Pages

Tuesday 12 February 2013

दोन वर्षीय चिमुकलीवर पाशवी बलात्कार : मुलीचा मृत्यू

घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल घटना
चुलत मामानेच तोडले निरागस भाचीचे लचके
गावक-यांकडून आरोपीस चोप


अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर चुलत मामानेच पाशवी बलात्कार करून तिचा खुन केला. मन हेलावून टाकणारी ही क्रूर घटना घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे काल (दि.११) ला रात्री ८.३० वाजेदरम्यान घडली. गावक-यांनी शत्रुघ्न बबन मसराम (२१) या नराधम आरोपीला बेदम चोप देऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. 
जनावरालाही लाजवणा-या या क्रूर घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. काल (दि.११) ला सायंकाळी झटाळा गावात माहुर येथुन परतलेल्या पालखीचे जेवण होते. बहुतांश ग्रामस्थ या जेवणावळीतच व्यस्त होते. नेमकी हिच संधी साधुन आरोपी शत्रुघ्न हा त्या चिमुकलीच्या घरी गेला. आजोबाच्या मांडीवर खेळत असलेल्या बालिकेला बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. मात्र ब-याच उशिरा पर्यंत बालिकेला त्याने परत न आणल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. संपुर्ण गाव धुंडाळले. मात्र ते दोघे कुठेच दिसत नव्हते. शेवटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजुला बांधकामावस्थेत असलेल्या अंगणवाडीमध्ये कच-याच्या ढिगा-यात ती बालिका निपचीत पडून होती. तर तो नराधम बाजुलाच पडून होता. ते दृष्य पाहुन सर्वांच्याच अंगाचा थरकाप उडाला. बालिका रक्तबंबाळ अवस्थेत होती. तिच्या ओठांचे लचके तोडल्या गेले होते. गाल, हात व पाश्र्वभागासह ठिकठिकाणी तो नराधम चावल्याने संपुर्ण शरीर जखमी झाले होते. गावक-यांनी चिमुकलीला तातडीने ऑटोतून कुर्ली येथे खासगी रूग्णालयात नेले. त्यानंतर घाटंजी येथे ग्रामिण रूग्णालयात तिला नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. गावक-यांनी त्या वासनांध नराधमाला बेदम चोप दिला. पारवा पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन आरोपीस अटक केली. त्याचेवर कलम ३७६, ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आज दुपारी १ वाजेदरम्यान त्या बालिकेला शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले. या गंभिर घटनेची माहिती मिळताच विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके आपला नियोजीत दौरा अर्धवट सोडून घाटंजी येथे आले. ग्रामिण रूग्णालयात त्या चिमुकलीचे शव पाहुन पुरके यांनाही अश्रु अनावर झाले. त्या आरोपीला कोणतीही दयामाया न दाखवता कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माणुसकीला लाजविणा-या या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व निषेध व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 
अमोल राऊत

No comments:

Post a Comment