Pages

Wednesday 31 August 2011

सायतखर्डा तंटामुक्त समितीकडून गुणवंतांचा सत्कार


तालुक्यातील सायतखर्डा तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नुकताच गावातील गुणवंत विद्यार्थी, महिला बचत गट, व्यसन मुक्त व्यक्ती, तंटामुक्तीसाठी मोलाचे कार्य करणारे नागरीक तसेच ईतर क्षेत्रात नैपुण्य प्राप्त 
करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सायतखर्डा गावाला नुकताच तंटामुक्तीसाठी ३ लाख रूपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी तंटामुक्तीचे अध्यक्ष गजानन लेनगुरे व पोलीस पाटील प्रभाकर देशमुख यांचे भरीव योगदान आहे. त्यामुळे याप्रसंगी त्यांचाही शाल श्रीफळ देऊन सरपंच गजानन शेंडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गोबाडे यांनी केले. या सत्कार सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त गाव समिती, ग्रा.पं. सरपंच, सचिव व सदस्य, महिला बचत गट, शिक्षक वृंद व नागरीकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

जिजाऊ ब्रिगेड तर्फे शिवणी जि.प.शाळेत निबंध स्पर्धा

जिजाऊ ब्रिगेड घाटंजी तालुका शाखेच्या वतीने शिवणी जि.प.शाळेत नुकतेच वर्ग ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. थोर नेत्यांची ओळख या विषयावर झालेल्या या स्पर्धेत पहिल्या तिन विजेत्यांना पारितोषीक देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.ए.राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गोपीचंद पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष भावना राऊत, जिल्हा सचिव अनिता गरड, जिल्हा कार्याध्यक्ष अनिता व-हाडे, शोभा अलोणे, अंजली अडेकार,कृपाली चौधरी, वर्षा ठाकरे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रगती फुटाणे व आभार प्रदर्शन अरूणा चिंतावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगिता गेडाम, संदिप राऊत, हितेश राठोड यांनी परिश्रम घेतले

Sunday 28 August 2011

घाटंजीत पोळा सण उत्साहात साजरा

















जनलोकपाल विजयाचा घाटंजीत जल्लोष









गेल्या काही दिवसांपासुन आंदोलनमय झालेल्या घाटंजी शहरात अण्णा हजारेंच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाल्याबद्दल प्रचंड जल्लोष करण्यात आला. येथिल हुतात्मा स्मारकाजवळ सकाळी ११ वाजेपासुन नागरीक एकत्र जमले होते. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास घाटंजी शाखेच्या वतीने हुतात्मा स्मारकाला वंदन करून फटाक्यांच्या आवाजात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौक, दुर्गा माता वार्ड, वसंत नगर येथिल युवकानी ढोल ताशांच्या गजरात शहरातुन विजयी मिरवणुक काढली.
गेल्या आठवडाभरात घाटंजी शहरात अभुतपुर्व आंदोलने झाली. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, कर्मचारी वर्ग यांचेसह सर्वस्तरातील नागरीक या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते.

Monday 22 August 2011

अण्णांच्या समर्थनार्थ घाटंजीत आंदोलनांचे सत्र




देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला घाटंजी तालुक्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. शहरातील ऑटोचालक, मालवाहु वाहनधारक तसेच प्रवासी वाहतुकदारांनी भव्य रॅली काढली. शेकडो वाहनधारक आपल्या व्यवसायाला विराम देऊन या रॅली मध्ये सहभागी झाले होते. तसेच लॉयनेस क्लब, एकता महिला मंडळ, वसंत नगर महिला मंडळ, एकता महिला संस्कार कलश योजना या महिला मंडळातील महिलांनी जनलोकपाल विधेयकाच्या समर्थनासाठी येथिल हुतात्मा स्मारकाजवळ निदर्शने केली. त्यानंतर शहरातुन मोर्चा काढण्यात आला. अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला.
या आंदोलनात अ‍ॅड.अनुपमा दाते, मंगला कटकोजवार, सौ.काकडे, कला जोगे, मृदूला आडे, संध्या उपलेंचवार, माया कटकमवार, साधना ठाकरे, संगिता भुरे, वैशाली वाघ, सविता मानकर, मेघा गोमेकर, प्रभा काशेट्टीवार, ज्योती काशेट्टीवार, सिमा ठाकरे, केशरी विठाळकर, वृशाली बेले, साधना काशेट्टीवार, शोभा कुपटेकर, वंदना अवचित, अर्चना उपलेंचवार, सुगंधा पुराणीक, प्रिती अंजीकर, मिनाक्षी जकाते, सुनिता निस्ताने, मंजुळा पेंदाम, शारदा मैंद, ललिता लिंगनवार, लता नखाते, वंदना गंधारे, माया यमसनवार, दर्शना उत्तरवार, संध्या भांडारवार, शामल पडगिलवार, वर्षा माडुरवार, स्मिता नार्लावार, साधना पडगिलवार, शोभा कुपटेकर यांचेसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास गिलानी महाविद्यालय, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था तसेच ईतर शैक्षणीक संस्थांच्या विद्यार्थांनी शहरातुन भव्य रॅली काढली. अनेक विद्यार्थी भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र आल्याने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

घाटंजी बाजार समिती निवडणुकीत मोघे-लोणकर गटाची सरशी


कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीच्या निवडणुकीत सत्ताधारी पारवेकर गटाला पराभुत करून मोघे-लोणकर गटाने आपले वर्चस्व पुर्नस्थापीत केले. १८ पैकी १० जागांवर त्यांनी विजय संपादन केला. पारवेकर गटाला ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर तिस-या आघाडीला खातेही उघडता आले नाही.
या निवडणुकीत सहकारी संस्था गटातुन मोघे लोणकर गटाचे अभिषेक ठाकरे (१४८ मते), गजानन चौधरी (१४५ मते), किशोर चवरडोल (१४३ मते) हे विजयी झाले. तर पारवेकर गटाचे विवेक भोयर (१५६ मते), संजय निकडे (१५५ मते), सचिन देशमुख (१५३ मते) व प्रकाश डंभारे (१४६ मते) हे उमेदवार विजयी झाले. ईतर मागासवर्गीय गटात आशिष लोणकर (१५३ मते) विजयी झाले. सहकारी संस्था (अ.ज.) गटात पारवेकर गटाचे चंपत आत्राम (१६२ मते) विजयी झाले. व्यापारी अडते गटात अकबर तंवर (४३ मते) व नामदेव आडे (४२ मते) या मोघे-लोणकर गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली. हमाल मापारी गटात सै.रफिक सै.महेमुद (१९९ मते) हे पारवेकर गटाचे उमेदवार विजयी झाले. ग्रा.पं.सर्वसाधारण गटामध्ये सचिन ठाकरे (२४६ मते) हे मोघे लोणकर गटाचे व गजानन भोयर (२३६ मते) हे पारवेकर गटाचे उमेदवार निवडुन आले. ग्रा.पं.(अ.जा./ज) गटात नागोराव कुमरे (२२८ मते) हे मोघे-लोणकर गटाचे उमेदवार निवडुन आले. ग्रा.पं. आर्थिक दुर्बल घटक गटामध्ये रमेश आंबेपवार (२६४ मते) हे मोघे-लोणकर गटाचे उमेदवार विजयी झाले. सहकारी संस्था महिला गटातुन मोघे-लोणकर गटाच्या तुरपाबाई पुसनाके व पारवेकर गटाच्या वंदना जिभकाटे (१५७ मते) विजयी झाल्या. बाजार समितीचे विद्यमान उपसभापती बाबाराव देठे व मोघे लोणकर गटाचे एकलाख खान या दिग्गज उमेदवारांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मोघे-लोणकर गटाची युती असली तरी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी बाजार समितीवर स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आपलेच उमेदवार लादले होते. मात्र सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेल्या सुरेश लोणकरांपुढे त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत टिकाव धरू शकला नाही हे विषेश.  मतदारांनी दोन्ही गटांना संमिश्र कौल दिल्याने सभापती पदासाठी ऐनवेळी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरेश लोणकरांचे चिरंजीव आशिष लोणकर यांचेकडे सभापती पदाचे उमेदवार म्हणुन पाहिल्या जात आहे. मात्र त्यासाठी उमेदवारांना आपल्या काबुत ठेवण्याचे आव्हान मोघे-लोणकर गटापुढे आहे.निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश चवरडोल, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डोंगरसिंग खोब्रागडे, बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार, श्री. हिवरकर यांच्या मार्गदर्शनात सहकार विभागाच्या कर्मचा-यांनी मतमोजणीचे काम पाहिले.

Saturday 20 August 2011


Image by FlamingText.comआज दुपारी २ वाजता अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ घाटंजी येथे महिलांचा



स्थळ:- हुतात्मा स्मारक घाटंजी


हजारोंच्या संख्येने
Image by FlamingText.com

Friday 19 August 2011

अण्णा हजारेंच्या उपोषणाला घाटंजी तालुक्यात व्यापक पाठींबा




कठोर जनलोकपाल विधेयक मंजुरीसाठी अण्णा हजारेंच्या उपोषणाला ग्रामिण भागातही व्यापक पाठींबा मिळत आहे. घाटंजी शहरात विविध आंदोलनांनी वातावरण अण्णामय झाले आहे.
काल (दि.१८) रात्री येथिल पोलीस स्टेशन चौकातुन निघालेल्या युवा मशाल रॅली मध्ये हजारो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, सामाजीक कार्यकर्ते अशा सुमारे दोन हजार नागरीकांची अभुतपुर्व रॅली शहरातुन निघाली. हातात धगधगणा-या मशाली, राष्ट्रध्वज व डोक्यावर 'मी अण्णा हजारे' ची टोपी घालुन अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, कपिल सिबल, मनिष तिवारी यांचे विरोधात प्रचंड घोषणाबाजीने परीसर दणाणुन गेला होता. आज सकाळी ११.३० दरम्यान शहरातुन मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शेकडो तरूणांनी यामध्ये सहभाग घेतला.
त्यानंतर ऑटो, रिक्शा, प्रवासी वाहने, मालवाहु वाहने यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. शेकडो वाहनधारकांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गेल्या काही दिवसांपासुन तालुक्यात अण्णा हजारे व लोकपाल विधेयकाचीच चर्चा सुरू आहे.

संपूर्ण घाटंजी अण्णा हजारेमय...!

मशाल रॅलीला तरुणाईचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद
हजारो आबाल वृद्ध रस्त्यावर