Pages

Monday 31 October 2011

चोरांब्याच्या कुप्रसिद्ध कोंबडबाजारावर ‘बाबुराव पॅटर्न’ने कारवाई

बघ्यांना अटक; सुत्रधार मोकळे
शर्यतीच्या कोंबड्यांची रात्रीच विल्हेवाट
अवैध व्यवसायांना संरक्षण देण्याच्या घाटंजी ठाणेदाराच्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे तालुक्यात ‘बाबुराव पॅटर्न’ चांगलाच चर्चेत आला आहे. एरवी ‘पॅटर्न’ हा चांगल्या कार्यासाठी प्रसिद्ध असतो. मात्र घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ प्रत्येक प्रकरणामध्येच देवाणघेवाणीचा विषय होत असल्याने व गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या अजब कार्यपद्धतीमुळे याला बाबुराव पॅटर्न असे नावच देण्यात आले आहे. याच पॅटर्न नुसार पोलीसांनी एक कारवाई केली. लाखो रूपयांची ऊलाढाल असलेल्या चोरांबा येथिल कोंबडबाजारावर घाटंजी पोलीसांनी अचानक छापा टाकला. 
या कारवाईत अभिमान रामचंद्र मोहिजे याचेसह विस जणांना अटक करण्यात आली. तर शर्यतीचे कोंबडे, मोबाईल, रोकड व १० दुचाकी असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. घाटंजीपासुन अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या चोरांबा शिवारात आठवड्यातुन किमान तिन दिवस भव्य कोंबडबाजार भरतो. कुणाचीही भिती नसल्याने आंध्र प्रदेशासह विदर्भातील अनेक जिल्ह्यातुन येथे हजारो जुगारी सहभागी होतात. मात्र या बाजारावर अद्यापपावेतो पोलीस कारवाई झाली नाही. एवढेच नव्हे तर हा बाजार भरविणा-या मुख्य सुत्रधाराने एकदा पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन पोलीस कर्मचा-यास बेदम मारहाण केली होती. त्यावेळी ठाणेदार बाबुराव खंदारे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले यांनी त्या आरोपीचीच बाजु घेतल्याची बाब प्रसिद्धी माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आली होती. पोलीसच पाठीशी असल्याने चोरंब्याचा हा कोंबडबाजार ऐटीत सुरू होता. मात्र नियमितपणे सुरू असलेल्या हप्त्याला या महिन्यात काहीसा विलंब झाल्यामुळे हा कारवाईचा देखावा करण्यात आला अशी चर्चा अवैध व्यावसायीकांमध्ये सुरू आहे. 
ठाणेदार बाबुराव खंदारे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले यांचे नेतृत्वात हा तथाकथित छापा टाकण्यात आला. त्यावेळी कोंबडबाजारात तब्बल १२ शर्यतीचे कोंबडे होते. मात्र पोलीसांनी केवळ पाच कोंबडे जप्त केल्याची नोंद आहे. शिवाय या कोंबड्यांची रात्रभरातच विल्हेवाट लावण्यात आली. पोलीसांनी अटक केलेल्या बहुतांश आरोपींमध्ये शर्यत पाहणारे व लावणारे यांचाच समावेश आहे. मात्र हा कोंबडबाजार भरविणा-या सुत्रधारांना मोकाट सोडण्यात आल्याने ही संपुर्ण कारवाईच संशयाच्या भोव-यात सापडली आहे.
काल रात्रीच्या सुमारास घाटंजी पोलीस स्टेशनच्या आवारात कोंबडबाजार भरविणा-यांचा जथ्थाच गोळा झाला होता. मात्र पोलीसांनी त्यांचेवर कोणतीही कारवाई केली नाही. जप्त करण्यात आलेल्या काही दुचाकी आर्थिक देवाणघेवाण करून सोडण्यात आल्या. या कथित कारवाई नंतर हा कोंबडबाजार कायमचा बंद होणार की, नव्या जोमाने डोके वर काढणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साभार:- देशोन्नती

घाटंजी तालुक्याला साथरोगांचा ‘ताप’

शहरातील घाणीकडे न.प.चे दुर्लक्ष
आरोग्य विभाग कागदोपत्री ‘ओके’
बदलत्या वातावरणामुळे रोगट परिस्थिती निर्माण झाल्याने गोरगरीब जनता आजारांच्या विळख्यात सापडली आहे. साथीच्या आजारांवर वेळीच उपचारही मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे सामाजिक आरोग्य बिघडले आहे. आधीच बदलते वातावरण, बोचरी थंडी, त्यात घाण, दुर्गंधी आणि डासांच्या उच्छादामुळे आजारांचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसले आहे. साथींच्या आजारांनी गोरगरीब जनता  बेजार झाली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश भागांत सध्या मलेरिया, टायफॉईड, कावीळ,  सर्दी, ताप, खोकला यांसारख्या  आजारांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डासांच्या उच्छादामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळेच  मलेरियाने थैमान घातले आहे. शहरातील नाले, गटारे, कचराकुंडी, मलनिस्सारण योग्य पध्दतीने होत नसल्याने  आजाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विविध वार्डांमध्ये घरातून निघणारे सांडपाणीr जाण्यासाठी नाल्या नसल्याने ते तेथेच राहाते आणि यातून मच्छरांची उत्पत्ती होते. याचा परिणाम मलेरिया आणि तत्सम आजारांच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे.त्यामुळे लहान मुले, वृध्द याबरोबरच सर्वसामान्य नागरिकही आजाराने पछाडले आहेत. शासकीय रूग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयांत सर्दी, खोकला, पडसे यांसह ताप, थंडी, मलेरिया अशा साथीच्या आजाराने ग्रासलेले शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहेत. शहरात अस्वच्छता, कच-याचे ढिग, दुर्गंधी, डासांचे थैमान आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याकडे घाटंजी नगर परिषदेने पाठ फिरवली आहे. साथीच्या आजारावर उपाययोजनेसाठी नगर परिषदेकडुन स्वच्छता, कच-याचे ढिग उचलणे, जंतुनाशकाची फवारणी करणे ही कामे होत नसल्याने या आजाराचे प्रमाण वाढतच आहे. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक कुटुंबातील एक-दोन रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त असून सर्दी, खोकला, ताप आदी कारणांसाठी दवाखान्यात येणा-या  रुग्णांची संख्या मोठी आहे. तथापि, हे सर्व रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने आरोग्यखात्याला या साथरोगांची कल्पना येत नाही. घाटंजी नगर परिषद क्षेत्रात तर साथरोगांसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. रहदारीच्या मुख्य रस्त्यांसह शहरातील विवीध भागांमध्ये साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे साथिच्या रोगांमध्ये वाढच होत आहे. नगर परिषद प्रशासन मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्याचप्रमाणे ग्रामिण भागातही आरोग्याची समस्या अत्यंत भिषण आहे. आरोग्य यंत्रणा केवळ कुटूंब कल्याणाचे लक्ष्य गाठण्यात व लेखी कामकाजातच व्यस्त असल्याने त्यांचे नागरीकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरीष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचा-यांवर जबाबदारी सोडुन मोकळे होत असल्याने साथ रोग नियंत्रणाचे योग्य नियोजन करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे.

Saturday 29 October 2011

विदर्भाची लोककला "दंढार"

विदर्भातील पारंपारीक लोककला असलेल्या दंढारीचे वेगळेच वैशिष्ट्य आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी पुरूष महिला वेष धारण करून दंढार खेळतात. यात लाकडी मुखवटा धारण केलेला भुसाडी हा उलटा फेर धरून नाचत असतो. घाटंजी तालुक्यात अजुनही ही लोककला जोपासल्या जात आहे. 

Monday 24 October 2011

दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

click to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own text


click to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own textclick to generate your own text



तेजोमय हे विश्व असावे तुमच्या साठी
नवसंवत्सर उत्सव व्हावे तुमच्या साठी
लाख उजळत्या दीपा पैकी एक दिव्याने
नंदादीपासम तेवावे तुमच्या साठी
श्रावण राहो हिरवा हिरवा खळखळणारा
वेल फुलांना रंग मिळावे तुमच्या साठी
केशर लाली सांज सकाळी तुमची आहे
ईशाने झोळीस भरावे तुमच्या साठी
केशव माधव तीनत्रिकाळी संध्या करता
पुण्य प्रभावे भाग्य हसावे तुमच्या साठी
सुखदु:खाची खिचडी आहे जीवन सारे
दु:ख नसावे मोर झुलावे तुमच्या साठी
स्वप्नाविन का जगतो कोणी आज जगी या?
स्वप्न न आता स्वप्न उरावे तुमच्या साठी
दार किलकिले करून ठेवा कातरवेळी
घेउन किरणे यावे तुमच्या साठी

घाटंजी न्युजच्या सर्व वाचकांना व शुभचिंतकांना 

***दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा *** 

गिलानी महाविद्यालयाच्या छात्रसंघ सचिवपदी प्रितम दिकुंडवार


येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या छात्रसंघ सचिवपदी प्रितम संजय दिकुंडवार याची बहुमताने निवड करण्यात आली. तो कला शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. संस्थेचे अध्यक्ष सद्रुद्दीन गिलानी, प्राचार्य डॉ.एम.ए.शहेजाद यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी वृंदाने त्याचे कौतुक केले आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मित्रमंडळी व गुरूजनांना देतो.

पाच वर्ष ‘छळ’ केल्यावर न.प.ला विकासकामांचा ‘पुळका’


गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांचा निधी आपल्या विकासासाठी वापरून नगर परिषद पदाधिका-यांनी घाटंजीकरांचा अक्षम्य छळ केला. आता निवडणुक महिनाभरावर असतांना विवीध विकास कामांना सुरूवात करून आम्ही किती कर्तव्य तत्पर आहोत याचे ‘दयनिय’ प्रदर्शन नुकतेच करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर साधा मुरूम टाकण्यासाठी नागरीकांना न.प.कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले. त्यानंतरही तिथे मुरूमाऐवजी माती टाकुन निर्लज्जपणाचा कळस वर्तमान पदाधिका-यांनी गाठला. हा प्रकार कुठे जाणीवपुर्वक तर कुठे पदाधिका-यांच्या मनमानीपणामुळे करण्यात आला.
घाटंजी न.प.हद्दीतील विवीध कामांचे भुमिपुजन शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेष ठाकुर यांनी भुमिपुजनाच्या फलकावर स्वत:ची सचित्र प्रसिद्धीही करून घेतली. घाटंजी शहरात जणु काही विकासाची गंगाच अवतरली आहे असा बनाव निर्माण करून घाटंजीकरांची थट्टा उडविल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन नागरीकांना ज्या रस्ते नाल्यांची गरज होती ती कामे आतापर्यंत अडवुन निवडणुक येताच अत्यंत तत्परतेने त्या कामांना सुरूवात करण्यात आली. यापुर्वी न.प.च्या सत्तेत असलेल्यांनीही त्यावेळी निवडणुकीपुर्वी विकासाचे असेच ‘नाटक’ उभे केले होते. तेव्हा जनतेने त्याना त्यांची जागा दाखविली होती हे विषेश. बसस्थानकाकडे जाणा-या रस्त्यांचे काम आता सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत या रत्यावरून जाणे म्हणजे एकप्रकारची शिक्षाच होती. त्यात पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमध्ये मातीचे ढिगारे टाकुन नगर परिषदेने घाटंजीकरांचा अंतच पाहिला. आता निवडणुकीपुर्वी या रस्त्याचे काम सुरू करून जखमेवर मिठ चोळण्याचेच काम न.प.ने केले असल्याची जनमानसात चर्चा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये विकासकामांसाठी आलेला कोट्यवधींचा निधी केवळ नगर सेवकांच्याच विकासासाठी वापरला गेला अशी संतप्त भावना जनतेमध्ये आहे. त्यामुळे मतांची ‘भिक’ मागायला जाताना प्रसंगी या रागाचा सामनाही वर्तमान पदाधिका-यांना करावा लागणार आहे. केवळ आरक्षणामुळे शिवसेनेकडे नगराध्यक्षपद आले. त्यामूळे वच्छला धुर्वे गेली दोन अडीच वर्ष नाममात्र नगराध्यक्षपदावर विराजमान आहेत. पदाचे संपुर्ण अधिकार मात्र नगरसेवक शैलेष ठाकुर यांनीच वापरले. गेली काही वर्षे सुरू असलेल्या रामभरोसे कारभारामुळे घाटंजी नगर परिषदेत पदाधिकारी व प्रशासन अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.
नुकतीच भुमिपुजन करण्यात आलेली सर्व कामे शैलेष ठाकुर यांच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला देऊन निवडणुकीचा खर्च काढण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेनेच्या या भुमिपुजन नाट्याबाबत जनतेमध्ये समाधानाऐवजी संतापच दिसुन येत आहे.

आता आम्हाला शैक्षणीक कामे करू द्या..!


शेकडो शिक्षकांचे तहसिलदारांना निवेदन

ऐन परिक्षेच्या काळात शिक्षकांवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सोपविण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेकडो शिक्षकांनी तहसिल कार्यालयावर धडक दिली. शैक्षणीक कामावर दुर्लक्ष होत असल्याने मतदार याद्यांच्या कामावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शेकडो शिक्षक उपस्थित होते. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यान्वये शिक्षकांना जनगणना, आपत्ती निवारण, तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरीक्त इतर कामे दिल्या जाऊ नयेत असा स्पष्ट नियम आहे. तरी देखिल शिक्षकांनी गेल्या महिनाभरात मतदार याद्यांच्या कामात प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. मात्र नुकत्याच देण्यात आलेल्या नविन आदेशान्वये नगर परिषद क्षेत्रातील मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदारांचे छायाचित्र गोळा करणे हे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. १ नोव्हेंबर पर्यंत ते पुर्णत्वास न्यायचे आहे. मात्र सध्या शिक्षकांवर प्रथम सत्रांत परिक्षेच्या प्रश्नपत्रिका तपासणे व सातत्यपुर्ण सर्वंकष मुल्यमापन पद्धतीनुसार विद्याथ्र्यांचे मुल्यमापन करण्याची जबाबदारी आहे. या सर्व कामांसाठी शिक्षकांना शाळेत राहणे मुख्याध्यापकांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या आदेशाचे पालन करणे अशक्य असल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. एकीकडे शासन सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करते तर दुसरीकडे शिक्षकांना अशैक्षणीक कामाना जुंपून शिक्षणाच्या कार्यापासुन वंचित ठेवते याबाबत अनेक शिक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली.


शिक्षकांच्या प्रशिक्षणात उडाला गोंधळ

अंजी नृसिंह येथे झालेल्या तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या मुल्यमापन प्रशिक्षणात अखेरच्या दिवशी गोंधळ उडाला. या तिन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येणा-या शिक्षकांना प्रत्येक दिवसाचा प्रवास भत्ता देय होता. मात्र पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पैसे मिळाल्याबाबत शिक्षकांच्या स्वाक्षNया घेतल्या. मात्र पैशांचे वाटप केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही शिक्षकांनी याबाबत संबंधीतांना विचारणा केली. परंतु त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर बाबीची तक्रार करणार असल्याचेही काही शिक्षकांनी बोलुन दाखविले.


Tuesday 18 October 2011

किरकोळ वादातुन नणंद भावजयीची आत्महत्या


तालुक्यातील जरूर येथे घरगुती भांडणातुन नणंद भावजयीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. अर्चना धर्मा सातपुते (वय ३०) व तिची अविवाहीत नणंद सुशिला आनंदराव सातपुते (वय ४५) यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. हा वाद विकोपाला जाऊन दोघींनीही शेवटी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने घाटंजी ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले. मात्र अर्चना सातपुते हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुशिला सातपुते हिला यवतमाळला नेतांना कोळंबी जवळ तिची प्राणज्योत मालवली.

Monday 17 October 2011

अश्लिल गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजात मद्यधुंद पोलीसांचा ‘थिल्लरपणा’




कर्णकर्कश आवाज, दारुची झिंग चढल्याने चित्र विचित्र हातवारे करीत नाचणारे लोक हे आजकालच्या विसर्जन मिरवणुकीतील चित्र असते. आपल्या वागण्याचा ईतरांना काय त्रास होतोय याचे भान त्यांना नसते. गेल्या काही वर्षांपासुन विवीध उत्सव समित्यांनी धार्मिक उत्सवात अश्लिल गाणी वाजविल्या जाऊ नयेत अशी बंधने लादल्याने हा किळसवाणा प्रकार काही प्रमाणात नियंत्रणात आला आहे. मात्र घाटंजी पोलीसांनी विसर्जन मिरवणुकीत घाणेरड्या गाण्यांना स्थान देऊन पुन्हा तोच अध्याय नव्याने सुरू केला आहे. यावर्षी पोलीस स्टेशनच्या आवारात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सर्व नियम पाळुन आदर्श मिरवणुक कशी काढता येऊ शकते याचे उदाहरण घाटंजी पोलीसांना जनतेसमोर ठेवता आले असते. मात्र याच्या अगदी उलट पायंडा पोलीसांनी पाडल्याने आगामी काळात परिसरातील वातावरण दुषीत होण्याची शक्यता बळावली आहे. बंदी असतानांही कर्णकर्कश आवाजात डि.जे.वाजविल्या जात होता. त्यावर ‘पोरी झगा गं...झगा गं...वा-यावरी उडं, चोली के पिछे क्या है?, मुंगळा मुंगळा मै गुड की डली...मंगता है तो आजा रसिया.....’ अशा एकापेक्षा एक थिल्लर व अश्लिल गाण्यांवर ठाणेदार बाबुराव खंदारे यांच्यासह पोलीस ठाण्यातील जवळपास सर्वच पोलीस कर्मचारी विचित्र हातवारे करीत नाचत होते. आपली जबाबदारी, सामाजीक भान व कर्तव्य गुलालाप्रमाणे उधळीत पोलीसांचा हा ‘धिंगाणा’ सुरू होता. थोडी ‘जास्त’ झाल्याने अनेकांचा तोलही ढळत होता.
पोलीसांच्या भोवती अवैध व्यावसायीकांचे कडे होते. ते टाळ्या वाजवुन पोलीसांना ‘चालु द्या साहेब’ असे प्रोत्साहन देत होते. ठाणेदार बाबुराव खंदारे हातात पाचशेच्या नोटांचे बंडल घेऊन होते. कर्मचा-यांच्या अंगावर ओवाळुन ते एक एक नोट बँड वाल्यांच्या तोंडात कोंबत ते आणखीच जोशात आले होते. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या शि.प्र.मं. कन्या शाळेजवळ तर तब्बल एक तास मिरवणुक थांबली. मिरवणुकीमध्ये सहभागी काही टवाळखोरांनी ‘पोरी झगा गं...झगा गं...वा-यावरी उडं’ हेच गाणं वारंवार वाजवायला लावल्याने येथिल शालेय विद्यार्थीनी, रस्त्यावरून ये जा करणा-या महिलांची प्रचंड कुचंबना झाली. तब्बल तिन किलोमिटर परिसरात डि.जे.चा कानठाळ्या बसविणारा आवाज घुमत होता. प्रत्यक्ष पोलीसच असा धिंगाणा घालीत असल्याने सर्वसामान्य नागरीकांनी तर कपाळी हातच मारून घेतला.
पोलीस हा देखिल माणुसच आहे. त्यामुळे त्यांच्या मिरवणुकीत नाचण्यात काहीच गैर नाही. मात्र मिरवणुकीत त्यांच्या खांद्याला खांदा लावुन नाचणारे अवैध व्यावसायीक, टवाळखोर तरूण याना पोलीसांचे अघोषीत संरक्षणच मिळाले. मिरवणुकीत आवाजाच्या तिव्रतेचे सारे नियम गुंडाळुन वाजविण्यात आलेली अश्लिल गाणी व त्यावर आपल्या पदाचे भान विसरून नाचणारे ठाणेदार बाबुराव खंदारे यानी घाटंजीच्या दुर्गोत्सवाला गालबोट लावले अशीच चर्चा सध्या घाटंजी शहरात सुरू आहे. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी यावर्षी शांततेत व मद्यविरहीत मिरवणुक काढणा-या मंडळांना पुरस्कृत करण्यात येईल असे सांगीतले होते. मात्र घाटंजी पोलीसांनीच दुर्गोत्सवाचे पावित्र्य नष्ट करणारे काम केल्याने पोलीस अधिक्षक या घटनेला गांभिर्याने घेणार का? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
साभार:- देशोन्नती


Sunday 16 October 2011

अष्टमीच्या महाआरतीने अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले


नवयुवक दुर्गोत्सव मंडळाचा उपक्रम
येथिल शिवाजी चौकात असलेल्या नवयुवक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने अष्टमीच्या दिवशी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीमध्ये लहान मुलांसह सर्व वयोगटातील नागरीकांनी आकर्षक वेशभुषेमध्ये सहभागी होऊन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कलाश्री आर्ट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी वाद्याच्या तालावर आरत्या सादर केल्या. आरतीनंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने सर्व भक्तांच्या नजरांना खिळवुन ठेवले. महाआरतीमध्ये उत्कृष्ट वेशभुषा व ताटसजावट स्पर्धाही आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट ताट सजावट व वेशभुषा केल्याबद्दल संस्कृती खांडरे व दिव्या उईके यांना १ हजार १११ रूपयांचे पारितोषीक देण्यात आले. उत्कृष्ट ताट सजावटीसाठी चि.देशट्टीवार याला ५५५ रूपयांचे पारितोषीक देण्यात आले. उत्कृष्ट वेशभुषेसाठी निशा गवळी हिला ५५५ रूपयांचे पारितोषीक देण्यात आले. तसेच उत्कृष्ट बाल वेशभुषेसाठी नयन खांडरे याला ३३३ रूपयांचे पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण सौ.गोरे, शरद सोयाम व अमोल राऊत यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल उईके, उपाध्यक्ष विशाल दिडशे, अझहर चौहान, सचिव सुरेश फुसे, सहसचिव मनोज हामंद, सदस्य प्रमोद खांडरे, मोनु पांडे, अजय दुबे, सुनिल किरणापुरे, लक्ष्मण दिडशे, गजानन करपे, गणेश अस्वले, प्रतिक उईके, राहुल खांडरे, निखिल ठाकरे, प्रविण रागीलवार, पिंटु झाडे, किरण मोरे, प्रकाश मोरे, सचिन हामंद, हरिभाऊ भेदरकर, शिवम ठाकरे, सचिन पुâसे, मनोज फुसे, मयुर फुसे, चेतन हर्षे, राहुल कडु यांनी परिश्रम घेतले.

Thursday 6 October 2011

शिरोलीच्या दुर्गोत्सव मंडळाची अनोखी धार्मीक "एकात्मता"

प्रत्येक धर्माचे आचरण वेगळे असले तरी शिकवण मात्र एकच आहे. तरी देखिल काही विघ्नसंतोषी लोक धार्मिक भावना कलुषीत करून समाजात तेढ निर्माण करतात. जातीय विद्वेषातुन लागलेल्या आगीत आजवर आपला समाज अनेकदा होरपळल्या गेला आहे. याचा अर्थ आपल्यात सद्भावनाच उरली नाही असे नाही. समाजात आजही अशी उदाहरणे आहेत ज्यांनी एकात्मतेची ज्योत तेवत ठेवली आहे.
घाटंजी तालुक्यातील शिरोलीचे ‘एकात्मता' दुर्गोत्सव मंडळ हे त्यापैकीच एक. मंडळाच्या नावाप्रमाणेच या गावातील युवकांनी धार्मिक एकात्मतेचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
तब्बल चौदा वर्षांपासुन मुस्लिम युवक व त्यांचे कुटूंबीय दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून नऊ दिवस उपासना करतात. या दरम्यान देवीची पुजा तसेच आरती मध्येही अनेक मुस्लिम कुटूंबीय सहभागी होतात.
मंडळातील काही युवक तर नऊ दिवस कट्टरतेने उपवासही करतात. या दरम्यान मुस्लिम कुटूंबात मांसाहारी जेवण बनविल्या जात नाही. या मंडळातील ८० टक्के सदस्य मुस्लिम आहेत. यावर्षी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सै.आरीफ सै.कासाम यांचेवर आहे. तर उपाध्यक्ष सै.शेरीफ सै.कासाम व सचिव शेख इसाक शेख मुसा हे आहेत. प्रमुख सदस्यांमध्ये अल्ताफ अब्दुल चव्हाण, ईरफान रफीक चव्हाण, अखिल गफ्फार चव्हाण, शे.रौफ शे.रसुल, दिलीप नानाजी काकडे, निलेश बंडुजी मेसेकार यांचा समावेश आहे.
या मंडळामुळे कुठलीही क्रांती किंवा समाज परिवर्तन झाले नसले तरी जातीय सलोख्याचे अनोखे व अनुकरणीय उदाहरण जगासमोर ठेवल्या गेले आहे. सद्भावाची ही परंपरा गेल्या चौदा वर्षांपासुन अखंडीतपणे जोपासण्यासाठी शिरोलीतील रहिवाश्यांचे कौतुकच करावे लागेल.

घाटंजीतील नवरात्राचे रंग.......!

नवयुवक दुर्गोत्सव मंडळाने अष्टमीला आयोजीत केलेल्या महाआरतीमध्ये 
विवीध वेशभुषेमध्ये सहभागी झालेले सर्व वयोगटातील भक्त







एकविरा दुर्गोत्सव मंडळाचे सुंदर प्रवेशद्वार
जलाराम मंदिरातील आकर्षक रोषणाई
पोलीस स्टेशन चौक आकर्षक रोषणाईने उजळुन निघाला आहे.
पंचमहा दुर्गोत्सव मंडळ, राम मंदिर घाटंजी यानीही सुंदर रोषणाई केली आहे.
नवयुवक दुर्गोत्सव मंडळाचे आकर्षक प्रवेशद्वार व रोषणाईने न्हाऊन निघालेला परिसर
नवयुवक दुर्गोत्सव मंडळाचे आकर्षक प्रवेशद्वार व रोषणाईने न्हाऊन निघालेला परिसर 
मामाश्री शारदोत्सव मंडळाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आधारीत दृष्य साकारले आहे. चित्रकार प्रमोद ठाकरे
मामाश्री शारदोत्सव मंडळाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आधारीत दृष्य साकारले आहे. चित्रकार प्रमोद ठाकरे
नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ अंजी नृसिंह येथे साकारलेला समुद्रमंथनाचा देखावा