Pages

Saturday 29 September 2012

कार्यकर्त्यांचे ‘लाड’ पुरवितांना समाजाची ‘चाड’ हवी


बालहट्ट, स्त्री हट्ट व राजहट्ट हे तिन हट्ट पुरविण्यासाठी काहीही करावे लागते असा समज आपल्या समाजात रूळला आहे. किंबहुना तसे ऐतिहासिक संदर्भही आढळतात. गेल्या काही काळात ‘कार्यकर्ता हट्ट’ हा प्रकार राजकीय वर्तुळात ऐकायला येत आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे म्हणुन एखादी गोष्ट करावीच लागेल यासाठी एखादा लोकप्रतिनिधी चुकीचे निर्णय घेतो. मात्र त्यानंतर ती गोष्ट जेव्हा उघडकीस येते तेव्हा त्या नेत्यालाच तोंडघशी पडावे लागते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापुर जिल्ह्यातील दोन आश्रमशाळा कार्यकर्त्याचे लाड पुरविण्यासाठी थेट यवतमाळ जिल्ह्यात हलविण्याचा झालेला प्रयत्न. 
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या ‘केविलवाण्या’ राजकीय हट्टाला चपराक बसली आहे. राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी आपल्या लाडक्या कार्यकर्त्यासाठी नियम, कायदा व समाजाप्रती असलेली जबाबदारी बाजुला ठेवुन सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट येथुन पांडूरंग राठोड या संस्थाचालकाच्या दोन आश्रमशाळा आपल्या अधिनस्त अधिका-यांवर दबाव टाकुन बंद करण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये झालेल्या या कार्यवाही नंतर त्या शाळा चक्क केळापुर व घोटी येथे हलविण्याचा निर्णय घेतला. सदर संस्थाचालकाने न्यायालयात दाद मागितल्यावर या गंभिर विषयाला वाचा फुटली. तर न्यायालयाने याप्रकरणी दिलेल्या निर्णयानंतर तर ना. मोघेंचा हा ‘सामाजीक न्याय’ चांगलाच चर्चेत आला आहे. नविन नेतृत्व कार्यकर्त्यांमधुनच निर्माण होत असते. त्यासाठी कार्यकर्त्यांना सक्षम करतांना काही गोष्टी कराव्या लागतात हे सर्वांनाच मान्य आहे. मात्र तसे करतांना कोणाच्या तोंडचा घास हिरावल्या जातोय का? कोणावर अन्याय तर होत नाहीय ना याचा विचार ना. मोघेंसारख्या अनुभवी व जेष्ठ नेत्यांनी करायला हवा असे वाटते. 
सगळ्या गोष्टी पचल्या जाईल असा काळ आता राहिला नाही. एका विशिष्ट मर्यादे पर्यंत त्या लपुन राहतात. मात्र जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन त्या बाहेर येतात अन कालांतराने त्याचा ‘तमाशा’ जनतेसमोर झाल्याशिवाय राहात नाही. कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे ना. मोघे आजवर अनेकदा अडचणीत आले आहेत. त्यातही मोघेंचे मानसपुत्र म्हणुन वावरणा-या त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकामुळे तर ते तोंडघशी पडले आहेत.  मात्र बहुदा त्यांना त्याचे शल्य नाही हेच त्यांच्या वागणुकीवरून दिसते. हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न असला तरी ते समाजाचे प्रतिनिधीत्व करतात या नात्याने त्यांच्याकडून काही अपेक्षा नाईलाजास्तव का होईना पण ठेवाव्याच लागतात. कोणावर अन्याय न करताही कार्यकर्ते घडविता येतात. यवतमाळ जिल्ह्यातच ना. मोघेंच्या समकालीन असलेले स्व. उत्तमराव पाटील, ना. मनोहर नाईक यांच्या मार्गदर्शनात पुढे आलेले अनेक कार्यकर्ते आज मोठ्या पदावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके यांची नावे यामध्ये प्रामुख्याने घ्यावी लागेल. त्या तुलनेत गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडात घाटंजी, पांढरकवडा व आर्णी या भागातून नवे नेतृत्व पुढे आलेले नाही हेच दुर्दैव आहे. मात्र तरी देखिल दरवेळी मंत्रीपद ना. मोघेंच्या वाट्याला येते. त्याचा नेमका किती फायदा या भागातील जनतेला झाला हा भाग अलाहिदा.
मतदार संघातील घाटंजी तालुक्याविषयी ना. मोघेंचा सापत्नभाव नेहमीच सिद्ध झाला आहे. उपविभाग निर्मीतीच्या पार्श्वभूमीवर ही बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उपविभागीय कार्यालयाचा दर्जा मिळण्यासाठी घाटंजी सर्व दृष्टीने योग्य असतांनाही मोघेंची नजर आर्णीवरच खिळली आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वातील घाटंजी नगर परिषदेने या विरोधात एकमुखी ठराव घेऊन न्यायालयात याचिकाही दाखल केली असल्याने स्वपक्षातच मोघेंना यापुढे विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. कोणताही निर्णय घेतांना कार्यकर्त्यांच्या हट्टासोबतच ना.मोघेंनी समाजमनाचाही विचार केला तर वेळोवेळी त्यांचेवर नामुष्की ओढवणार नाही.

अमोल राऊत
साभार :- देशोन्नती  


Wednesday 19 September 2012

गॅस सिलेंडर ‘ऑनलाईन’ वरून ‘लांबलाईन’वर




दोन तिन वर्षांपुर्वी गॅस सिलेंडर वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सुविधा अंमलात आली. मोबाईलद्वारे फोन करून बुकींग करणे सक्तीचे केल्या गेले. त्यानंतर घरपोच गॅस पोहचविण्यात येत होता. आता मात्र या सेवेचा पार बोजवारा उडाला असुन ही सेवा ऑनलाईन वरून लांबलाईन झाल्याची प्रतिक्रीया घाटंजी शहरात व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी शहरात गॅस सिलेंडरचे घरपोच वितरण अनियमीतपणे होत आहे. काही ठरावीक भागातच गॅस घरपोच जातो. या आठवड्यात तर ऑनलाईन बुकींगच बंद झाली असे लखमाई ईण्डेन या गॅस वितरकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिन्याभरापुर्वी ऑनलाईन बुकींग केलेल्या ग्राहकांनाही सिलेंडर मिळेनासे झाले. त्यामूळे अनेकांनी थेट गॅस वितरकाच्या गोडाऊनपुढेच सिलेंडरसह ठाण मांडणे सुरू केले. आता तर अनेकदा गॅस सिलेंडरची ही रांग तब्बल १ ते २ किलोमीटर पर्यंत पसरलेली असते. पहाटे ६ वाजतापासुनच ग्राहक येथे आपला नंबर लावुन बसतात. सुमारे ६ ते ७ तास वाट पाहिल्यावर त्यांना सिलेंडर मिळते. कधी तर ग्राहकांची संख्या जास्त असल्यावर पुरेसे सिलेंडर उपलब्ध नसल्याने तासंतास वाट पाहुनही आल्या पावली परत जावे लागते. तिन चार दिवसांपुर्वी तर लखमाई ईण्डेनच्या अंजी रोडवरील गोदामावर सुमारे ८०० ते ९०० ग्राहकांची रांग सकाळपासुन लागलेली होती. मात्र गॅसच्या गाडीमध्ये केवळ ३०० सिलेंडरच आले. त्यामुळे ईतर ग्राहकांना परत जावे लागले. एकीकडे ग्राहकाना सिलेंडर मिळणे दुरापास्त झाले असतांना काळ्या बाजारात मात्र गॅस सिलेंडरचा मागणी तेवढा पुरवठा सुरू आहे. ज्या ग्राहकांनी वर्षातून केवळ चार ते पाच सिलेंडरची उचल केली आहे. त्यांच्या नावे त्यापेक्षा कितीतरी अधिक सिलेंडरची नोंद आहे. महसुल प्रशासन, पुरवठा निरिक्षक व तहसिलदार गेल्या अनेक महिन्यांपासुन सुरू असलेल्या या प्रकाराकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करीत आहे. घाटंजी महसुल प्रशासनाने कधी घरगुती सिलेंडरच्या व्यावसायीक वापरावर कार्यवाही केल्याचे ऐकीवात नाही. अधिका-यांच्या या चुप्पीचे नेमके काय कारण आहे हे सर्वानांच माहित आहे. 
लखमाई ईण्डेनच्या मनमानीपणामुळे ऑनलाईन गॅस बुकींग नाममात्रच ठरली असुन ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. 
अमोल राऊत

साभार :- देशोन्नती 



Tuesday 18 September 2012

वाहतुक पोलीसाच्या सतर्कतेने सापडला वॉन्टेड आरोपी



खुनाच्या गुन्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासुन घाटंजी पोलीसांना वॉन्टेड असलेला आरोपी श्रावण रामाजी आत्राम हा वणी येथे वाहतुक पोलीसांच्या तावडीत सापडला. २०१० मध्ये इंझाळा मार्गावर कैलास अवथळे रा.माथनी हे त्यांच्या पत्नीसह रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जात असतांना अन्य आरोपींसह त्यांना लुटण्याच्या हेतुने अडवुन खुन केला होता. त्यातील दुसरा आरोपी अटकेत आहे. मात्र श्रावण आत्राम हा तेव्हापासुन फरारी आहे.
याबाबत विस्तृत माहिती अशी की, आरोपी श्रावण आत्राम ईतर दोन मित्रांसह एकाच दुचाकीवर वणी नांदेपेरा रस्त्याने जात असतांना वाहतुक नियमाचे उल्लंघन केले म्हणुन वाहतुक पोलीस उमेश चंदन यांनी त्यांना अडविले. यावेळी अब्दुल कलीम व नितिन खांदवे हे वाहतुक पोलीस कर्मचारीही तिथे होते. या पोलीसांनी त्यांना ६०० रूपये दंड लागेल असे सांगितले. त्यावरून त्यांनी पोलीसांशी वाद घातला. त्यापैकी एकाने मी सैन्यदलात असल्याचे सांगितले. पोलीसांनी गाडी पोलीस स्टेशनला लावा असे सांगितल्यावर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. त्यापैकी एकजण पोलीसांशी येऊन बोलु लागताच ईतर दोघांनी त्याच्याशी वाद घालायला सुरूवात केली. तु दंड का भरला असे विचारून त्या तिघांमध्ये मारामारी सुरू झाली. त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेले. चौकशीत दोघांनी मारेगाव (ता.घाटंजी) येथे राहात असल्याचे सांगितले. तर श्रावण आत्राम याने वांजरी (ता.वणी) येथिल पत्ता सांगितला. तसेच आपले नाव श्रावण बापुराव आत्राम असल्याची माहिती त्याने दिली. वाहतुक पोलीस कर्मचारी उमेश चंदन हे यापुर्वी घाटंजी पोलीस स्टेशनला कार्यरत असल्याने त्यांना श्रावण आत्राम नामक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती होती. त्यांनी ही माहिती संबंधीतांना देऊन वांजरी येथे श्रावण आत्रामची चौकशी करण्याबाबत सुचविले. या चौकशीत सदर आरोपीचे नातेवाईक तेथे राहत असल्याची बाब पुढे आली. त्यांना श्रावणचे पुर्ण नाव विचारले असता श्रावण रामाजी आत्राम हे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलीसांचा संशय बळावला. उमेश चंदन यांनी घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये विचारणा करून माहितीची खात्री करून घेतली. घाटंजी पोलीसांसह अदिलाबाद, पुलगाव, वर्धा पोलीसांना हवा असलेला श्रावण आत्राम हाच असल्याची खात्री पटल्यावर घाटंजी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये त्याचेवर कलम ३९७, ३०२, २१६, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल आहे. वाहतुक पोलीस कर्मचारी उमेश चंदन, अब्दुल कलीम, नितीन खांदवे यांच्या सतर्कतेमुळे हा वॉन्टेड आरोपी पोलीसांच्या कचाट्यात सापडला.यानेही मनसेच्या या आरोपाला दुजोरा दिला.
साभार :- देशोन्नती 



टाईमपास करणा-या अधिका-यांना धडा शिकविणार

मनसेचा ईशारा

आपले कर्तव्य विसरून तिन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करण्यासाठी टाईमपास म्हणुन टोलवाटोलवी करण्या-या अधिका-यांना मनसे स्टाईलनेच धडा शिकविल्या जाईल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आला. घाटंजी नगर परिषदेत मनसे कार्यकत्र्यांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथिल विश्रामगृहात पत्रपरिषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बोक्से, प्रशांत धांदे, एस.टी. कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्याम चंदेल, जिल्हाध्यक्ष गाडगे पाटील, मनसेचे यवतमाळ तालुकाध्यक्ष संजय देठे, घाटंजी तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यांचेकडे केलेल्या तक्रारी, त्यावर दिलेली स्मरणपत्रे यावर मुख्याधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. दरवेळी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे त्यांनी दिली. सर्वसामान्यांनी विनापरवानगी बांधकाम केले तर न.प.त्यांचेवर दंड ठोठावुन कार्यवाही करते. मग विनापरवाना बांधकाम सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ईमारती व समर्थ मुकबधीर विद्यालयाला वेगळा न्याय का? त्यांचेवर कार्यवाही का करण्यात आली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. तुंबलेल्या नाल्या, जीवघेणे रस्ते, बंद पडलेले पथदिवे, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा एक ना अनेक समस्या घाटंजी शहरात असतांना सत्ताधारी, विरोधक व मुख्याधीकारी आपापसात संगनमत करून मलिदा लाटण्यात व्यस्त आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. अवैध बांधकामांवर कार्यवाही करण्यात आली नाही तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेच ही अवैध बांधकामे पाडतील असा ईशारा प्रशांत धांदे यांनी यावेळी दिला.  केंद्र , राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता, स्थानिक आमदार मंत्री सत्ताधारी पक्षाचे असे असतांना घाटंजी शहराची भयाण अवस्था संतापजनक असुन राज्याचे अनुभवी मंत्री असलेले ना. मोघे यांच्या राजकीय प्रतिष्ठेला न शोभणारी आहे. त्यांनी आपले आर्णी प्रेम बाजुला ठेवुन घाटंजी शहराच्या विदारक परिस्थितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन संजय बोक्से यांनी यावेळी केले. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढेही लढा देत राहिल. मात्र त्यासाठी जनतेनेही आम्हाला पाठींबा द्यावा असे बोक्से म्हणाले. यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी नगर परिषदेत लोकांच्या समस्या सोडविण्यास सपशेल अपयशी ठरली असुन ना.शिवाजीराव मोघे यांना घाटंजीच्या विकासाशी देणेघेणे नसल्याचा आरोप मनसेने यावेळी केला. उल्लेखनिय म्हणजे पत्रपरिषदेला उपस्थित असलेल्या एका कॉंग्रेस पदाधिका-यानेही मनसेच्या या आरोपाला दुजोरा दिला.

साभार :- देशोन्नती  


Saturday 15 September 2012

आठवडाभरापासुन बेपत्ता युवकाच्या तपासात पोलीसांना यश नाही

घाटंजीवासियात तिव्र संताप

गेल्या आठवडाभरापासुन बेपत्ता असलेल्या यश बाबाराव लिंगणवार याच्या प्रकरणात पोलीस कमालीचा दुर्लक्षीतपणा करीत असुन अजुनही त्या युवकाचा शोध लागलेला नाही. या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या आरोपी युवकांच्या तपासणीतूनही काहीही निष्पन्न झाले नसल्याने अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आठ दिवसांपासुन यशचा ठावठिकाणा पोलीसांना लागलेला नाही. या प्रकरणात पोलीस तपासात अजिबात गांभिर्य नसुन कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेले नाहीत. यश हा यवतमाळ येथिल बाजोरीया नगरातून बेपत्ता झाला आहे. तो मुळचा घाटंजी येथिल रहिवासी आहे. त्यामुळे घाटंजी वासियांमध्ये पोलीस तपासाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. घाटंजी येथिल नाभिक संघटना तसेच व्यापारी संघटना याप्रकरणी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
साभार :- देशोन्नती   

ईलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागलेल्या संशयास्पद आगीत २१ लाखांचे नुकसान











येथिल महाराणा प्रताप चौकात असलेल्या पुजा ईलेक्ट्रॉनिक्स हे दुकान व जेसिस कॉलनीत असलेल्या गोदामाला दि.१३ ला रात्री १ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे २१ लाख ५० हजार रूपयांचे साहित्य जळुन खाक झाले. जलाराम मंदिराच्या बाजुला पालतेवार कॉम्पलेक्स मध्ये तळमजल्यावर हे दुकान आहे. रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास परिसरातील काही नागरिकांना दुकानातून धुराचे लोट येत असल्याचे दिसले. लोकांनी धावाधाव करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. नगर परिषदेचा टँकर तसेच यवतमाळ येथुन अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र तोवर दुकान व गोदामातील टि.व्ही.,फ्रीज, कुलर यासह विवीध ईलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य भस्मसात झाले. या आगीत सुमारे २१ लाख ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. ही आग अपघाताने लागली नसुन लावण्यात आली असल्याचा दाट संशय आहे. दुकान व गोदाम या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी आग कशी लागली ?  दुकान बंद असताना आग एवढी कशी पसरली? याबाबत तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. या प्रकरणी पोलीसांनी इश्वर शंकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल केली आहे.
साभार :- देशोन्नती   

Wednesday 12 September 2012

घाटंजी नगर परिषदेत मनसेचा राडा

मुख्याधिका-याला धक्काबुक्की








विनापरवाना बांधकामे, शहरातील समस्या तसेच मुख्याधिका-याची मनमानी याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कार्यकर्त्यांनी  घाटंजी नगर परिषद कार्यालयात गोंधळ घातला. मुख्याधिका-याच्या कक्षातील साहित्याची तोडफोड करून मुख्याधिका-याला धक्काबुक्की केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, समर्थ कर्णबधीर विद्यालयाचे अवैध बांधकाम याविषयी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यानी गेल्या काही  महिन्यांपासुन तक्रारी केल्या होत्या. मात्र मुख्याधिका-यानी त्यावर कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकत्र्यानी ..कार्यालयात धुडगूस घातला. मुख्याधिकारी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देतात हा त्यांचा आरोप होता. कार्यालयातील संगणके, टेबल खुच्र्या आदींची तोडफोड करून  कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तोडफोड केल्यावर मुख्याधिका-यांच्या कक्षाला चपलांचा हार घालण्यात आला अचानक झालेल्या प्रकाराने कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती. या गोंधळात नगर परिषदेचे सुमारे लाखांचे नुकसान झाल्याचे मुख्याधिका-यानी सांगितले.


मुख्याधिका-यांचा हेकेखोरपणाच कारणीभुत - नगराध्यक्ष
 आज झालेली घटना घाटंजी नगर परिषदेच्या ईतिहासात प्रथमच घडली असुन ती अत्यंत दुदैवी आहे. मात्र या संतापाला मुख्याधिका-यांचा हेकेखोरपणा असहकार्याची कार्यपद्धतच जबाबदार असल्याची प्रतिक्रीया नगराध्यक्ष जगदीश पंजाबी यांनी व्यक्त केली.

कार्यकर्ते काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते - मुख्याधिकारी
मनसेच्या कार्यकत्र्यांनी दिलेल्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. त्यांना हीच गोष्ट समजावुन सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र कार्यकर्ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तोडफोड करण्याचाच त्यांचा हेतु होता अशी प्रतिक्रीया मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी दिली. पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने समस्या सोडविण्यास कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ताधारी मुख्याधिका-यात समन्वय नाही - गटनेता
सत्ताधारी मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने विकास खुंटला असुन त्यामुळेच नगर परिषदेत धिंगाणा झाल्याची प्रतिक्रीया विरोधी पक्षाचे गटनेते संतोष शेंद्रे यांनी दिली. कोणालाच जनतेच्या समस्यांशी घेणेदेणे नसुन सर्व आपल्याच कामात मग्न असल्याचे ते म्हणाले

साभार :- देशोन्नती  

मनसेने घाटंजी नगर परिषदेत केलेल्या तोडफोडीचा Video