Pages

Monday 23 December 2013

दक्षता समिती अध्यक्षपदी चंद्रकांत ढवळे

येथिल नगर पालिका स्तरीय दक्षता समितीच्या अध्यक्षपदी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रास्त धान्य व ईतर वस्तुंचा पुरवठा शासकीय रास्त धान्य दुकानातून योग्य प्रकारे होतो अथवा नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनातर्पेâ या समितीचे गठण करण्यात येते. पत्रकारीतेचा दांडगा अनुभव असलेल्या ढवळे यांची या पदावर नियुक्ती झाल्याने या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे, जि.प.सदस्य देवानंद पवार यांना दिले आहे.

Monday 9 December 2013

सभापतींचा ‘वादग्रस्त’ निर्णय ठरला बाजार समितीच्या फायद्याचा

अभिषेक ठाकरे : विरोध झाला तरी शेतकरी हिताचे निर्णय घेणार
बाजार समितीने आयोजीत केलेल्या गुरांच्या बाजार लिलावात योग्य बोली न लागल्यामुळे सभापतींनी विशेषाधीकार वापरून लिलाव रद्द करण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता. मात्र पेâरलिलावात एक लाख रूपये जास्त बोली लागल्याने सदर निर्णय बाजार समितीच्या फायद्याचा झाला आहे. त्याबद्दल घाटंजी बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे.
२३ नोव्हेंबर रोजी घाटंजी बाजार समितीने गुरांच्या बाजाराचे वंâत्राट देण्यासाठी लिलावाचे आयोजन केले होते. त्यामध्ये किमान बोली ५ लाख रूपये ठेवण्यात आली होती. मात्र या लिलावात अंतिम बोली ५ लाख ८ हजार एवढीच होती. त्यामुळे सभापतींनी लिलाव प्रक्रीया रद्द केली. त्यानंतर ४ डिसेंबरला पेâरलिलाव घेण्यात आला. त्यामध्ये अंतिम बोली ६ लाख ८ हजार रूपयांची झाली. पहिल्या लिलावापेक्षा तब्बल एक लाख रूपयांचा फायदा बाजार समितीला झाला आहे. 
या लिलावाच्या वेळी सभापती अभिषेक ठाकरे, सहाय्यक निबंधक जयंत पालटकर, ख.वि.सं.चे माजी अध्यक्ष बल्लु पाटील लोणकर, विवेक भोयर, आशिष लोणकर, नामदेव आडे, अकबर तंव्वर, नागोराव कुमरे, किशोर चवरडोल, गजानन भोयर, संजय र्इंगळे, रमेश आंबेपवार, सय्यद रफिक, रा.कॉ.तालुकाध्यक्ष संजय गोडे, रा.यु.कॉ.शहराध्यक्ष संजय ढगले, बाजार समिती सचिव कपिल चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पहिला लिलाव रद्द केल्याने सभापतींवर बरीच टिका झाली होती. मात्र या टिकेचा विचार न करता सभापती ठाकरे निर्णयावर ठाम राहिले. शेतकरी व बाजार समितीच्या हितासाठी कोणाचाही विरोध पत्करण्याची तयारी असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. २०११-१२ व त्यापुर्वी बाजार समितीला गुरांच्या बाजारापासुन ३ लाखांपेक्षाही कमी उत्पन्न मिळत होते. 
मात्र गुरांचा बाजार लिलाव पद्धतीने देण्याच्या धाडसी निर्णयामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे बाजार समितीच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडत असतांना प्रत्येक आरोपांचा सामना करीत सुरू असलेली वाटचाल चकीत करणारी आहे.
साभार : सकाळ 

Friday 6 December 2013

घाटंजी तालुक्यात ‘ऑनर किलिंग’

वडील, भाऊ व मामाने केला १६ वर्षीय मुलीचा खुन
तब्बल २२ दिवसांनी लागला तपास
नेर तालुक्यात पुरला होता मृतदेह
अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण व लग्नाचा हट्ट सहन न झाल्याने मुलीचे वडील, भाऊ, मामा यांचेसह पाच जणांनी कट रचुन तिचा निर्घुण खुन केला. घाटंजी तालुक्यातील किन्ही गावातील या घटनेने तालुका हादरला आहे. घटनेच्या तब्बल २१ दिवसांनी हा गंभिर प्रकार उघडकीस आला. 
रेखा प्रेमदास जाधव (वय१६) असे त्या दुर्दैवी मृतक मुलीचे नाव आहे. ता.१३ नोव्हेंबर रोजी नेर तालुक्यातील शिंदखेड शिवारातील शेतात तिचा खुन करून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला होता. या प्रकरणी घाटंजी पोलीसांनी मुलीचे वडील प्रेमदास केशव जाधव (४५) नातलग देविदास राठोड यांना अटक केली असुन खुनाच्या कटात सहभागी मुलीचा भाऊ रूपेश प्रेमदास राठोड, मामा अशोक धनु राठोड, राजु मोतीराम राठोड हे आरोपी फरार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मृतक मुलगी हि ता.१७ नोव्हेंबर रोजी घाटंजी येथुन बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील प्रेमदास केशव जाधव यांनी नोंदविली होती. गावातीलच अर्जुन उर्फ  बबलु वासुदेव राठोड (२०) याचेशी मुलीचे प्रेमसंबंध असल्याने त्यानेच तिला फूस लावुन पळविल्याचा आरोप वडीलांनी केला होता. त्यानुसार घाटंजी पोलीसांनी त्या युवकावर भा.दं.वि.कलम ३६३, ३६६ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट ३७० (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. अद्यापही तो युवक न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान नेर तालुक्यातील शिंदखेड शिवारात ता.२२ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान पुरलेल्या अवस्थेतील युवतीचे प्रेत आढळुन आले होते. चेहरा दगडाने ठेचुन विद्रुप करण्यात आल्याने मृतदेहाची ओळख पटली नव्हती. नेर तालुक्यात या अनोळखी युवतीच्या खुनामुळे खळबळ उडाली होती. उल्लेखनिय म्हणजे मृतक रेखाच्या वडीलांनाही नेर येथे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले होते. मात्र कपडे व अन्य साहित्य माझ्या मुलीचे नाही असे त्यांनी सांगितले होते. तपासादरम्यान मुलीच्या वडीलांची उत्तरे समाधानकारक न वाटल्याने पोलीसांचा संशय बळावला.
त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पाच जणांनी कट रचुन रेखाला अशोक राठोड व राजु राठोड यांचे सोबत दुचाकीवर नेर तालुक्यात पाठविले. तिथे शेतशिवारात या दोघांनी तिचा खुन केल्याचे त्याने कबुल केले. मुलीचे गावातीलच अर्जुन राठोड याचेशी प्रेमसंबंध होते. तिने त्याच्या सोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला होता. याबाबत समाजाची बैठकही किन्ही येथे झाली होती. मुलाकडचे लग्नासाठी तयार होते. मात्र मुलीच्या वडीलाचा लग्नाला तिव्र विरोध होता. त्यातुनच हे कृत्य त्याने सांगितले. घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या नेतृत्वात घाटंजी पोलीस आरोपींचा कसोशीने शोध घेत आहेत.  
साभार : सकाळ