोल राऊत

Monday 11 February 2013

श्रीसमर्थ शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी यशवंत महल्ले

विलास महल्ले सचिवपदी
शहरातील प्रतिष्ठीत शैक्षणीक संस्था असलेल्या श्रीसमर्थ शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत यशवंत महल्ले यांची अध्यक्षपदी फ़ेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदावर प्रकाश चवरडोल तर सचिवपदी विलास महल्ले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्रीसमर्थ शिक्षण मंडळाची सभा नुकतीच संपन्न झाली. य.शा.महल्ले यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ ७ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी संपला. त्यामुळे पुढील तिन वर्षाकरीता नविन कार्यकारी मंडळाची निवड करण्यासाठी ही सभा बोलविण्यात आली होती. या सभेत सर्व सदस्यांच्या सहमतीने पुढील तिन वर्षाकरीता कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी रा.ल.धनरे, अ‍ॅड निलेश चवरडोल, गजानन महल्ले, संदिप वानखडे, सुमन धनरे, माया महल्ले यांची एकमताने निवड करण्यात आली. नव्या संचालक मंडळाचा कार्यकाळ २०१६ पर्यंत आहे. संस्थेचा सर्वांगीन विकास करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे यासाठी महत्वाची पावले उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
साभार :- देशोन्नती 

घाटंजीत शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

हिंदी हास्य कवी संमेलन मुख्य आकर्षण

स्थानिक राजे छत्रपती सामाजीक संस्था व संभाजी ब्रिगेड तालुका शाखा घाटंजीच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवतिर्थ’ जेसिस कॉलनी येथे छत्रपती शिवरायांच्या ३८३ व्या जयंती निमित्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१९ फ़ेब्रुवारी ला सायंकाळी ५ वाजता शिवपुजनाने कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यानंतर नांदेड येथिल ख्यातनाम विचारवंत व वक्ता प्रा.सौ.राजर्षी पाटील यांचे ‘‘जिजाऊ शिवबांच्या विचारातूनच महिला अत्याचाराला प्रतिबंध शक्य’’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प.सभापती संगिता भुरे राहतील, तसेच यावेळी न.प.सभापती परेश कारीया, चंद्ररेखा रामटेके, सिमा डंभारे यांची उपस्थिती राहिल. 
त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ वितरण सोहळा होईल. या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती व पुरस्काराचे मानकरी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती मा.एम.एन.गिलानी यांची प्रमुख उपस्थिती राहिल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल राहतील. मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, घाटंजीचे नगराध्यक्ष किशोर दावडा हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहतील. 
सायंकाळी ७ वाजता हिंदी हास्यकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या हास्यकवी संमेलनात प्रख्यात हिंदी हास्यकवी किरण जोशी अमरावती, मनोज मद्रासी निजामाबाद, कपील जैन (बोरूंदीया) यवतमाळ व राजा धर्माधीकारी परतवाडा हे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला श्रोत्यांना नि:शुल्क प्रवेश मिळणार आहे. 
या सर्व कार्यक्रमांना घाटंजीकरांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती सामाजीक संस्था, संभाजी ब्रिगेडचे राजेश उदार, दिपक महाकुलकर, संजय राऊत, प्रफ़ुल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, संतोष राऊत, मनोज ढगले, राजु गिरी, रूपेश कावलकर, श्रिकांत पायताडे, संजय पडलवार, प्रमोद टापरे, हर्षद दावडा, गजानन कटकमवार, प्रविण मडावी, रवि बेलोरकर, निरज विरदंडे, आकाश निमसरकर, सतिश भोयर, संतोष गावंडे, दिनेश बावनकुळे, प्रदिप ढगले, संतोष भोयर, सुमित कैटीकवार, प्रशांत चौधरी, अजय दिघडे, पंकज वल्लभकर, मंगेश वांढरे, अमित वैश्य, पंकज घाडगे, सुरेश यन्नरवार, समिर चौधरी, अंकुश ठाकरे, संदिप धांदे, अरविंद मानकर, संतोष काळे, दिलीप गुघाणे, मंगेश रामटेके, मानव लढे, आकाश कवासे, शरद सोयाम, अभय ठाकरे, सचिन गवळी, नरेश ताजणे, अमोल कर्णेवार, सुशिल कोवे, अनिल डहाके, शक्तिसिंग ठाकुर, शितल कोवे, नंदू बुरबुरे, नरेश भडांगे, विजय जयवळ, अरूण गावंडे, सुमित ढगले, एस.आर.जाधव, एन.डी.कोळी, बाल्या चावरे, प्रेम चावरे, ज्ञानेश्वर राठोड, सचिन यन्नरवार, अवि जळके, प्रफ़ुल्ल खंडाळकर यांनी केले आहे.

माजी न्यायमुर्ती गिलानी यांना विर राजे संभाजी पुरस्कार 

आपल्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करणारे व्यक्तीमत्व तसेच घाटंजी तालुक्यातील भुमीपूत्रांना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांना जाहिर करण्यात आला आहे. न्यायमुर्ती गिलानी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. ते मुळचे घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण घाटंजी येथे झाले आहे. न्यायमुर्ती गिलानी यांनी आजवर मोठमोठी पदे भुषविली आहेत. विवीध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
साभार :- देशोन्नती 

Sunday 10 February 2013

श्रिराम बाल संस्कार केंद्राच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचे कलाविष्कार




येथिल श्रिराम बाल संस्कार केंद्राच्या वार्षीक स्नेहसंमेलनात हस्तकला, नृत्य, अभिनय यासह चिमुकल्यांच्या विवीध कलाविष्कारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. तिन दिवशीय स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी न.प.अध्यक्ष किशोर दावडा होते. नगरसेवक राम खांडरे, शासकीय अध्यापक विद्यालयाच्या अध्यापीका डॉ.हेमलता तुरणकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिवंगत आमदार निलेश पारवेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांनी बनविलेल्या शैक्षणीक साहित्य प्रदर्शनीचे उद्घाटन केले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कवायत, लेझीम, डंबेल्स, घुंगरू काठी, नृत्य, भाषण  असे विवीध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रा.तुरणकर यांनी मुलांचे मानसशास्त्र व त्यांची जोपासना या विषयावर मार्गदर्शन केले. वार्षीकोत्सवाच्या निमित्ताने यवतमाळ येथिल प्रसिद्ध वक्ते उमेश वैद्य यांचे विद्यार्थी शिक्षक आणि पालक या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. 
स्नेहसंमेलनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मधुसूदन चोपडे होते. यावेळी नगर सेविका संगिता भुरे, मिनाक्षी व्यवहारे, विणा सोनटक्के, निता पानट, रामदास नखाते, श्याम पानट, मधुकर व्यवहारे, ऋचिता कुळकर्णी, उमेश सोनटक्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापीका सुचिता पानट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उषा पानट, बॉबी दिकुंडवार, शिल्पा वातिले, सुरेखा निकोडे, पुजा कहाळे, आरती जाधव, शुभांगी ठाकरे, भारती वाळके, सरला भोयर, प्रिती वघरे, प्रिया वातिले, विजया पामपट्टीवार यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

वंजारी समाज संघटनेची घाटंजी तालुका कार्यकारीणी गठीत

अध्यक्षपदी राम खांडरे, मनोज हामंद सचिव
येथिल संत मारोती महाराज सांस्कृतिक भवनात झालेल्या आमसभेत वंजारी समाज तालुका कार्यकारीणीचे गठण करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षपदी नगरसेवक राम उर्फ़  बालु खांडरे तर सचिवपदी मनोज हामंद यांची निवड करण्यात आली. आमसभेच्या अध्यक्षस्थानी रेणुराव हेमके होते. संघटनेच्या उपाध्यक्षपदी दत्ता पेटेवार, लक्ष्मण कानकाटे, सहसचिव राहुल खांडरे, कोषाध्यक्ष राजु पेटेवार, तर सदस्यपदी शशांक साठे, गजानन वराडे, सारंग कहाळे, राहुल खांडरे, विशाल खांडरे, सुरज हेमके, दत्ता पांढरमिसे, विनोद धात्रक, अमोल पेटेवार, मंगेश खांडरे, रमेश नव्हाते, देओल खांडरे, आकाश हेमके यांचा समावेश आहे.
नविन कार्यकारीणीला मार्गदर्शक म्हणुन रेणुराव हेमके, अ‍ॅड. गणेश धात्रक, नाना खांडरे, बंडू हेमके, भगवान खांडरे राहतील. या सभेत आगामी वर्षासाठी तिन महत्वाचे ठराव पारित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने संघटनेतर्फ़े सामुहिक विवाह मेळावा घेणे, समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणीक खर्च संघटनेने करणे, तसेच चालु वर्षातच घाटंजी येथे वंजारी समाजाचे भव्य समाज मंदिर उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद खांडरे तर आभार प्रदर्शन मनोज हामंद यांनी केले.
साभार :- देशोन्नती 

Saturday 9 February 2013

निलेशभाऊ..... तुमको ना भुल पायेंगे.....!

पारव्यात आठवणींचा महापुर









हजारोंची गर्दी...माणसे तितक्या आठवणी...! त्यातच भर पडली ती जुन्या छायाचित्रांच्या फलकांची. येणारा प्रत्येकजण ही छायाचित्रे न्याहाळत स्व.निलेश पारवेकरांची छबी आपल्या डोळ्यात साठवुन पुढे जात होता. हे चित्र होते स्व.आ. निलेश पारवेकरांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे. अनेकांचा तर या वास्तविकतेवर विश्वासच बसत नव्हता की नेहमी हसतमुखाने सर्वांना सामोरे जाणारे एक निखळ व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही. एरवी पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे देशभर फिरणा-या निलेश पारवेकरांना समाधीत विसावलेले पाहुन अनेकांच्या डोळ्यातून नकळतच अश्रु तराळले. घाटंजी तालुक्यातील त्यांच्या ओळखीचा कोणी व्यक्ती त्यांना कुठेही आढळला तर ते आवर्जुन गाडी रस्त्यात थांबवुन त्यांची आस्थेने चौकशी करीत होते. पारव्यात येतांनाही ते अनेकांशी बोलत येत असत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांच्या विषयी आपुलकी होती, जिव्हाळा होता. ‘‘मालकानं आमच्यासाठी लय केलं, कितीतरी लोकायचे आशिर्वाद त्यायनं घेतले. अशा सोन्यासारख्या मानसाले देवानं नेलं. लय वाईट केलं. मालक होते म्हनुन मोठमोठे लोक आमच्या गावात येत होते. आता कोन येईल?’’ असे संवाद पारव्याच्या रस्त्यारस्त्यावर ऐकु येत होते. 
आमदार निलेश पारवेकर यांच्या कर्तृत्वाच्या भव्यतेबद्दल सर्वसामान्य पारवावासियांना तेवढी माहिती नव्हती. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी आलेल्या मोठ्या हस्तींमुळे आपण समजत होतो त्यापेक्षा ते खुपच मोठे होते. एक मोठं नेतृत्व आपण गमावलं याची जाणिव झाल्याने दु:खावेग अधिकच वाढला. सकाळपासुनच पारव्याकडे जाणा-या रस्त्यावर वर्दळ सुरू होती. दुपारी एक वाजताच्या सुमारास तर येणा-यांचा लोंढा अधिकच वाढला. येणा-या प्रत्येकाच्या मनात होती हळहळ एक उदयोन्मुख नेतृत्व अन जिवाभावाचा माणुस गमावल्याची.

सगळीकडे फक्त निलेशच निलेश !






पुण्यानुमोदन कार्यक्रमासाठी येणा-या प्रत्येकाला पारव्यात सगळीकडे निलेश पारवेकरच दिसत होते. त्यांच्या चाहत्यांनी आपल्या भावना फलकांच्या माध्यमातुन व्यक्त केल्या होत्या. तर वाड्यापासुन कार्यक्रम स्थळापर्यंत जाणा-या मार्गावर तसेच कार्यक्रम स्थळी निलेश पारवेकरांच्या आठवणींना उजाळा देणा-या छायाचित्रांचे फलक लावण्यात आले होते. या आठवणी येणा-या प्रत्येकाने आपल्या मनपटलावर कायमच्या साठवुन घेतल्या.

मुलाखत व परिक्षा विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा


स्थानिक शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालय घाटंजी व विद्यार्थी कल्याण विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने लेखी परिक्षा व मुलाखत या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन बा.दे.पारवेकर महाविद्यालय पारवा चे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिरूद्ध लोणकर होते. संस्थेचे संचालक आर.यु.गिरी, आलिया शहेजाद, प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद, प्रा.ए.के.पत्की, प्रा.आर.जी.डंभारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आजच्या या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी लागणा-या तयारीची मार्गदर्शक शिदोरी प्रा.नितिन सिंघवी यांनी विद्यार्थ्यांना
 दिली. हताश न होता सातत्याने विद्यार्थ्यांनी आपल्या सकारात्मक विचाराने स्वत:ची ओळख जगासमोर ठेवावी असे मार्गदर्शनपर उद्गार प्रा.सी.पी.वानखडे यांनी आपल्या द्वितीय सत्रातील व्याख्यानात काढले. मुलाखतीस जाताना न घाबरता संधी काबिज करण्याचा सल्ला प्रा.आर.व्ही.राठोड यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन सिमा कश्यप हिने तर आभार प्रदर्शन प्रा.व्हि.एस.जगताप यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता प्रा.डॉ.प्रदिप राऊत, प्रा.टी.एम.कोटक, प्रा.डॉ.एन.एस.धारकर, प्रा.एम.एच.ढाले, प्रा.यु.ए.ठाकरे, प्रा.जी.सी.भगत, प्रा.यु.एस.माहुरे, प्रा.ए.पी.भगत, प्रा.एन.एन.तिरमनवार, प्रा.जे.पी.मोरे, प्रा.के.आर.किर्दक, छात्रसंघ सचिव गौरव गावंडे, कर्मचारी दिनेश खांडरे, लक्ष्मण बोरकर यांचेसह संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Thursday 7 February 2013

घाटंजीतील पाच युवकांचा अपघातात करूण अंत

अंत्यसंस्काराला अवघी घाटंजी लोटली
पंधरवाड्यातील दुस-या दुर्दैवी घटनेने तालुका शोकमग्न





आमदार निलेश पारवेकर यांच्या अकाली निधनाच्या दु:खातून घाटंजी तालुका सावरलाही नसताना पाच जिवलग मित्रांच्या अपघाती मृत्यूची बातमी पहाटेच धडकली अन संपुर्ण शहरात स्मशान शांतता पसरली. सारेच काही सुन्न झाले. राहुल अशोक फ़ुसे (२२), अमोल प्रल्हाद गोडे (२३), सुमित सुरेश कांबळे (२४), अजय गणपत कुमरे (२७), आकाश उर्फ़ गोल्डी विजय गिरी (२२) या पाच मित्रांचा देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील शिरपुर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातात करूण अंत झाला. सुमारे १५ दिवसांपुर्वी राहुल फ़ुसे याने घेतलेल्या इंडीगो कार क्रं.एम.एच.२९-२१७३ या गाडीने हे सर्व मित्र काल सायंकाळी नागपुर येथे गेले होते. त्यानंतर परत येतांना रात्री २.३० वाजताच्या सुमारास ट्रक क्रं.एम.एच.२६ एच.६१७२ या सोयाबिन नेणा-या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थीव शहरात आणण्यात आले. वसंत नगर, राममंदीर वार्ड, मानोली रोड या परिसरात राहणा-या या पाचही युवकांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. हजारो नागरिक अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. येथिल स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील अमोल प्रल्हाद गोडे हा वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. तो येथिल पेट्रोलपंपावर काम करतो. सुमित सुरेश कांबळे हा देखिल वसंतनगर भागात राहतो. त्याला एक भाऊ व बहिण आहे. अजय कुमरे हा मानोली रोड भागात राहतो. हा सुद्धा पेट्रोल पंपावर काम करतो. राहुल फ़ुसे हा राममंदिर वार्डात राहत होता. तो हि कार भाड्याने देत होता. 
आकाश गिरी हा राम मंदिर वार्डातील रहिवासी आहे. त्याचे वडील गवंडी काम करतात. हे पाचही अत्यंत जिवलग मित्र होते. मोक्षधामात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. भयाण शांततेत मृतकांच्या नातलगांचा आक्रोश काळीज चिरून टाकत होता. घाटंजी तालुक्याच्या ईतिहासात प्रथमच स्मशानभुमीने एवढी गर्दी अनुभवली. संपुर्ण बाजारपेठ यावेळी बंद करण्यात आली होती. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांचेसह अनेक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने घाटंजीकर नागरीक यावेळी उपस्थित होते. अनेकांनी घराच्या गच्चीवरून, रस्त्याच्या कडेवरून हा दु:खद प्रसंग अनुभवला. 
साभार :- देशोन्नती 

Wednesday 6 February 2013

गिलानी महाविद्यालयाच्या खेळाडूंना सुवर्णपदक



येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशांत मस्के व सौरभ माकडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली होती. आनंद गुजरात येथे झालेल्या क्रिडा स्पर्धा तसेच नागपुर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधीत्व करून त्यानी सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी करून त्यानी महाविद्यालय व घाटंजी तालुक्याचा लौकीक वाढविला याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद यांच्या हस्ते या खेळाडुंचा गौरव करण्यात आला. त्याना शारिरीक शिक्षक प्रा.आर.एम.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वुंदाने खेळाडूंचे कौतूक केले आहे.
साभार :- देशोन्नती 


घाटंजी येथे वंजारी समाज भवनाची गरज - नगराध्यक्ष शंकर बडे


समाजाच्या विवीध उपक्रमांसाठी समाजभवनाची नितांत आवश्यकता असते. घाटंजीत वंजारी समाजाचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथे समाजभवनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे यांनी दिले. येथिल सांस्कृतिक भवनात झालेल्या श्री भगवानबाबा पुण्यतिथी उत्सव व सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव सांगळे होते. वणीचे तहसिलदार अशोक मिसाळ, डॉ.प्रताप तारक, माजी नगराध्यक्षा शांताबाई खांडरे, अनिता व-हाडे, गौरी बडे, मधुकर धस, भडांगे महाराज, राजु पेटेवार, उमेश खांडरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात न्यायमुर्ती विशाल साठे, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, न.प.यवतमाळचे नगरसेवक जयदिप सानप, वैजयंती उगलमुगले, घाटंजीचे नगरसेवक राम खांडरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंजारी समाजाचे दैवत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांचा जिवनपट कु.नुतन तारक हिने सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुराव हेमके संचालन लक्ष्मण कानकाटे तर आभार प्रदर्शन देओल खांडरे यांनी केले. या कार्यक्रमाला घाटंजी, खापरी, करमना, कोंडेझरी यासह विवीध भागातून समाजबांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वंजारी समाज उत्सव समितीचे सचिव मनोज हामंद, स्वरूप नव्हाते, अ‍ॅड. गणेश धात्रक, बंडू हेमके, प्रमोद खांडरे, दत्ता पेटेवार, शंकर खांडरे, शशांक साठे, राहुल खांडरे, मंगेश खांडरे, उमेश खांडरे, गजानन व-हाडे, सारंग कहाळे, राजु खांडरे, रवि पेटेवार, संदिप खांडरे, गजानन करपे, सुरज हेमके, अमोल पेटेवार, सचिन हामंद, आकाश हेमके, महेश खांडरे, विशाल खांडरे, अशोक खांडरे, सचिन पांढरमिसे, विनोद खांडरे, लुकेश खांडरे, गणेश खांडरे, वामन धात्रक, संतोष पांढरमिसे, वृषभ हामंद, अमोल भडांगे, पवन पेटेवार, रवि कहाळे, बादल खांडरे यांनी परिश्रम घेतले.


साभार :- देशोन्नती 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित



येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या सभेत जयंती उत्सव समितीचे गठण करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सुखदेव रामटेके होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष श्रावण जिवने, उपाध्यक्ष आशिष विठ्ठलराव कांबळे, सचिव भारत अंबादास लढे, सहसचिव सुमित दत्ताजी चुनारकर, तर कोषाध्यक्षपदी अविनाश नामदेव मनवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारीणी सदस्यांमध्ये एन.जी.भगत, विजय शिसले, नगरसेवक संतोष संभाजी शेंद्रे, सतिष विश्वनाथ रामटेके, देवकुमार शेंडे, प्रकाश लढे, अजय गजभिये, बुद्धप्रकाश मुनेश्वर यांचा समावेश आहे.
मार्गदर्शक समितीमध्ये बी.टी.वाढवे, सुखदेव रामटेके, किशोर मुनेश्वर, सुनिल नगराळे, भगवान बन्सोड, नियोजन समितीमध्ये प्रदिप रामटेके, अशोक जोगळेकर, अविनाश खरतडे, शेषराव नगराळे, सचिन खोब्रागडे, सागर बेले, यांची निवड करण्यात आली. सभेला गजु मुनेश्वर, मयुर भवरे, सचिन भगत, स्वप्नील कांबळे, स्वप्नील खोब्रागडे, शुभम मनवर, भिमसेन मुनेश्वर, भारत मोटघरे, राजु गजबे, संजय कांबळे, संजय टिपले, दत्ताजी मानकर, राजु सुखदेवे, ताराचंद धोंगडे, हिमंत कापसीकर यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
साभार :- देशोन्नती