Pages

Tuesday 12 February 2013

काळीज हेलावून टाकणा-या घटनेने माणुसकी थरारली

निष्पाप जीवाची अवस्था पाहुन सारेच स्तब्ध
नराधमास भर चौकात फाशीची मागणी

आपल्या निष्पाप, निरागस हसण्याने घरातील वातावरण प्रफुल्लीत ठेवण्याचे तिचे वय. लहान बालकाला आपुलकीचा माणुस जेव्हा हवेत अलवारपणे फेकून झेलतो तेव्हा ते बालक हसत असते. कारण त्याचा विश्वास असतो की, आपण खाली पडणार नाही. आपल्याला कोणतीही ईजा होणार नाही. मात्र नातलगानेच दोन वर्षीय चिमुकलीचे वासनांध होऊन लचके तोडले तर? नुसत्या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो. मात्र घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे रक्ताच्या नात्याला लाजवणारी व माणसाच्या माणुस असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली अन अवघा तालुका हेलावून गेला. चुलत मामानेच दोन वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार करून तिचा खुन केला. त्याचे हे कृत्य एवढे अमानुष होते की, शब्दात ते वर्णन करणेही शक्य नाही. त्याने त्या चिमुकलीच्या चेह-यावर व शरीराच्या ईतर भागावर ठिकठिकाणी अमानवियपणे चावे घेतले होते. या घृणीत प्रकारामुळे तिचे ओठ चेह-यापासुन विलग होण्याच्या अवस्थेतच होते.
हि घटना घडली ती जागा गावाच्या अगदी मधोमध आहे. गेल्या दोन वर्षांपासुन ही अंगणवाडी अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेत पडून आहे. त्या बाजुलाच ग्रामपंचायत कार्यालय आहे. समोरच जिल्हा परिषदेची शाळा, बाजुला अंगणवाडी आहे. घटनास्थळाच्या मागे गावच्या पोलीस पाटलांचे घर आहे. मात्र घटनेच्या वेळी संपुर्ण गाव माहुर येथुन परत आलेल्या पालखीच्या जेवणावळीत व्यस्त होते. कोणालाही त्या बालीकेचा आक्रोश ऐकु आला नाही. त्यामुळे तो वासनांध नराधम अंगात राक्षस संचारल्या प्रमाणे तिच्या देहाचे लचके तोडत राहिला. जेव्हा सर्वांनी त्या बालिकेची अवस्था पाहिली तेव्हा कोणाचाच आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्या नराधम शत्रुघ्नचे वडील शेती करतात. त्यांचेकडे तिन एकर अतिक्रमणाची कोरडवाहु शेती आहे. त्याला दोन बहिणी आहेत. त्यापैकी एक विवाहित आहे तर दुसरी शिकत आहे. शत्रुघ्न हा अवघ्या काही महिन्यांपुर्वीच गावात आला होता. तो कोणतेही काम न करता दिवसभर गावात टवाळक्या करीत राहायचा.
मृतक चिमुकलीला ४ वर्षाची मोठी बहिण व सहा महिण्यांचा लहान भाऊ आहे. तिचे आई वडील मोल मजुरी करतात. ते आंध्रप्रदेशातील अदिलाबाद जिल्ह्यातील टेकडी रामपुर येथिल मुळ रहिवासी आहेत. तिची आई माहेरी पती सोबत गेल्या एक वर्षापासुन झटाळा येथे राहात होती.
या दुर्दैवी घटनेने अवघे गाव नि:शब्द झाले होते. कोणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. गावातील तरूण आकाश संजय मसराम याचेसह यादव तोडसाम व ईतरांनी मनावर दगड ठेवुन प्रतिक्रीया दिली की, जिच्या तोंडुन अद्याप शब्दही निघत नव्हते तिच्यावर असा अमानुष अत्याचार करणा-याला तडकाफडकी फासावर लटकविले पाहिजे असे ते म्हणाले.
आरोपीच्या घरची अत्यंत दयनीय अवस्था होती. मुलाने मान शरमेने खाली घालायला लावली. घडले ते खुपच वाईट घडले. असे आरोपीचे आई वडील म्हणाले. या घटनेमुळे झटाळा गावासह संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली असुन माणुस क्रौर्याची एवढी परिसिमा सुद्धा गाठू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. 

वसंतराव पुरके व शैलेष इंगोलेना अश्रु आवरले नाही

ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन गृहात दोन वर्षीय चिमुकलीच्या देहाची ती अवस्था पाहुन विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके व घाटंजी पंचायत समितीचे सभापती शैलेष इंगोले यांच्या डोळ्यातून नकळतच अश्रु तराळले. इंगोले हे तर गर्दीतून बाजुला जाऊन ढसाढसा रडले. ही घटना माणुसकीला लाजवणारी असुन त्या आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी ना.पुरके यांनी केली. तर जनावरानेही त्या चिमुकल्या देहाचे लचके तोडतांना विचार केला असता. तो मनुष्य नव्हे तर राक्षसच आहे त्याला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी शैलेष इंगोले, मनसेचे शहराध्यक्ष गजानन भालेकर, झटाळ्याचे पोलीस पाटील लक्ष्मण गेडाम यांनी केली.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment