Pages

Tuesday 30 October 2012

भक्ती, उत्साह व सद्भावनेसह आदिशक्तीला निरोप


















ढोलताशाचा गजर, गुलालाची मुक्त उधळण व उत्साहाने भारलेल्या वातावरणात घाटंजीत नवरात्रौत्सवाची सांगता झाली. यादरम्यान कुठेही अनुचीत घटना घडल्याचे वृत्त नाही. घाटंजी शहराच्या दुर्गोत्सवाला सामाजीक सद्भावनेची अनोखी परंपरा असल्याने सर्वधर्मीय नागरिक या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतात. यावर्षी दुर्गा विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी घाटंजीकरांची गर्दी जमल्याने शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, नवयुवक दुर्गोत्सव मंडळ, पंचमहा दुर्गोत्सव मंडळ, जय बजरंग दुर्गोत्सव मंडळ, नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ, आदर्श दुर्गोत्सव मंडळ, युवाशक्ती दुर्गोत्सव मंडळ या प्रमुख मंडळांसह अनेक ईतरही मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले होते. वैविध्यपुर्ण ढोलताशांमुळे मिरवणुकीला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले होते. 
परळी वैजनाथ, डोंगरगढ, देवगाव, नाचणगाव, नागपुर, यवतमाळ यासह विवीध ठिकाणचे ढोलताशा पथक यावर्षी आणण्यात आले होते. नवयुवक दुर्गोत्सव मंडळाने लावलेले स्त्री भ्रुणहत्या विरोधी फलक लक्ष वेधुन घेत होते. मिरवणुकीच्या मार्गावर स्व. देविदास महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ रूपाली ट्रेडर्स तर्फे,  नगराध्यक्ष जगदिश पंजाबी मित्र मंडळ, राम अग्रवाल, संतोष झाडे, सुरेश चौधरी, लक्ष्मण नागरीकर यांचेतर्फे महाप्रसाद व पाण्याचे स्टॉल भक्तांकरीता ठेवण्यात आले होते. उल्लेखनिय म्हणजे काही स्टॉलवर मुस्लिम नागरीकही स्वयंस्फूर्तीने महाप्रसाद वितरीत करतांना दिसत होते. घाटंजी तालुक्यातील अनेक दुर्गोत्सव मंडळांमध्ये मुस्लिम धर्मीय पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. बकरी ईद व दुर्गा विसर्जन एकाच कालावधीत आल्याने अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण असतांना घाटंजीकरांनी मात्र सामाजीक सौहार्दाचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. 
विसर्जन मिरवणुकी दरम्यान घाटंजी पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता. जुना बसस्थानक चौकात दोन ढोलताशा पथकांमध्ये लागलेल्या स्पर्धेमुळे सुमारे तिन ते चार तास वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलीसांनी सांगितल्यावरही ते तिथुन हटले नाही हे विषेश.   
साभार :- देशोन्नती 




  

अष्टमीच्या महाआरतीला घाटंजीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवयुवक दुर्गोत्सव मंडळाचा उपक्रम






येथिल नवयुवक दुर्गोत्सव मंडळातर्फे अष्टमीच्या दिवशी आयोजीत महाआरती, वेशभुषा व आरती ताटसजावट स्पर्धेला घाटंजीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सुमारे ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला तर आरतीला शेकडो भाविकांची उपस्थिती होती. झाशीची राणी, शिवाजी महाराज, राधा कृष्ण यासह अस्सल मराठमोळ्या वेषात आलेले चिमुकले, युवक - युवतींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. वाद्याच्या निनादात झालेल्या आरतीमध्ये भाविक तल्लीन झाले होते. आरतीनंतर करण्यात आलेल्या नयनरम्य आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
उत्कृष्ट वेशभुषा व ताटसजावट स्पर्धेत स्व. विशाल दिडशे स्मृती प्रित्यर्थ २ हजार १०१ रूपयांचे प्रथम पारितोषीक दर्शना वानखडे हिने पटकावले. अतुल दरेकार तर्फे प्रायोजीत १ हजार ५०१ रूपयांचे द्वितीय पारितोषीक निशा गवळी, जलाराम कॉम्प्युटर्स तर्फे प्रायोजीत १००१ रूपयांचे तृतिय पारितोषीक दिव्या उईके तर सोहेल हिराणी द्वारा प्रायोजीत ५०१ रूपयांचे  चौथे पारितोषीक अथर्व पवार यांनी पटकावले. तर नयन व वंशिका खांडरे, अंकुश सरवैय्या यांना प्रोत्साहनपर पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. 
पारितोषीक वितरण कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, कळंबचे तहसिलदार काळे, न.प.शिक्षण सभापती राम खांडरे, मंडळाचे अध्यक्ष गोलु फुसे,  उपाध्यक्ष गणेश अस्वले, सचिन भोयर, सचिव मनोज हामंद यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परिक्षण उमा ठाकरे, प्रमोद ठाकरे, प्रा.देवदत्त जकाते, रूपेश कावलकर, अमोल राऊत यांनी केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रमोद खांडरे, मोनु पांडे, अनिल गोरे, लक्ष्मण दिडशे, पिंटू झाडे, अजय दुबे, बालु किरणापुरे, चेतन राठोड, राहुल ऊईके, शुभांशु शुक्ला, राहुल खांडरे, निखिल ठाकरे, अजहर चौहान, अमोल भडांगे, बाबु किरणापुरे, किरण मोरे, प्रतिक उईके, मंगेश खांडरे, सचिन फुसे,  राहुल कडू, राजु बोबडे, प्रविण रागीलवार, चेतन हर्षे, प्रकाश मोरे, प्रशांत सोनुले यांनी परिश्रम घेतले. 
साभार :- देशोन्नती 


छायाचित्र सौजन्य
माया डिजीटल फोटो स्टुडीओ, शिवाजी चौक घाटंजी

प्रो.प्रा.अमोल वारंजे


स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज - संगिता भुरे

तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत पुर्वा ठाकरे प्रथम 
रूचिता अवचित द्वितीय तर पुजा उत्तरवार तृतिय



स्त्री भ्रुणहत्येसारख्या पातकाला रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे असुन त्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन घाटंजी न.प. सभापती तथा लॉयनेस क्लबच्या तालुका अध्यक्षा संगिता भुरे यांनी केले. लेक वाचवा मोहिमेंतर्गत स्त्री भ्रुणहत्या - एक सामाजीक कलंक या विषयावर आयोजीत खुल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. युवा पिढीने लेखनीच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवावे अशी गरज त्यांनी बोलुन दाखविली. या कार्यक्रमाला वर्षा गुज्जलवार, माधुरी चौधरी, माया यमसनवार, साधना ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषीक पुर्वा ठाकरे, द्वितीय रूचिता विजय अवचित, तृतिय पुजा उत्तरवार, चौथे सिमा अलोणे तर पाचवे बक्षीस शिवाणी चौधरी हिने पटकावले. 
शिवाय प्रज्वल गुघाणे, प्रांजली दहिवले, माया चौलमवार, जान्हवी चौधरी, नेहा अवचित, व संकल्प गोबाडे यांना प्रोत्साहनपर पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातून एकुण २७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन सिमा ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधना ठाकरे, प्रमोदिनी ताम्हने, सिमा राऊत, सिमा अलोणे, पुजा उत्तरवार, प्रिती अंजीकर, कल्पना आचलिया, मंगला आचलिया, सपना केशट्टीवार, मोहिनी ढोणे, साक्षी बेलोरकर, माया कटकमवार, संध्या उपलेंचवार, सुषमा चौधरी, वीणा अंजीकर, वर्षा माडूरवार, विजया पामपट्टीवार, रूपा अटारा यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Thursday 18 October 2012

नवयुवक दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य महाआरती स्पर्धेचे आयोजन



घाटंजी येथिल नवयुवक दुर्गोत्सव मंडळातर्फे दि. २२ ऑक्टोबरला रात्री ७.३० वाजता  महाअष्टमीनिमित्य भव्य महाआरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नि:शुल्क प्रवेश असलेल्या या स्पर्धेसाठी उत्कृष्ट थाली सजावट व उत्कृष्ट वेशभुषा करणा-या स्पर्धकांना पारितोषीक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषीक २ हजार १०१ रूपये स्व. विशाल दिडशे स्मृती प्रित्यर्थ नवयुवक दुर्गोत्सव मंडळातर्फे, द्वितीय पारितोषीक १ हजार ५०१ रू. अतुल दरेकार यांचे तर्फे, तिसरे पारितोषीक १००१ रू. जलाराम कॉम्पुटर्स तर्फे तर ५०१ रूपयांचे चौथे पारितोषीक सोहेल हिराणी यांचे तर्फे देण्यात येतील. याशिवाय प्रत्येक स्पर्धकाला नवयुवक दुर्गोत्सव मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात येईल. तरी महाआरती व त्यानिमित्य आयोजीत स्पर्धेत सहभागी होण्यास ईच्छुकांनी महाअष्टमीच्या दिवशी रात्री ७.३० वाजता नवयुवक दुर्गोत्सव मंडळ शिवाजी चौक, घाटंजी येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महाआरती मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क 

मनोज हामंद - ९६८९५०८८०८
पिंटू झाडे - ८८८८४६३९४०
राहुल उईके - ९४२२४२२४४८
गणेश अस्वले - ९४२३२०८५३९
राहुल खांडरे - ९८९०५५९५०७
चेतन राठोड - ९६०४५४९३३३

Saturday 13 October 2012

शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध - सभापती अभिषेक ठाकरे


बाजार समितीच्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ करून शेतक-यांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यास वचनबद्ध असल्याचे बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी समितीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलतांना सांगितले. या सभेला प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर, विशेष अतिथी म्हणुन भुविकास बँकेचे माजी अध्यक्ष शंकर ठाकरे, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच घाटंजी न.प.चे उपाध्यक्ष अकबर तंव्वर, सभापती राम खांडरे, संजय इंगळे, माणिक मेश्राम, श्याम बेलोरकर, गौतम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सभापती ठाकरे पुढे म्हणाले की, बाजार समितीला जास्तीत जास्त प्रमाणात  शेतकरीभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी गुरांच्या बाजाराचा लिलाव पद्धतीने  कंत्राट देऊन समितीच्या उत्पन्नात तिपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात महापुराने तालुक्यात झालेल्या नुकसानानंतर कोळी, कवठा, कोपरी या गावात सर्वप्रथम मदतीचा हात देण्यात घाटंजी बाजार समिती पुढे होती असे ते म्हणाले. शेतक-यांना दिलेल्या आश्वासनानुसार बाजार समितीचे संगणकीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असुन शासनाच्या मंजुराती नंतर लवकरच समितीचे कार्यालय संगणकीकृत होईल अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासुन तालुक्यातील शेतक-यांसाठी बाजार समितीत योग्य सोयी उपलब्ध नाहीत. अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळातच शेतक-यांच्या सुविधेसाठी कोट्यवधी रूपयांची बांधकामे सुरू झाल्याचे पाहुन पोटशुळ उठलेल्या विरोधकांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून ही कामे बंद पाडण्याचे उद्योग सुरू केले आहेत. अशावेळी शेतक-यांनी संघटीत होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे भावनिक आवाहन बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांनी केले.
वार्षीक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन व आभार प्रदर्शन समितीचे सचिव कपील चन्नावार यांनी केले. सभेचे संचालन र.मा.देशमुख यांनी केले. या सभेला तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, त्यांचे प्रतिनिधी, विवीध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष तथा शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती  

अतिक्रमणधारकांची ४० वर्षांपासुन जमिनीच्या पट्ट्यांसाठी भटकंती


तालुक्यातील मौजा भांबोरा परिसरातील फासे पारधी व विमुक्त भटक्या जमातीतील सुमारे ३४ कुटूंब गेल्या ४० वर्षांपासुन शेतजमिन व घरकुलाच्या कायम पट्ट्यापासुन वंचीत आहेत. जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे मिळावेत यासाठी तहसिल कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. या जमिनीच्या महसुल रेकॉर्ड प्रमाणे वनविभागाची असल्याचे हक्क नोंदणी व ईतर सकृत दर्शनी पुराव्यावरून सिद्ध होते. मात्र या जमिनीवर घाटंजी व केळापुर महसुल विभागाने १९७९ ते १९९० पर्यंत दंड वसुल केला आहे. याच कालावधीत अतिक्रमणधारकांना सातबारे सुद्धा देण्यात आले आहेत. मात्र जमिनीचे कायम पट्टे देताना ही जमिन वनविभागाची असल्याचे सांगण्यात येत असल्याने अतिक्रमणधारक संभ्रमात आहेत. या समस्येमुळे २०१० मध्ये ग्रामपंचायत भांबोरा येथे वनहक्क समिती व ग्रामसभेची मान्यता घेऊन उपविभागीय अधिका-यांकडे प्रकरण सादर करण्यात आले. परंतु उपविभागीय कार्यालयाकडून वनविभागाचे अतिक्रमण असल्याबाबतचे पुरावे मागण्यात येत आहेत. तर वनविभागाच्या माहितीनुसार गट नं.४३, सव्र्हे नं.१६० यामधील पार्ट क्षेत्रफळ ४६ हेक्टर २२ आर असुन महसुल विभागाच्या ७/१२ व हक्क नोंदणीवर याच गट नंबरचे क्षेत्रफळ १०० हेक्टर ९० आर आहे. त्यामुळे ही अतिक्रमीत जमिन महसुल विभागाची की, वनविभागाची याबाबत प्रशासकीय स्तरावरही संभ्रम आहे. मात्र त्यामुळे अतिक्रमणधारकांचे नुकसान होत आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये फासे पारधी, वडार, बंजारा जमातीतील कुटूंबे या पडीक जमीनीला आपल्या कष्टाने सुपीक बनवुन त्यातून पिके घेत आहेत. मात्र कायमस्वरूपी पट्टे नसल्याने या जमिनीवर त्यांना बँकेमार्फत कोणतेही कर्ज मिळत नाही. शिवाय शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. एकीकडे फासे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न चालु आहे. मात्र घाटंजी या आदिवासी तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नाही सामाजीक न्याय मंत्र्यांनी भटक्या जमातीतील लोकांना जागा मिळावी यासाठी प्रयत्न न करता निम्न पैनगंगा धरणाला महसुल विभागाची पर्यायी जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत  असा आरोप सहदेव राठोड यांनी केला आहे.
ग्रामपंचायत भांबोरा येथिल २१ फासेपारधी कुटूंबांना सन २०११ मध्ये इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मंजुर झाले असुन हे २१ कुटूंब सुमारे ६० ते ७० वर्षांपासुन स्वतंत्र पारधी बेड्यावर राहात आहेत. येथिल गट नं. ४६ मधील जमिन महसुल विभागाने शेतीसाठी पारधी कुटूंबाना वाटप केली आहे. याच परिसराच्या मध्यभागातील बेड्यावरील जमिन त्यांना घरकुल बांधकामाकरीता देण्यास टाळाटाळ करीत आहे. घाटंजी पंचायत समितीने सदर कुटूंबांकडे गाव नमुना ८ अ नसल्याने धनादेश दिलेले नाहीत. या ठिकाणी विद्युतीकरण, घरगुती मिटर तसेच यापुर्वी काही कुटूंबांचे इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम झाले आहे. शिवाय या कुटूंबांकडून ग्रा.पं.ने घरटॅक्स वसुलीही केली आहे.  असे असतांना तालुका व स्थानिक पातळीवरील यंत्रणा मात्र घरकुलासाठी जागा देण्यास टाळाटाळ करीत आहे. या सर्व कुटूंबाना घरकुलाचे पट्टे तातडीने वाटप करण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा ईशारा माजी पं.स.सदस्य तथा रा.यु.कॉ.चे तालुकाध्यक्ष सहदेव राठोड यांनी दिला आहे.
साभार :- देशोन्नती  

घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्तांपुढे आता मोठ्या समस्या नाहीत - ना.शिवाजीराव मोघे


तालुक्यातील पुरग्रस्त आता आता ब-याच अंशी सावरले असुन त्यांच्यापुढे कोणतेही ‘मेजर प्रॉब्लेम्स’ नाहीत अशी माहिती राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत दिली. घाटंजी तालुक्यातील पुरग्रस्त गावांचा दौरा केल्यावर येथिल शासकीय विश्रामभवनात ते पत्रपरिषदेला संबोधीत करीत होते.
यावेळी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान पटेल, घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, तहसिलदार प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती. सध्याच्या परिस्थितीत पुरामुळे वाहुन गेलेल्या विजेच्या खांबांना उभारणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी आधी विज वितरण वंâपनीच्या नियमानुसार विज बिल भरावे लागेल असे ते म्हणाले. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन मदतीबाबत कॅबिनेट मध्येच निर्णय होईल त्यावर आता काहीही बोलता येणार नाही असे एका प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले. तालुक्यात जाहिर झालेला दुष्काळ हा ओला होता की कोरडा यावर ते म्हणाले की याबाबत आपल्याला वर्तमानपत्राच्या बातमीवरूनच माहिती मिळाली. नेमक्या कोणत्या माहितीच्या आधारे हा दुष्काळ जाहिर करण्यात आला याबद्दल अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. 
उपविभागीय कार्यालय आर्णीला होणार असल्याच्या निर्णयावर ते म्हणाले की तो निर्णय शासनाच्या नियमाला अनुसरूनच होत असुन त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही. घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेसच्या नेतृत्वातील सत्ता असुनही आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही यावर ते म्हणाले की नगर परिषदेने मागणी केल्यास निधीची कमतरता पडू दिल्या जाणार नाही. मात्र याबाबत नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना छेडले असता निधीची मागणी सुरूच आहे. तडकाफडकी सर्व कामे शक्य नाहीत. साहेबांकडून गेल्या तिस वर्षात काही घडले नाही ते आता काय घडणार ? असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी ना.मोघेंनी तालुक्यात प्रस्तावीत असलेल्या विवीध विकासकामांची माहिती दिली. त्यामध्ये निवासी शाळा, मोवाडा आश्रमशाळेचे जांब येथे स्थानांतरण, अनुसूचीत जमातीच्या मुलामुलींसाठी वस्तीगृह, घाटंजी येथे क्रिडा संकुल तसेच विवीध सहा ठिकाणी पुल बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
साभार :- देशोन्नती  

विभागीय संघटकपदी संजय पवार अविरोध


महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना पुणे च्या अमरावती विभागीय संघटकपदी घाटंजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांची अविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या नांदेड येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष बी.बी.तिकांडे (नगर), सरचिटनिस मिलिंद चौधरी (रायगड), गोपाल बोंडे (अकोला), श्री.व्यास (औरंगाबाद), श्री पवार (नाशिक), प्रकाश भक्ते (चंद्रपुर), अमरावती विभागाचे उपाध्यक्ष किरण गावंडे यांचेसह महाराष्ट्राच्या २८ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद्द कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या यवतमाळ शाखेचे सर्व कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी स्वागत केले आहे.
साभार :- देशोन्नती  

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी सहदेव राठोड


जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी घाटंजी पंचायत समितीचे माजी सदस्य सहदेव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. मनोहर नाईक, आमदार संदिप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांच्या उपस्थितीत राठोड यांची या पदावर सर्वानुमते नेमणुक करण्यात आली. राठोड यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांचेसह सर्व जेष्ठ नेत्यांना दिले आहे.
यापुर्वी त्यानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कार्य केले असुन एक अभ्यासु पंचायत समिती सदस्य अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीचे बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, उपसभापती प्रकाश डंभारे, अमोल कोटरंगे, दिलीप मडावी यांचेसह तालुक्यातील कार्यकत्र्यांनी स्वागत केले आहे. या पदाच्या माध्यमातुन राष्ट्रवादी कॉंग्रेसला ग्रामिण भागातील तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याची प्रतिक्रीया सहदेव राठोड यांनी दिली.
साभार :- देशोन्नती